लातूर : जेवढी पर्वा शेतकऱ्यांना सोन्याच्या दराची नाही त्यापेक्षा अधिकची चिंता (Soybean prices) सोयाबीन दराची आहे. कारण दिवसाला सोयाबीनचे दर हे बदलत आहेत. दिवाळीमुळे गेल्या सात दिवसांपासून येथील बाजार समिती ही बंद होती. त्यामुळे सोमवारी सोयाबीनच्या दराचे नेमके काय होणार याची उस्तुकता लागली होती. मात्र, शेतकऱ्यांची ( farmers worried) निराशा कायम आहे. कारण पाडव्यादिवशी सोयाबीनची (soybean arrivals) आवक वाढूनही दर 5200 चा मिळाला होता. सोमवारी आवक कमी होऊनही देखील 150 रुपयांनी दर हे घसरले होते. त्यामुळे सोयाबीनची विक्री करावी की साठवणूक हा प्रश्न कायम आहे.
खरीपातील मुख्य पीक असलेल्या सोयाबीनमधून शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडलेली आहे. दिवाळीनंतर दरात सुधारणा होईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र, दिवाळीनंतरच्या पहिल्याच दिवशी बाजाप समितीमध्ये सोयाबीनच्या दरात घसरण पाहायला मिळाली त्यामुळे भविष्यात काय होणार याची चिंता कायम आहे. हंगामाच्या सुरवातीला सोयाबीनच्या वाढत्या दरामुळे आशादायी चित्र निर्माण झाले होते. पण वाढते दर हे काही दिवसांपूरतेच मर्यादित राहिले. गेल्या दोन महिन्यांपासून सुरु असलेली घसरण कायम आहे.
शेतकऱ्यांना आशा आहे की सोयाबीनचे दर हे भविष्यात तरी वाढतील. शिवाय सोया पेंडची आवक झाली तरी त्याचा फारसा परिणाम सोयाबीनच्या दरावर होणार नसल्याचे सांगितले जात आहे. पण प्रत्यक्षात स्थिती ही वेगळीच असून सोयाबीनची आवक घटूनही दर हे कमीच होत आहेत. तर दुसरीकडे कापसाच्या दरात वाढ होत आहे. दिवाळीनंतर सोयाबीनचे दर वाढतील या आशेने शेतकऱ्यांनी सोयाबीनची साठवणूक केली आहे. किमान 6 हजाराचा दर मिळावा ही शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. जर दरात सुधारणा झाली नाही तर सोयाबीन हे साठवूनच ठेवले जाईल
हंगामाच्या सुरवातीपासून सोयाबीनच्या दरात घसरण तर उडदाचे भाव वाढत आहेत. त्यामुळे प्रतिकूल परस्थितीमध्ये उडदाचीच विक्री करुन शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाची तयारी केली होती. दिवाळी निमित्त बाजार समित्या बंद होण्यापूर्वी उडदाला 7 हजाराचा दर होता तर आज सोमवारी उडदाला 7400 चा दर मिळाला आहे. आता पर्यंत उडदाच्या दरात घसरण तर झालीच नाही पण दर स्थिर राहिल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. सोयाबीनच्या दराने मात्र, शेतकऱ्यांची निराशाच केलेली आहे.
दिवाळीनिमित्त लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती ही गेल्या 7 दिवसांपासून बंद होती. त्यामुळे सर्व व्यवहार हे ठप्प होते. दरम्यान, सोयाबीन विक्रीसाठी प्रक्रिया उद्योग यांचा आधार घेतला तर अनेक शेतकऱ्यांनी शेतीमाल तारण योचनेचा लाभ घेतला. या योजनेच्या माध्यमातून सोयाबीनची साठवणूक तर झालेली आहेच पण या मालावर शेतकऱ्यांना कर्जही मिळाले आहे. आता दर असेत घटत राहिले तर शेती माल तारण योजनेवरच शेतकऱ्यांचा भर राहिल.
लातूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दुपारी 12 च्या दरम्यान शेतीमालाचे सौदे होतात. सोमवारी लाल तूर- 6200 रुपये क्विंटल, पांढरी तूर 6150 रुपये क्विंटल, पिंकू तूर 6000 रुपये क्विंटल, जानकी चना 4800 रुपये क्विंटल, विजय चणा 4950, चना मिल 4800, सोयाबीन 5300, चमकी मूग 7200, मिल मूग 6250 तर उडीदाचा दर 7400 एवढा राहिला होता.
पांढऱ्या कापसाला ‘सोन्या’चा भाव, तोडणीसाठी मात्र मजूरांचा आभाव
‘झामा’ ची सेंद्रिय शेती, शेतकऱ्यांना फायदा अन् ग्राहकांना दर्जेदार अन्न पुरवठा
ही माहिती गरजेची..! जमिनीचे सरकारी भाव कसे ठरतात अन् कुठे पहायचे ?