लातूर : यंदा सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झालेला आहे. त्यामुळे (Rabbi Hangam) रब्बी हंगामात उत्पादन वाढीसाठी (Agree Department) कृषीविभागाचे प्रयत्न हे सुरु आहेत. या हंगामात (chickpea main crop) हरभरा हे मुख्य पीक असून याच पीकाची अधिकच्या क्षेत्रावर पेरणी करण्याच्या अनुशंगाने कृषी विभागाचे प्रयत्न हे सुरु आहेत. एवढेच नाही या विभागाने प्रमाणीत केलेले बियाणे शेतकऱ्यांना अनुदानावर देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. प्रतिक्विंटल 2500 हजार रुपये अनुदान असणार आहे तर एका शेतकऱ्याला 5 एकरापर्यंतच हे बियाणे दिले जाणार आहे. त्यामुळे खर्चाअभावी शेतकरी हरभरा लागवडीकडे दुर्लक्ष करणार नाही हा कृषिविभागाचे उद्देश आहे. मात्र, अनुदानित बियाणे मिळवायचे कसे याचीही माहिती शेतकऱ्यांना असणे आवश्यक आहे.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानातून प्रमाणित हरभरा बियाणे वितरणासाठी सोमवारपासून राज्यभर सुरवात झालेली आहे. हरभऱ्याचे क्षेत्र वाढून शेतकऱ्यांना याचा अधिक लाभ करुन देण्याचा उद्देश कृषी विभागाचा राहिलेला आहे. या करिता 38 कोटी रुपयांचे बियाणे उपलब्ध करुन देण्यात आले आहे. 24 ऑक्टोंबरपर्यंतच नोंदणी केलेल्य़ा शेतकऱ्याला हे बियाणे मिळणार आहे. राज्यातीत सर्वच जिल्ह्यांना यासंबंधिचा लक्षांक ठरवून देण्यात आला आहे. शिवाय या उपक्रमाला सुरवात झाली आहे.
सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाल्याने खरीपातील पीकांचे मोठे नुकसान झाले होते. मात्र, हा पाऊस आता रब्बी हंगामासाठी पोषक ठरणार असल्याचा दावा कृषी विभागाकडून करण्यात आलेला आहे. त्यामुळे यंदा हरभरा उत्पादन वाढीवर भर राहणार आहे. जमिनीत योग्य प्रमाणात ओलावा असल्याने या पीकाची वाढही जोमात होणार आहे. त्यामुळे यंदा राज्यात 33 लाखाहून अधिकच्या क्षेत्रावर हरभरा लागवड होईल असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळेच जास्तीत-जास्त बियाणे उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न सरकारचा राहिलेला आहे.
हरभरा बियाणांची उगवण क्षमता चांगला असावी यासाठी कृषी विभागाने प्रयत्न केले आहेत. यामध्ये पीडीकेव्ही कांचन, फुले विक्रांत, फुले विक्रम, बीडीएनजीके अशा वाणांचा समावेश राहणार आहे. या रब्बी हंगामात किमान 1 लाख 97 हजार क्विंटल बियाणाचे वाटप केले जाणार आहे. यामधील काही बियाणे हे पीक प्रात्याक्षिकसाठी ठेवण्यात येणार असून उर्वरीत बियाणे हे 2500 रुपये अनुदावर दिले जाणार आहे.
अनुदानावर बियाणे घ्यावयाचे झाल्यास त्या शेतकऱ्याने महाडिबीटी द्वारे यापूर्वीच नोंद करणे आवश्यक आहे. ही प्रक्रीया महिन्याभरापूर्वीच पार पडलेली आहे. त्यामुळे आता ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे शेतकऱ्यांची सोडत ही तालुका कृषी कार्यालयात काढली जाणार आहे. यामध्ये जर शेतकऱ्यांचे नाव आले तर बियाणे खरेदीचा परवाना हा तालुका कृषी कार्यालयातून घ्यावा लागणार आहे. परवान्यावर नोंद असलेल्या दुकानी जाऊन अनुदानाची रक्कम वगळून शेतकऱ्याला हरभऱ्याचे बियाणे हे मिळणार आहे. मात्र, बियाणे घेताना शेतकऱ्याकडे सातबारा, 8 अ, आधार कार्ड असणे गरजेचे आहे. (Subsidy on chickpea seeds, record cultivation of chickpeas this year, agriculture department’s initiative)
बोंबला…! विमा अर्जांचे गठ्ठे थेट ऊसाच्या फडात, मदत मिळणार तरी कशी ?