लातूर : मराठवाड्यात पावसाने उघडीप दिलेली आहे. मात्र, पावसाचे पाणी शेतात साचले असतानाही सबंध मराठवाड्यात सोयाबीन काढणी कामे वेगात सुरु आहेत. पावसाने तर पिकाचे नुकासान झाले आहे. त्याचा परिणाम उत्पादनाबरोबरच दरावरही होणार आहे. एकरी 4 हजार रुपये खर्च करुन काढणी सुरु असलेल्या सोयाबीनच्या दराचे भवितव्य काय याचा अभ्यासही होणे गरजेचे आहे. यापुर्वीच निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झालेले आहे. भविष्यात दराला घेऊन अधिकचे नुकासान होऊ नये म्हणून कृषितज्ञ रामेश्वर चांडक यांचा सल्ला शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे…
मराठवाड्यासह, विदर्भात पावसाने उघडीप दिलेली आहे. त्यामुळे शेती कामास वेग आलेला आहे. खरीपातील सर्वात मुख्य पिक अजूनही वावरातच होते. जूनच्या पहिल्या आठवड्यात पेरणी झालेल्या सोयाबीनची काढणी ही पावसाला सुरवात होण्यापुर्वीच झाली होती. पण अधिकतर पीक हे वावरात असून चिखलाने माखलेल्या शेतामध्ये काढणीची कामे सुरु आहेत.
एकीकडे काढणी कामे सुरु आहेत तर दुसरीकडे सोयाबीनचे दर हे दिवसेंदिवस कमी होत आहेत. 11000 हजार रुपये क्विंटलवर गलेले सोयाबीन आज 5800 येऊन ठेपलेले आहे. बाजारपेठेत आवक कमी असतानाही सोयबीनचे दर हे कोसळत आहेत. आणि हीच मोठी चिंता शेतकऱ्यांना भेडसावत आहे. मंगळावारी लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक ही 5 हजार क्विंटल एवढी झाली होती. तर दर 5800 एवढा मिळालेला होता. त्यामुळे काढणी कामे उरकताच पुन्हा आवक ही वाढणार आहे. या दरम्यान काय काळजा घ्यावी हे पाहणे महत्वाचे आहे.
आवक वाढली की दर कमी होणार हे बाजाराचे सुत्रच आहे. त्यामुळे अनेक शेतकरी हे सोयाबीन साठवणूकीवर भर देण्याचा विचार करीच असतील पण साठवणूक केल्याने अधिकचे नुकसानच होणार आहे. कारण पावसाने सोयाबीन हे भिजलेले आहे. अशा परस्थितामध्ये त्याची साठवणूक केली तर सोयाबीन सडण्याचा जास्त धोका असतो. त्यामुळे त्याची मिळेल त्या दरात विक्री करणे गरजेचे आहे. शिवाय साठवणूकीसाठी शेतकऱ्यांकडे जागाही उपलब्ध नाही त्यामुळे भविष्याच पाऊस झाला तर काढणी केलेल्या सोयाबीनचे नुकसान होणार आहे.
दरवर्षी हंगामात लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक ही 40 ते 50 हजार क्विंटलची असते. यंदा मात्र, 20 हजार क्विंटलपेक्षा जास्त आवक ही झालेली नाही. आता काढणी आणि मळणीची कामे सुरु आहेत. त्यामुळे ही कामे पूर्ण होताच आवक वाढणार असल्याचे कृषी उत्पन्न बाजारसमितीमधील बालाजी जाधव यांनी सांगितले आहे. आवक मोठ्या प्रमाणात झाल्यावर आहे ते दरही कमी होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. मात्र, साठवून पीकाची खराबी करण्यापेक्षा त्याची विक्री करणे आवश्यक असल्याचे कृषितज्ञ रामेश्वर चांडक यांनी सांगितले आहे.
केंद्र सरकारने सोयापेंटची आयात केली आहे. या महिन्याच्या अखेरपस 12 लाख टन सोयापेंड देशामध्ये दाखल होईल. त्याचा परिणामही सोयाबीनच्या दरावर होणार असल्याने सोयाबीनची काढणी झाली की विक्री ही महत्वाची आहे..
वेअर हाऊस एक उत्तम पर्याय…शेती मालाची साठवणूक करण्यासाठी आता वेअर हाऊस उभारण्यात आलेली आहेत. शेतामाल तारण कर्ज या योजने अंतर्गत सोयाबीनच्या साठवणूकीवर सध्याच्या बाजारभावाप्रमाणे शेतकऱ्यांना 75 टक्के रक्कमेचे कर्जही दिले जाते. 6 टक्के व्याजाने आणि 6 महिन्याच्या मुदतीवर हे कर्ज दिले जाते. शिवाय योग्य दर मिळताच सोयाबीनची विक्रीही शक्य आहे. (Soyabean arrivals to rise, farmers advised by agronomists)
पालघर शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता : वाडा कोलम तांदळाला भौगोलिक मानांकन, जागतिक बाजारपेठेतही मागणी
आंबा प्रक्रिया उद्योगाला मिळणार उभारी, 141 उद्योजकांना मिळणार संधी
पुर्वहंगामी द्राक्ष बाजारात, सोयाबीनप्रमाणेच मिळतोय मुहुर्ताचा दर