बाजार समिती बंद, तरीही 15 हजार क्विंटल शेतीमालाची आवक अन् अडीच कोटींचे व्यवहार

| Updated on: Nov 02, 2021 | 3:21 PM

आहो खरंच गेल्या आठ दिवसांमध्ये 15 हजार क्विंटल शेतीमालाची आवक झाली आहे आणि त्याबदल्यात 2 कोटी 25 लाखांचे व्यवहारही झाले आहेत. पण ही सर्व उलाढाल आहे ती नव्याने सुरु केलेल्या शेतीमाल तारण योजनेतील.

बाजार समिती बंद, तरीही 15 हजार क्विंटल शेतीमालाची आवक अन् अडीच कोटींचे व्यवहार
संग्रहीत छायाचित्र
Follow us on

लातूर : सध्या दिवाळीमुळे (Agricultural Income Market Committee) बाजार समित्या बंद असताना कसली आलीय शेतीमालाची आवक असे तुम्हाला वाटणे साहजिक आहे. पण लातूरात हे घंडलंय. आहो खरंच गेल्या आठ दिवसांमध्ये 15 हजार क्विंटल शेतीमालाची आवक झाली आहे आणि त्याबदल्यात 2 कोटी 25 लाखांचे व्यवहारही झाले आहेत. पण ही सर्व उलाढाल आहे ती नव्याने सुरु केलेल्या (Agricultural Mortgage Scheme) शेतीमाल तारण योजनेतील. आतापर्यंत या योजनेकडे (Farmer) शेतकऱ्यांचे दुर्लक्ष होते मात्र, यंदा खरीपातील शेतीमालाला चांगला दर नसल्याने शेतकऱ्यांनी साठवणूकीवर भर दिलेला आहे. या शेतीमाल तारण योजनेचा लाभ शेतकरी घेच आहेत.

वखार महामंडळाच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या शेतीमाल तारण योजनेला यंदा चांगला प्रतिसाद मिळत आहे. कारण परस्थितीही तशी अनुकूल झाली आहे. खरीपातील पिकाच्या दरात कायम चढ-उतार राहिलेला आहे. त्यामुळे कमी किंमतीमध्ये माल विक्री करण्यापेक्षा साठवणूकीवर भर दिला जात आहे. गेल्या 10 दिवसांपासूनच वखार महामंडळाची ही गोदामे खुली करण्यात आली आहेत. त्याचा लाभही शेतकरी मोठ्या प्रमाणात घेत आहेत. लातूर येथील कृषी बाजार समितीच्या परिसरातील या गोदामात गेल्या 8 दिवसांमध्ये तब्बल 15 हजार क्विंटल शेतीमालाची आवक झाली असून यामध्ये सोयाबीन अधिक आहे.

शेतकरी योग्य दराच्या प्रतिक्षेत

गेल्या काही दिवसांपासून सोयाबीन या मुख्य पिकाच्या दरात कमालीची घट झाली होती. उत्पादनावर अधिकचा खर्च आणि कवडीमोल दराने त्याची विक्री हे न परवडणारे असल्याने शेतकरी दिवाळीपूर्वीपासूनच साठवणूकीवर भर देत आहे. शिवाय सध्याचे दर हे काही कायमचे राहणार नाहीत असेही सांगितले जात असल्याने सोयाबीनला चांगला दर मिळाल्यावरच त्याची विक्री करायची ही भावना आता शेतकऱ्यांची झाली आहे.

दिवसाकाठी 100 शेतकऱ्यांच्या शेतीमालाची आवक

ज्याप्रमाणे दर अधिकचे असल्यावर बाजार समितीमध्ये धान्याची आवक वाढते अगदी त्याप्रमाणेच दर कमी झाल्याने साठवणूकीसाठी दिवसाला 100 शेतकरी हे शेतीमाल तारण्यासाठी घेऊन येत असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीमधीला बिरजदार यांनी tv9 मराठी शी बोलताना सांगितले आहे. शिवाय सध्या कृषी उत्पन्न बाजार समित्या ह्या देखील बंद आहेत. त्याचाही थोडाबहुत परिणाम माल साठवणुकीवर झाल्याचे चित्र आहे. मात्र, गेल्या 8 दिवसांमध्ये या शेतीमाल तारण योजनेअंतर्गत 2 कोटी 25 लाखांचे व्यवहार झाले आहेत. शेतकऱ्यांनाही याचा फायदा झालेला आहे.

शेतीमालावर मिळते कर्ज

1.शेतमाल प्रकार : सुर्यफूल, सोयाबीन, तुर, उडिद, भात , करडई, मुग, हळद, चना या मालाकरिता बाजारभावातील एकूण किमतीच्या 75 टक्के रक्कम ही कर्ज म्हणून शेतकऱ्यांना दिली जाते. परतफेडीची मुदत ही सहा महिन्याची असून याकरीता 6 टक्के व्याजदर आहे.

2. शेतमाल प्रकार : मका,ज्वारी, गहू, बाजरी या मालाकरिता बाजारभावातील एकूण किमतीच्या 50 टक्के रक्कम ही कर्ज म्हणून शेतकऱ्यांना दिली जाते. परतफेडीची मुदत ही सहा महिन्याची असून याकरीता 6 टक्के व्याजदर आहे.

3. शेतमाल प्रकार : काजू बी या मालाकरिता बाजारभावातील एकूण किमतीच्या 75 टक्के रक्कम ही कर्ज म्हणून शेतकऱ्यांना दिली जाते. परतफेडीची मुदत ही सहा महिन्याची असून याकरीता 6 टक्के व्याजदर आहे.

4. शेतमाल प्रकार : बेदाणा या मालाकरिता बाजारभावातील एकूण किमतीच्या 50 टक्के रक्कम ही कर्ज म्हणून दिली जाते. परतफेडीची मुदत ही सहा महिन्याची असून याकरीता 6 टक्के व्याजदर आहे. (Response to agricultural mortgage scheme in Latur, turnover of crores)

संबंधित बातम्या :

शेतकऱ्यांना आता महावितरणचा ‘शॅाक’, कृषीपंपासाठी वेगळा नियम, ऐन रब्बीच्या तोंडावर निर्णय

अनियमितता टाळण्यासाठी पीएम किसान योजनेत अणखीन बदल, अन्यथा मिळणार नाहीत पैसे

सोयाबीनचा दर स्थिर पण विक्री करायची कुठे ? शेतकऱ्यांकडे आहेत हे पर्याय