लातूर : गेल्या दोन (latur) दिवसांमध्ये सोयाबीनच्या दरात तीन हजाराने घसरण झालेली आहे. (Soyabean) अपेक्षेप्रमाणे त्याचा परिणाम सोयाबीनच्या आयातीवर होता. त्याप्रमाणेच बुधवारी लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये केवळ 5 हजार कट्ट्यांची आवक झाली आहे. दिवसाकाठी 40 हजार कट्ट्यांची आवक ही नविन सोयाबीनची काढणी झाल्यापासून होत होती ती आज कमी झाल्याचे पाहवयास मिळाले आहे.
शिवाय मराठवाड्यात (Marathwada) मंगळवार सायंकाळपासून पाऊस होत असल्याचा परिणामही आवकवर झाला आहे.
नविन सोयाबीन बाजार पेठेत दाखल होताच सोयाबीनला 8 हजार ते 8 हजार 500 असा दर मिळाला होता. त्यामुळे बाजार पेठेतील सोयाबीनची आवकही वाढली होती. शनिवारी आणि सोमवारी दिवसाकाठी येथील बाजार समितीमध्ये 40 हजार सोयाबीनचे कट्टे दाखल होत होते. शिवाय दरही चांगला मिळत असल्याने आवक वाढणार असा अंदाज व्यापारी व्यक्त करीत असतानाच सोयाबीनच्या दरात मोठी घसरण झाली असून त्याचा परिणाम आता आवकवर होत आहे.
असे असले तरी गेल्या दोन दिवसापासून सोयाबीनला 6 हजाराचा भाव मिळत आहे. हे दर स्थिर आहेत यातच शेतकरी समाधानी आहे. बुधवारी केवळ लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीन हे विक्रीसाठी आणले होते. मंगळवारी 5600 एवढा दर मिळाला होता तर आज 6200 दर मिळाला आहे. तर दुसरीकडे खरीपातील दुसरे पिक उडीद याने शेतकऱ्यांना दिलासा दिलेला आहे. दिवसेंदिवस उडदाच्या दरात वाढ होत आहे. पावसामुळे उडीद हे डागाळलेले असले तरी चांगला दर मिळत आहे. मंगळवारी उडीद हे 7100 रुपये क्विंटल होते तर आज उडदाचे दर हे 7400 वर गेला होता.
सोयाबीनची आवक ही झपाट्याने वाढत होती मात्र, दर घटत असल्याने आवक ही कमी झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून 40 ते 45 हजार कट्टे सोयाबीन हे लातूर, उस्मानाबाद, बीड, कर्नाटक, सोलापूर या भागातून दाखल होत होते. कमी होत असलेल्या दराची धास्ती शेतकऱ्यांनी घेतली असून सध्या सोयाबीनची साठवणूक केल्याचे फायद्याचे म्हणत बाजारपेठेकडे पाठ फिरवली आहे. शनिवारपर्यंत सोयाबीनची आवक ही वाढलेली होती. मात्र, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दरात घसरण झाल्याने आता कमी झाली आहे. बुधवारी केवळ 5 हजार कट्टे लातूरच्या बाजार समितीमध्ये दाखल झाले होते. त्यामुळे काही प्रमाणात दर वाढले होते. बुधवारी सोयाबीनला सरासरी 6200 क्विंटल प्रमाणे दर मिळालेला होता.
लातूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दुपारी 12 च्या दरम्यान शेतीमालाचे सौदे होतात. बुधवारी लाल तूर- 6450 रुपये क्विंटल, पांढरी तूर 6550 रुपये क्विंटल, पिंकू तूर 6361 रुपये क्विंटल, जानकी चना 5075 रुपये क्विंटल, विजय चणा 5400, चना मिल 4900, सोयाबीन 6600, चमकी मूग 6550, मिल मूग 6300 तर उडीदाचा दर 7421 एवढा राहिला होता. (soyabean-prices-also-fall-as-arrivals-fall-latur-market-rates-fall)