लातूर : खाद्यतेलाचे (edible oil) दर नियंत्रित ठेवण्याच्या प्रयत्नात दुसरीकडे सोयाबीनच्या (Soyabean Rate) दरात कमालीची घसरण होत आहे. राज्यातील प्रमुख बाजारपेठेत हा फरक लागलीच पाहवयास मिळत आहे. खाद्यतेलावरील आयातशुल्क कमी केल्याचा परिणाम लातूरच्या बाजारावर जाणवत आहे. गेल्या तीन दिवसांमध्ये सोयाबीनच्या दरात 300 रुपयांची घसरण झालेली आहे. ऐन सणासुदीत ग्राहकांना दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारचा असला तरी दुसरीकडे मात्र, शेतकऱ्यांचे हे नुकसान होत आहे. त्यामुळे सोयाबीन काढणीचाही खर्च हा विक्रीतून मिळत नसल्याने शेतकरी नाराज आहे.
चालू हंगामात सोयाबीनला सात ते आठ हजार रुपये भाव राहील, असे शेतकऱ्यांना वाटत होते. पण काढणी हंगाम सुरुवात होण्यापूर्वी केंद्र सरकारने त्या वेळी घेतलेल्या अशाच एका निर्णयामुळे बाजार पेठेत प्रांरभीपासून भाव कमी झाले आहेत. गेली काही दिवस साडेचार हजार ते सहा हजारांच्या घरात भाव राहिले आहेत. त्यात केंद्र शासन वेगवेगळे निर्णय घेत असल्याने त्याचा फटका भावावर होत आहे. खाद्य तेलावरील आयात रद्द करण्याचा निर्णय बाजारपेठेत सोयाबीनचा भाव तीनशे रुपयांनी कोसळला.
केंद्र सरकारच्या धोरणांचा परिणाम थेट शेतकऱ्यांच्या अर्थकारणावर होत आहे. यापुर्वीही आयातशुल्क कमी करण्याचा निर्णय घेतल्यानेच सोयाबीनचे दर कमी होण्यास सुरवात झाली होती. तर सोयाबीन बाजारात येण्याच्या प्रसंगीच सोयापेंड आयातीचा निर्णय हा झाला होता. त्यामुळे 11 हजार रुपये क्विंटलवर गेलेले सोयाबीन थेट 6 हजारावर येऊन ठेपले होते. आता दर स्थिर असताना पुन्हा खाद्यतेलावरील आयाशुल्क कमी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने दरात मोठी घसरण सुरु आहे.
ऐन सणासुदीत सर्वसामान्य नागरिकांना माफक दरात खाद्यतेल मिळावे याकरिता आयातशुल्क हे कमी केले जात आहे. मात्र, खरीपातील पिकांचे पावसाने नुकसान झालेले आहे. पीक काढणीची कामे अद्यापही रखडलेली आहे. शेतकऱ्यांचे अर्थकारण हे कोलमोडले असताना केवळ मध्यमवर्गीयांचा विचार सरकार करीत आहे. अशा प्रतिकूल परस्थितीमध्ये उलट सोयाबानला अधिक दर कसा मिळेल याचा विचार होणे गरजेचे असल्याचे शेतकरी संजय शिंदे यांनी सांगितले आहे.
हंगामाच्या सुरवातीला सोयाबीनचे दर हे 11 हजारावर गेले होते. मात्र, केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे लागलेली उतरती कळा आजही कायम आहे. 15 दिवसांखाली सोयाबीनचे दर हे 6 हजारावर स्थिर झाले होते. पण खाद्यतेलावरील आयातशुल्क कमी करण्याचा निर्णय घेताच गेल्या तीन दिवासांपासून सुरु असलेली घसरण ही कायम आहे. शिवाय पुढील महिन्यात सोयापेंडची आवक सुरु होणार असल्याने त्याचा काय परिणाम होणार हे देखील पहावे लागणार आहे. (Soyabean prices continue to fall, central government’s decision affects farmers)
भौगोलिक मानांकनात महाराष्ट्र अव्वलस्थानी, मानांकन वापरकर्तासाठी कसा करायचा अर्ज ?
पुढील तीन दिवस पावसाचे, काढणी झालेल्या पीकांची सुरक्षा महत्वाची
तुर उत्पादन वाढीचा अनोखा ‘फंडा’, काय आहे कृषितज्ञांचा शेतकऱ्यांना सल्ला ?