मुंबई : लोकांना वाटते की, फक्त पारंपरिक शेतीतून चांगली कमाई होऊ शकते. पण, असं काही नाही. शेतकरी गोल्ड फिशचे पालन करून चांगला नफा कमवू शकतात. लोकांची मान्यता आहे की, यात्रेला निघण्यापूर्वी गोल्ड फिशचे दर्शन घेणे लकी आहे. गोल्ड फिशचे दर्शन केल्याने यात्रा चांगल्या पद्धतीने होते. रस्त्यात कोणत्याही प्रकारची अडचण होत नाही. त्यामुळे बाजारात गोल्ड फिशची मागणी बाजारात वाढत आहे. शेतकरी जर गोल्ड फिशचे पालन पोषण करत असतील, तर त्यांना चांगला नफा मिळू शकतो.
माध्यमातील माहितीनुसार, भारतात गोल्ड फिशचा व्यवसाय चांगल्या पद्धतीने ग्रोथ होत आहे. गोल्ड फिशचे पालन करण्यासाठी जास्त जागेची आवश्यकता नाही. एखाद्या खोलीतही गोल्ड फिशचे पालन करता येईल. तुम्ही गोल्ड फिशचे पालन सुरू करू शकत असाल तर, एक्चेरीयम खरेदी करून आणा. त्यामध्ये गोल्ड फिशचे सीड टाकता येतील.
सीड खरेदी करताना त्यात मेल-फिमेल असतील, याची खात्री करून घ्या. १ ते अडीच लाख रुपये खर्च करावे लागतील. यासाठी तुम्हाला १०० वर्गफुटाचा एक्चेरीयमची किमत सुमारे ५० हजार रुपये आहे. तसेच इतर साहित्य खरेदी करण्यासाठी ५० हजार रुपयांचा खर्च येतो.
परंतु, पाच महिन्यांनंतर तुम्ही चांगली कमाई करू शकता. आता बाजारात एका गोल्ड फिशचा रेट २५०० रुपयांपासून ते ३० हजार रुपयांपर्यंत आहे. अशावेळी तुम्ही गोल्ड फिश विकून चांगली कमाई करू शकता.
फिशरी व्यवसायासाठी तलाव किंवा शेततळे गरजेचे असतात. पण, गोल्ड फिशसाठी एखाद्या खोलीतूनही हा व्यवसाय सुरू करता येतो. त्यामुळे काम सुरू करायला हरकत नाही. गुंतवणूकही काही खूप मोठी नाही.