लातूर : सोयाबीन हे खरीपातील (Soyabean) मुख्य पीक आहे. दरवर्षी सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ होत आहे. मात्र, त्या तुलनेत उत्पादनात वाढ होत नाही. शेतकऱ्यांकडून वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत मात्र, (natural crisis) नैसर्गिक संकट आणि बाजारभावाचे धोरण यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी कायम निराशाच राहिलेली आहे. यंदा तर ही दोन्हा संकटे मिळूनच आल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. मात्र, खरीपात झालेले नुकसान काढण्यासाठी (Rabbi Season) रब्बीत कशा प्रकारे सोयाबीनचे नियोजन केले जाते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. त्यामुळे रब्बीतही सोयाबीन पीक घेतले जाते मात्र, याचे प्रमाण कमी आहे. पण योग्य नियोजन केले तर उत्पादनाता वाढवता येते. याबाबत आपण जाणून घेणार आहोत.ॉ
रब्बी हंगामातील प्रमुख पीक हे हरभरा आहे. शिवाय त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ज्वारीची लागवड केली जाते. पण यंदा खरीपात सोयाबीनचे नुकसा झाल्याने रब्बीतही त्याचा पेरा होऊ शकतो. त्यामुळे रब्बीतील सोयाबीनची उत्पादकता वाढवायची असेल तर काय करावे
रब्बी म्हणजेच उन्हाळी सोयाबीसाठी हलक्या प्रतीची जमिन आवश्यक आहे. शिवाय यंदा अधिकचा पाऊस झालेला आहे त्यामुळे ज्या जमिनीत पावसाचे पाणी साचून राहणार असे अशा जमिनीत सोयाबीनची लागवड करु नये. त्यामुले हलक्या प्रतिच्या जमिनीत सोयाबीन घेतले तर उत्पादनात वाढ होणार आहे. जास्त आम्लयुक्त, क्षारयुक्त तथा रेताड जमिनीत लागवड करू नये. जमिनीत सेंद्रिय कर्बाची मात्रा चांगल्या प्रमाणात असली पाहिजे. तसेच या पिकाला सुर्यप्रकाश कमी असला तरी अशा वातावरणातच वाढ मोठ्या प्रमाणात आहे. उष्ण हवामान सोयाबीनसाठी पोषक राहते. खरीपातील उत्पादकता घटण्याचे कारण म्हणजे अधिकच्या प्रमाणात झालेला पाऊस हेच आहे. त्यामुळे उन्हाळी सोयाबीनच्या पाण्याचेही नियोजन करता येते.
मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या एमएयूएस 47 (परभणी सोना), एमएयूएस 61 (प्रतिकार), एमएयूएस 61-2 (प्रतिष्ठा), एमएयूएस 71 (समृद्धी), एमएयूएस 81 (शक्ती), एमएयूएस 158, एमएयूएस 162 इ. सुधारित वाणांची निवड करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. शिवाय रब्बी हंगामातील सोयाबीनची लागवड ही पाऊस स्थिर झाल्यावरच करणे आवश्यक आहे. सध्या मान्सूनचा पाऊस परतला आहे. अशा परस्थितीमध्ये पेरा केला तर उत्पादनात वाढ होणार आहे.
सोयाबीन पिकाच्या मुळांवरती रायझोबियम हा उपयुक्त जीवाणू राहत असल्याने या पिकांस वरुन नत्र खताची फारशी गरज भासत नाही. सोयाबीनच्या मुळांवरील गाठी निट तयार होण्यासाठी पेरणी सोबत किंवा रोप उगवल्यानंतर लगेच 10 किलो फेरस सल्फेट 1 एकरात जमिनीतुन द्यावे. सोयाबीन पिकांत शेंगा पोसत असतांना गंधक युक्त खतांचा वापर करावा. या खतातून पिकांस उपलब्ध होईल अशा स्वरुपात गंधक मिळविण्यासाठी सल्फर ऑक्झिडाझिंग बॅक्टेरियाचा वापर करणे गरजेचे आहे. फुलोऱ्यात किंवा शेंगा पोसण्याच्या अवस्थेत विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. या कालावधीत 15 ते 20 दिवसांच्या फरकाने पाणी दिल्यास शेंगा भरणार आहेत. (Soyabean production can be taken even during rabi season.)
शेतकऱ्यांशी दुजाभाव, 64 साखर कारखानदारांची दिवाळी कडवट
ऊस बिलातून वीज बील वसुलीचा निर्णय जुनाच, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचं स्पष्टीकरण
तुम्हाला माहिती आहे का पिकांची अंदाजित उत्पादकता कशी ठरवली जाते? जाणून घ्या