लातूर : पावसाने मराठवाड्यात उघडीप दिली आहे. त्याचा फायदा शेतकरी घेत असून सध्या चिखलाने माखलेल्या सोयाबीनची काढणी कामे जोमात सुरु आहेत. पुन्हा परतीच्या पावसामध्ये पिकाचे नुकसान होऊ नये म्हणून शेतकरी (soybean) सोयाबीनची काढणी, मळणी करुन थेट विक्रीसाठी बाजारात दाखल करीत आहे. गुरवारी (Latur Market) लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची विक्रमी आवक झाली होती. आवक वाढूनही दर स्थिर राहिल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. 8 हजार क्विंटल सोयबीनची आवक झाली तर सरासरी दर हा 5800 रुपये मिळाला आहे. तर
दुसरीकडे उडदाची आवक कमी झाली असून दर हा स्थिर आहे.
खरीपातूल रखडलेल्या काढणी कामाला आता वेग येत आहे. पावसामुळे सोयाबीनची काढणी ही खोळंबली होती. शिवाय पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसानही झाले होते. गेल्या चार दिवसांपासून पावसाने ऊसंत घेतली असल्याने उर्वरीत सोयाबीनची काढणी, मळणी करुन थेट बाजार दाखवला जात आहे. कारण आठ दिवसांपासून सोयाबीन हे पाण्यात होते. त्यामुळे उत्पादनावर परिणाम हा झालेला आहे. शिवाय ढगाळ वातावरण असल्याने साठवून ठेवणेही धोक्याचे आहे.
त्यामुळे मिळेल तो स्वीकारत सोयाबीन बाजारात आणले जात आहे. येथीव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उस्मानाबाद, बीड, आंबाजोगाई येथून सोयाबनची आवक आहे. तर परराज्यातील आवक ही कमी झाली आहे. दिवसाकाठी 3 ते 4 हजार क्विंटल होणारी आवक गुरुवारी 8 हजारावर गेलेली होती. त्यामुळे दर कमी होण्याचा धोका होता. मात्र, गुरुवारीही सोयाबनला 5800 चा दर मिळालेला आहे.
गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने काढणी झालेल्या सोयाबीनची मळणी कामे ही रखडलेली होती. शिवाय बुधवारी लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती ही बंद होती. त्यामुळे आजच्या बाजारात सोयाबीनची आवक ही दुपटीने वाढलेली होती. तर हंगामाच्या सुरवातीपासून उडदाची आवक ही 5 हजार क्विंटलच्या घरात होती. ती आवक आता कमी झाली असून केवळ 3 हजार क्विंटल उडीद बाजारात दाखल झालेला होता. खरीपातील या दोन मुख्य पिकावरच शेतकऱ्यांच्या आणि व्यापाऱ्यांच्या नजरा आहेत. मात्र, दोन्हीही पीकाचे दर स्थिर राहिल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे.
पावसामुळे सोयाबीनचे पीक हे पाण्यातच होते. अशाच अवस्थेत काढणी आणि मळणीची कामे झालेली आहेत. त्यामुळे त्याची साठवणूक आणि कोणतीही प्रक्रिया न करता बाजारात आणले जात आहे. मात्र, सध्या आवक सुरु असलेले सोयाबीन हे डागाळलेले आहे. मालाच्या दर्जानुसारच दरही आकारले जात आहे. किमान झालेला खर्च तरी पदरी पडेल या आशेने शेतकरी बाजार जवळ करीत आहे.
राज्यात अद्यापही हमीभाव केंद्र ही सुरु झालेली नाहीत. त्यामुळे व्यापारी ठरवतेल त्याच दरात उडदाची विक्री करावी लागत आहे. केंद्र सरकारने उडदाला 6300 एवढा हमीभाव दिलेला आहे. मात्र, सध्या बाजारपेठेत उडदाला 5800 एवढा सरासरी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
लातूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दुपारी 12 च्या दरम्यान शेतीमालाचे सौदे होतात. गुरवारी लाल तूर- 6450 रुपये क्विंटल, पांढरी तूर 6400 रुपये क्विंटल, पिंकू तूर 6400 रुपये क्विंटल, जानकी चना 5100 रुपये क्विंटल, विजय चणा 5100, चना मिल 4950, सोयाबीन 6300, चमकी मूग 7000 , मिल मूग 6200 तर उडीदाचा दर 7200 एवढा राहिला होता. (Soyabean arrivals increasein Latur’s market committee, rates stable)
दुष्काळात तेरावा : हमीभाव केंद्रच सुरु नसल्याने शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान
शेतकऱ्यांनो कागदपत्रांची पुर्तता करा अन् ‘पी.एम. किसान सन्मान’ योजनेचा निधी मिळवा, अन्यथा…
गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा, राज्य सरकारची 122 कोटींची मदत