Soybean : शेतकऱ्यांचं हजारो क्विंटल सोयाबीन घरातचं, भाव वाढीची आशा, मात्र किती दिवस वाट पाहवी हा प्रश्न

| Updated on: Jan 29, 2023 | 9:39 AM

मागील दोन दिवसापासून सोयाबीनचे दर पुन्हा दोनशे रुपयांनी कमी होऊन आता थेट पाच हजार पर्यंत येऊन पोहोचल्याने सोयाबीन ठेवावा की विकावं असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

Soybean : शेतकऱ्यांचं हजारो क्विंटल सोयाबीन घरातचं, भाव वाढीची आशा, मात्र किती दिवस वाट पाहवी हा प्रश्न
soybean
Image Credit source: tv9marathi
Follow us on

सुरेंद्रकुमार आकोडे, अमरावती : गेल्यावर्षी या दिवसात सोयाबीनला (soybean) 7 हजार रुपयापर्यंत दर होता, मागील तीन महिन्यांपासून सातत्याने सोयाबीन दर कमी होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना (farmer) दर वाढीची आशा आहे. राज्यातील शेतकऱ्यांचे हजारो क्विंटल सोयाबीन घरातचं पडून असल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. शेतकऱ्यांनी अजून दर वाढीची किती दिवस वाट पहावी असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. सध्याचा दर पाच हजार असल्यामुळे शेतकऱ्यांचं अधिक नुकसान (crop damage) होणार आहे.

TV9 Marathi Live | Shinde VS Thackeray | BJP Protest | Pune Election | Parishad Election | Politics

मागील वर्षी याच महिन्यात सोयाबीनचे दर 7 हजार पर्यंत जाऊन पोहोचले असताना, आता गेल्या तीन महिन्यापासून सातत्याने सोयाबीन दर अधिकाधिक कमी होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सोयाबीनच्या दरवाढीची आशा असून अमरावती जिल्ह्यसह राज्यातील हजारो क्विंटल सोयाबीन शेतकऱ्यांच्या घरातच पडून असल्याने सोयाबीन घरी ठेवावा की विकावं असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा आहे. सोयाबीनची पेरणी,काढणी करेपर्यंत शेतकऱ्यांनी हजारो रुपये आपल्या पिकांवर खर्च केली.त्यामध्ये महागडे बी बियाणे ,औषधे,फवारणी,खत व्यवस्थापन केली.

हे सुद्धा वाचा

मात्र आता गेल्या चार महिन्यापासून सोयाबीन शेतकऱ्यांच्या घरात पडून असल्याने समोरचा आर्थिक व्यवहार कसा करावा असा प्रश्न आता शेतकऱ्यांपुढे उभा आहे.मागील दोन दिवसापासून सोयाबीनचे दर पुन्हा दोनशे रुपयांनी कमी होऊन आता थेट पाच हजार पर्यंत येऊन पोहोचल्याने सोयाबीन ठेवावा की विकावं असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.