मावळात केवळ ऊस, भातशेतीच नाही तर स्ट्रॉबेरीचेही उत्पादन

| Updated on: Nov 15, 2021 | 3:21 PM

भौगोलिक स्थितीनुसार पिकांचे उत्पादन ही देशातील शेती व्यवसयाची परंपरा आहे. पण काळाच्या ओघात यामध्ये बदल होत आहे. मावळमध्ये केवळ ऊस आणि भातशेतीवरच भर दिला जात होता पण या भागात आता स्ट्रॉबेरीचेही उत्पादन घेता येते हे शेतकऱ्याने दाखवून दिले आहे.

मावळात केवळ ऊस, भातशेतीच नाही तर स्ट्रॉबेरीचेही उत्पादन
Strawberry
Follow us on

मावळ : भौगोलिक स्थितीनुसार पिकांचे उत्पादन ही देशातील शेती व्यवसयाची परंपरा आहे. पण काळाच्या ओघात यामध्ये बदल होत आहे. मावळमध्ये केवळ ऊस आणि भातशेतीवरच भर दिला जात होता पण या भागात (Strawberry Production) आता स्ट्रॉबेरीचेही उत्पादन घेता येते हे शेतकऱ्याने दाखवून दिले आहे. एवढेच नाही तर येथील स्ट्रॉबेरीला आंतराष्ट्रीय बाजारपेठेत देखील मागणी वाढत आहे. आतापर्यंत स्ट्रॉबेरी म्हणलं की महाबळेश्वरच हेच नाव समोर येत होते. हिवाळ्यात महाबळेश्वरला जाऊन लाल, केशरी स्ट्रॉबेरीचा आस्वाद घेतला जात होता पण आता  (Maval) मावळमध्येही हे शक्य असल्याचे येथील शेतकऱ्याने दाखवून दिले आहे.

शेतीमध्ये वेगळे प्रयोग राबवले तर ते यशस्वी होतात हे मावळमधील प्रदीप धामणकर यांनी दाखवून दिले आहे. त्यांनी मोठ्या प्रमाणात स्ट्रॉबेरीची लागवड केली नाही तर केवळ 30 गुंठ्यात लागवड केली होती. योग्य नियोजन आणि परिश्रमाच्या जोरावर त्यांनी हे पिक घेतले आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दीड हजार प्रतिकिलो दर

मावळ तालुका हा थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. त्याचप्रमाणे भाताचे आगार म्हणून देखील मावळ प्रसिद्ध आहे. भात शेतीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या मावळ तालुक्यात आता स्ट्रॉबेरी देखील येऊ लागली आहे. महाबळेश्वरमध्ये पिकणारी ‘विंटर डाऊन’ नावाची स्ट्रॉबेरी प्रजाती आता मावळात देखील येऊ लागली आहे. मावळमधील शेतकरी प्रदीप धामणकर यांनी महाबळेश्वर येथून विंटर डाऊन या जातीच बीज आणली त्याची लागवड केली होती. तीस गुंठ्यात पंधरा हजार झाडे लावून स्ट्रॉबेरीचे उत्पन्न घेतलं जातं आहे. विशेष म्हणजे या स्ट्रॉबेरीला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मागणी आहे. एक हजार ते पंधराशे रुपये किलोने या स्ट्रॉबेरीची विक्री आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत केली जाते. प्रामुख्याने दुबई, मस्कत, सिंगापूर या देशांमध्ये मावळातील ही स्ट्रॉबेरी पाठवली जाते.

किमान 20 लाखाचा नफा

स्ट्रॉबेरीच हे उत्पन्न घेण्यासाठी प्रदीप धामणकर यांना केवळ पाच लाख रुपये खर्च आला. तर आता स्ट्रॉबेरी तयार होऊन आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विक्री झाल्यावर त्यांना किमान पंचवीस लाख रुपये नफा होण्याची आशा आहे. 30 गुंठे जमिनीत त्यांनी गादी वाफे तयार करून त्यावर गीर गायीचं गोमूत्र टाकून उत्पन्न काढले. एका रोपट्याला किमान एक किलो स्ट्रॉबेरी येत असल्याचे देखील धामणकर यांनी सांगितले आहे. मावळमधील शेतकऱ्यांनी केवळ भात, ऊस या पिकांवर अवलंबून न राहता असे विविध प्रयोग करून उत्पन्न घ्यावे असे देखील आवाहन त्यांनी केले आहे.

योग्य नियोजनाची आवश्यकता

मावळ तालुक्यात केवळ पारंपारिक पिकांवर भर दिला जातो. मात्र, येथील हवामान स्ट्रॉबेरीसाठीही पोषक आहे. यासंदर्भात कृषी विभागाचे मार्गदर्शन घेऊन धामणकर यांनी केवळ पाऊन एकरामध्ये स्ट्रॉबेरीची लागवड केली होती. नियमित पाणी आणि खताची मात्रा दिल्यानेच उत्पादनात वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले आहे. शिवाय शेतकऱ्यांनी पारंपारिक पिकावरच भर न देता वेगवेगळे प्रयोग राबवणेही महत्वाचे असल्याचे सांगितले आहे. त्यांना आता या उत्पादनातून 20 लाखांचा निव्वळ नफा होईल अशी आशा आहे.

संबंधित बातम्या :

रेशीम उद्योगाला मिळणार उभारी, महारेशीम अभियनात रेशीम रथ पोहचणार गावागावात

सोयाबीनच्या दरात होतेय सुधारणा, शेतकऱ्यांना काय आहे मोलाचा सल्ला..?

फवारणी पिकांची अन् जीव धोक्यात शेतकऱ्यांचा, अशी घ्या काळजी..!