लातूर : दोन महिन्याच्या तुलनेत बाजारपेठेत आता नेमके उलटे चित्र सुरु झाले आहे. यापूर्वी दर वाढत असतानाही शेतकरी सोयाबीन विक्रीस तयार नव्हते तर आता (Arrivals Increased) आवक दिवसागणीस वाढत आहे पण (Soybean Rate) दरात मात्र, काहीच सुधारणा होत नसल्याने शेतकरी द्वीधा मनस्थितीमध्ये आहे. आता भविष्यात दर वाढणार की यापेक्षा कमी होणार याबाबत शंका उपस्थित होत आहे. (Farmers worried ) शेतकऱ्यांनी मात्र, दोन्हीबाजूंनी सुरक्षित राहण्यासाठी टप्प्याटप्प्याने सोयाबीनची विक्री करण्याचा सल्ला कृषितज्ञांनी दिला आहे. आता सध्या सोयाबीनचे मार्केट हे स्थिर नाही. त्यामुळे कोणत्या निकषापर्यंतही पोहचता येत नाही. मध्यंतरी सोयापेंड आयातीची चर्चा सुरु असतनादेखील सोयाबीनच्या दरात वाढ होत होती. पण आता हा निर्णय केंद्र सरकारने माघारी घेतला असताना देखील त्याचा परिणाम हा दरवाढीवर होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता योग्य निर्णय घेतला तरच फायद्याचे राहणार आहे.
15 दिवसांपूर्वी सोयाबीनचे दर हे 6 हजार 600 वर गेले होते. दरम्यान, सोयापेंड आयातीची चर्चा ही सुरुच होती. त्यामुळे सोयापेंड आयातीला ‘ब्रेक’ लागल्यानंतर आता पुन्हा दरात वाढ होईल अशी अपेक्षा होती पण झाले उलटेच. सोयाबीनचे दर हे घटत आहेत तर आवक वाढत आहे. (Latur Agricultural Income Market Committee) लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी 14 हजार पोत्यांची आवक झाली होती तर सरासरी दर हा 6 हजार 100 रुपये होता. आता शेतकरी सोयाबीन विक्रीसाठी तयार आहे मात्र, बाजारात उठावच नाही. त्यामुळे आता काय निर्णय घ्यावी याची चिंता शेतकऱ्यांना आहे. अनेक शेतकऱ्यांनी अधिकच्या दराच्या अपेक्षेने सोयाबीनची साठवणूक केलेली आहे. पण आता दर हे घटत तरी आहेत अन्यथी स्थिर राहत आहेत.
गेल्या दोन महिन्यांपासून सोयाबीनच्या दरात वाढ होणार हा शेतकऱ्यांना विश्वास होता. पण आता बाजारातील चित्र पाहून शेतकरी हे हवालदिल झाले आहेत. कारण सर्वकाही पोषक असताना जर सोयाबीनचे दर वाढत नसतील तर उद्या उन्हाळी सोयाबीन बाजारात दाखल झाल्यावर साठवलेल्या सोयाबीनचे काय हा प्रश्न आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा भर विक्रीवर आहे. पण शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने विक्री केली तर फायदा होणार असल्याचे कृषितज्ञ रामेश्वर चांडक यांनी सांगितले आहे.
लातूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दुपारी 12 च्या दरम्यान शेतीमालाचे सौदे होतात. गुरुवारी लाल तूर- 6311 रुपये क्विंटल, पांढरी तूर 6200 रुपये क्विंटल, पिंकू तूर 6100 रुपये क्विंटल, जानकी चना 4870 रुपये क्विंटल, विजय चणा 4850, चना मिल 4750, सोयाबीन 6300, चमकी मूग 7240, मिल मूग 6150 तर उडीदाचा दर 7500 एवढा राहिला होता.