लातूर : खरीपातून सर्वाधिक उत्पादन मिळवून देणाऱ्या सोयाबीनची यंदा मात्र, वेगळीच कथा झाली आहे. पेरणीपासून हे पीक संकटात होते अखेर काढणी करतानाही शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसामुळे रखडलेल्या सोयाबीनची सध्या काढणी कामे ही सुरु आहेत. तर बाजारपेठेत सोयाबीनला 5 हजाराचा दर मिळतोय तर दुसरीकडे हेच सोयाबीन काढणीसाठी शेतकऱ्यांना एकरी 5 हजार रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे शेती करावी कशी असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. पावसामुळे अद्यापही सोयाबीन हे पाण्यातच आहे. त्यामुळे मजुरी वाढली आहे. त्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या अर्थकारणावर होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शक्य असेल तर यंत्राच्या सहाय्याने काढणी कामे उरकून घेण्याचा सल्ला कृषीतज्ञ देत आहेत.
पुन्हा 17 ऑक्टोंबर पासून सक्रीय होणार असल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीन काढण्यावर भर देणे गरजेचे आहे.
दरवर्षी ऑक्टोंबर महिन्यात रब्बी हंगामाची लगबग असते. यंदा मात्र, अद्यापही खरीपातील पीकांची काढणीच सुरु आहे. पावसामुळे काढणी कामे ही रखडलेली आहेत. मुख्य पीक सोयाबीनला या पावसाचा सर्वाधिक फटका बसलेला आहे. शिवाय या पीकावर शेतकऱ्यांचा अतिरीक्त खर्चही झालेला आहे. सोयाबीन काढणीच्या सुरवातीला एकरी 3 हजार रुपयांप्रमाणे मजुरी आकारली जात होती पण आता हे पीक पाण्यात असल्याने मजूरीचे दर वाढत आहेत. सोयाबीन काढणीला एकरी 5 हजार रुपये शेतकऱ्यांना मोजावे लागत आहेत. त्यामुळे यंदा सर्वकाही पाण्यातच असल्याची शेतकऱ्यांची भावना झालेली आहे.
मराठवाड्यात एकरी 8 ते 10 क्विंटल सोयाबीनचे उत्पादन होतेय त्यामुळे सोयाबीनचे क्षेत्र वर्षागणिक वाढत आहे. यंदाही भरघोस उत्पादन होईल असा आशावाद होता. मात्र, पावसामुळे पूर्ण खऱीपाचाच नाश झालेला आहे. सोयाबीनला वावरातच कोंभ फुटले आहेत. तर एकरी 3 ते 4 क्विंटलचे उत्पादन शेतकऱ्यांना मिळत आहे. तर दुसरीकडे काढणीसाठी एकरी 5 हजार रुपये मोजावे लागत आहेत.
सोयाबीन पीकातून शेतकऱ्यांना आता उत्पन्नाची आशा राहिलेली नाही. केवळ आगामी रब्बी हंगामासाठी क्षेत्र रिकामे करण्याच्या उद्देशाने काढणी कामे सुरु आहेत. अद्यापही सोयाबीनमध्ये पाणी साचलेले असतानाही शेतकरी पीक काढणीवर भर देत आहे. कारण रब्बी हंगामातील मशागत करुन पेरणी करायची आहे. सध्या पावसाने उघडीप दिली असली तरी पुढील आठवड्यापासून पुन्हा पाऊस सक्रीय होणार असल्याचे सांगितले जात आहे.
आवक वाढली की दर कमी होणार हे बाजाराचे सुत्रच आहे. त्यामुळे अनेक शेतकरी हे सोयाबीन साठवणूकीवर भर देण्याचा विचार करीच असतील पण साठवणूक केल्याने अधिकचे नुकसानच होणार आहे. कारण पावसाने सोयाबीन हे भिजलेले आहे. अशा परस्थितामध्ये त्याची साठवणूक केली तर सोयाबीन सडण्याचा जास्त धोका असतो. त्यामुळे त्याची मिळेल त्या दरात विक्री करणे गरजेचे आहे. शिवाय साठवणूकीसाठी शेतकऱ्यांकडे जागाही उपलब्ध नाही त्यामुळे भविष्याच पाऊस झाला तर काढणी केलेल्या सोयाबीनचे नुकसान होणार आहे. Soyabean harveststalled, farmers suffer financial loss due to increase in wage rates, Farm labour rates increased
वीज अंगावर पडू नये म्हणून अशी घ्या काळजी…प्रत्येक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी
मराठवाड्यातील नुकसानभरपाईसाठी आवश्यकता अडीच हजार कोटींची, अन्
केंद्र सरकारमुळे रखडली उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांची नुकसानभरपाई