अमरावती : शेतीमालाला किमान आधारभूत किंमत मिळावी म्हणून नाफेडच्या माध्यमातून दरवर्षी हमीभाव खरेदी केंद्र ही उभी केली जातात. त्याच पध्दतीने यंदा तूर (Guarantee Rate Centre) खरेदी केंद्र राज्यभर उभारण्यात आली आहेत. केंद्र उभारण्यापूर्वी (Toor Crop) तुरीचे दर हे हमीभावापेक्षा कमी होते मात्र, 1 जानेवारीला राज्यात 186 ठिकाणी खरेदी केंद्र उभारली अन् तुरीच्या दरात वाढ होऊ लागली आहे. कमी दर असताना (Farmer) शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर तुरीची विक्री करता येईल या अनुशंगाने कागदपत्रांची पूर्तता करुन नोंदणी केली खरी मात्र, आता प्रत्यक्ष विक्री करताना हमीभावापेक्षा खुल्या बाजारपेठेत दर वाढल्याने शेतकऱ्यांनी आपला इरादा बदलला आहे. त्यामुळे राज्यभर केवळ नावालाच हमीभाव केंद्र उभारली अशी स्थिती निर्माण झाली आहे. हमीभाव केंद्र सुरु होण्यापूर्वी खुल्या बाजारात तुरीचे दर हे 5 हजार 800 पर्यंत होते मात्र, ही केंद्र सुरु होताच बाजारपेठेतील दर हे 6 हजार 500 वर येऊन ठेपले आहेत.
केंद्र सरकारच्या माध्यमातून मार्केटींग फेडरेशनअंतर्गत ही खरेदी केंद्र उभारली जातात. तुरीला किमान आधारभूत किंमत मिळावी यामागचा केंद्र सरकारचा हेतू आहे. मात्र, केंद्रावर नोंदणी सुरु होताच दुसरीकडे दर वाढण्यास सुरवात झाली होती. नाफेडने यंदा तुरीसाठी 6 हजार 300 रुपये हा हमीभाव ठरवून दिला होता. तूर काढणीला सुरवात होताच केव्हा हमी भाव केंद्र सुरु होणार अशी विचारणा शेतकऱ्यांकडून सुरु झाली होती. पण प्रत्यक्षात केंद्र सुरु झाली की, दुसरीकडे खुल्या बाजारातील दरही वाढत गेले. आज प्रत्यक्ष विक्रीची वेळ आली असताना शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे हमीभाव केंद्रावर मात्र, प्रत्यक्षात विक्री ही खुल्या बाजारात सुरु आहे.
अमरावती जिल्ह्यात जिल्हा मार्केटींग आणि विदर्भ मार्केटींग अशी 15 खरेदी केंद्र उभारण्यात आली आहेत. या माध्यमातून 4 हजार 628 शेतकऱ्यांनी नोंदणी केल्याचे मार्केंटींग फेडरेशन अधिकारी यांनी सांगितले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील पिकाला योग्य दर मिळेल असे चित्र झाले होते पण या आधारभूत किंमतीपेक्षा खुल्या बाजारात तुरीच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकरी या केंद्रावरील किचकट प्रक्रियेत न पडता थेट व्यापाऱ्यांकडेच विक्री करीत आहेत.
पिकाच्या नोंदणीपासून ते विक्री केलेल्या मालाचे पैसे पदरी पडेपर्यंत किचकट प्रक्रिया ही खरेदी केंद्रावर असते. विक्रीपूर्वी नोंदणीकरिता कागदपत्रांची पूर्तता शिवाय नोंदणीनुसारच विक्री केली जाते. आर्द्रतेचे प्रमाण हे 10 टक्के पेक्षा अधिक असले तर स्विकारले जात नाही. शिवाय विक्री केल्यानंतर 15 दिवसांनी पैसे मिळणार असे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात महिना-महिना बील निघत नसल्याने शेतकरी त्रस्त होतात. त्यामुळे कमी दराने का असेना पण खुल्या बाजारातच विक्रीला शेतकरी पसंती देत आहेत.
Betel Leaf Farming : सुपारी पान मळ्यांची शेती करायची कशी? जाणून घ्या कृषितज्ञांचे मत
उन्हाळी हंगामातील नव्या प्रयोगातून निघेल का खरिपातील भरपाई? सर्वकाही पोषक असताना भीती कशाची
Latur Market: सोयाबीनचे दर अन् आवकही स्थिरच, शेतकऱ्यांचे लक्ष खरिपातील अंतिम पिकावर