लातूर : यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांना सोयाबीनचा आधार मिळतो का नाही अशी अवस्था निर्माण झाली आहे. गेल्या आठ दिवसांपासून स्थिर असलेले दर आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी गडगडले आहेत.(Soyabean harvesting) सोयाबीनची काढणी-मळणी ही कामे पार पडलेली आहेत. मात्र, शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे ती योग्य दराची. (arrivals increase) गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनला 5 हजार ते 5 हजार 200 चा दर मिळत होता. या दरात सोयाबीन विक्रीची मानसिकता शेतकऱ्यांची झाली होती. (rates fall, Latur market prices) परंतु, सोमवारी सोयाबीनला 4 हजार 800 चा दर मिळाला आहे. ऐन सणात दर कमी होत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंता ह्या वाढलेल्या आहेत.
सोयाबीन हे खरीपातील मुख्य पीक असले तरी उत्पादनाच्या दृष्टीने शेतकऱ्यांना त्याचा अद्यापही फायदा झालेला नाही. हंगामाच्या सुरवातीला सोयाबीनला दर होता तर हे पीक पावसाच्या पाण्यात होते. आता काढणी-मळणी झाली आहे तर दिवसेंदिवस दर हे कमी होत आहेत. दिवाळी सण आणि आता रब्बीच्या बि-बियाणासाठी बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक वाढत आहे. आज (सोमवारी) आठवड्याच्या पहिल्या दिवशी लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 15 हजार क्विंटलची आवक झाली होती.
आता सोयाबीनची पूर्ण काढणी झाल्यामुळे आवक ही कायम राहणार आहे. शिवाय खरीपातील एकही पीक शेतकऱ्यांच्या पदरी पडले नसल्याने सण आणि रब्बीची पेरणी करायची कशी असा सवाल असल्याने आवक ही दिवसेंदिवस वाढणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे. मात्र, तेलबियाणांवरील प्रक्रीया आणि स्टॅाकिस्ट यांनी व्यापारी हे खरेदीत उतरल्याने दर वाढतील अशी एक आशा राहिलेली आहे.
सध्याच्या उघडीपीमध्ये रखडलेली कामे उरकून शेतकरी रब्बीच्या पेरणीची तयारी करीत आहे. दरम्यान, सोयाबीनची मळणी करण्यात आली होती. मात्र, पावसामुळे पिकाचे मोठे नुकसान झाले होते तर सोयाबीन हे पाण्यात असल्याने त्यामध्ये आर्द्रतेचे प्रमाणही अधिक होते. त्यामुळे मळणी झाली की सोयाबीन ऊनात वाळवून त्याच्या आर्द्रतेचे प्रमाण हे 10 ते 12 टक्के करण्यात आले आहे. असे असले तरी मात्र, सोयाबीनला दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये निराशा आहे.
खऱ्या अर्थाने सोयाबीनची काढणी आता पूर्ण झालेली आहे. अनेक शेतकऱ्यांची काढणी-मळणीची कामे ही रखडली होती. मात्र, आता पावसाने उघडीप दिल्याने सोयाबीनची मळणी कामे झाली आहेत. दिवाळी सण तोंडावर आहे आणि शेतकरी आर्थिक अडचणींचा सामना करीत आहे. त्यामुळे सोयाबीनची आवक या आठवड्यात वाढणार असल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. आवक वाढली तरी मागणीही वाढणार आहे. कारण बाजारपेठेत स्टॅाकिस्ट, सट्टेबाज आणि प्रक्रीया प्लॅट्सधारक हे माल खरेदीसाठी उतरलेले आहेत. त्यामुळे दरात वाढ झाली नाही तरी दर स्थिर राहतील असाच अंदाज आहे.
हंगामाच्या सुरवातीरपासून उडदाचे दर हे स्थिर राहिले आहेत तर कधी दरात वाढ झालेली आहे. सध्या हमीभाव केंद्राचा बोलबाला सुरु झाला आहे. यामध्ये उडदाची आधारभूत किंमत ही 6 हजार 300 ठरवण्यात आली आहे तर बाजारात उडदाला 7 हजार 300 चा दर मिळत आहे. खरेदी केंद्राच्या दराच्या तुलनेत हा दर 1 हजाराने अधिकचा आहे. त्यामुळे खरेदी केंद्राकडे कोण फिरकणार हा मोठा प्रश्न आहे. यंदा उडदाने शेतकऱ्यांना चांगली साथ दिली असली तरी उत्पादन हे कमी झाले होते.
लातूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दुपारी 12 च्या दरम्यान शेतीमालाचे सौदे होतात. सोमवारी लाल तूर- 6149 रुपये क्विंटल, पांढरी तूर 6100 रुपये क्विंटल, पिंकू तूर 5950 रुपये क्विंटल, जानकी चना 4850 रुपये क्विंटल, विजय चणा 4900, चना मिल 4850, सोयाबीन 5050, चमकी मूग 7175, मिल मूग 6300 तर उडीदाचा दर 7350 एवढा राहिला होता. (Soyabean prices fall again in Latur, problems facing farmers increase)
रब्बीची लगबग सुरुयं, मग कृषी विभागाचा सल्ला पाहूनच करा पेरणीचा श्रीगणेशा..!
नंदुरबार बाजार समितीमध्ये मिरचीचा ‘ठसका’ ; तीन दिवसांमध्ये 15 हजार क्विंटलची आवक
खरेदी केंद्रावर खरचं मिळेल का शेतकऱ्याला ‘आधार’ ? समजून घ्या पीक विक्रीची पध्दत