बीड : साखर कारखान्यांचा गाळप हंगाम पुढील महिन्यात सुरु होत आहे. त्याअनुशंगाने मंत्रीमंडळाची बैठकही पार पडलेली आहे. गाळप हंगाम सुरु होण्यापूर्वी शेतकऱ्यांकडून एफआरपी रकमेसाठी आंदोलने सुरु होत आहेत, बीडच्या शेतकऱ्यांनी मात्र, वेगळीच भूमिका घेतलेली आहे. जिल्ह्यात ऊसाचे क्षेत्र हे वाढलले आहे. त्यामुळे प्रथम जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या ऊसाला प्राधान्य देण्यात यावे व नंतर इतर जिल्ह्यातील ऊसउत्पादकांचा विचार करण्यात यावा अशी मागणी शेतकरी आणि शेतकरी नेते यांनी केली आहे.
गेल्या दोन वर्षापासून मराठवाड्यात समाधानकारक पाऊस होत आहे. त्यामुळे सोयाबीन बरोबरच ऊसाच्या क्षेत्रातही वाढ होत आहे. मात्र, कारखानदारांकडून ऊस गाळप प्रसंगी राजकारण केले जाते. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बाजूला सारुन इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा ऊस गाळप केला जातो. त्यामुळे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या ऊसाचे नुकसान होते त्यामुळे जिल्ह्यातील कारखान्यांनी इतर जिल्ह्यातील ऊस घेतल्यास ऊसाच्या गाड्या आडविल्या जाणार असल्याचा इशारा शेतकरी नेते भाई गंगाभिषण थावरे यांनी दिला आहे.
अतिरीक्त ऊस कारखान्यावर न गेल्याने 2007 मध्ये नानाभाऊ शिंदे या शेतकऱ्याने आत्महत्या केली होती. त्या प्रमाणेच पुन्हा परस्थिती होऊ नये याची खबरदारी कारखान्यांनी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले आहे. आगामी ऊस गाळपाच्या दृष्टीने वडवणी येथे ऊस परिषद पार पडली आहे. या दरम्यान, थावरे यांनी ही भुमिका व्यक्त केली आहे.
बीड जिल्हा तसा दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो. मात्र, गेल्या काही वर्षापासून समाधानकारक पाऊस होत असल्याने ऊसाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. 2007 मध्येही ऊसाचे क्षेत्र वाढले होते. मात्र, इतर जिल्ह्यातील अतिरीक्त ऊस कारखान्यांवर आल्याने शेतकरी नानाभाऊ शिंदे यांचा ऊस हा फडातच राहिला होता. त्यामुळे त्यांनी आत्मुहत्या केल्याचे थावरे यांनी सांगितले आहे. यंदाही मोठ्या प्रमाणात ऊसाचे गाळप होणार आहे. त्यामुळे कारखान्यांनी जिल्ह्यातील ऊसाचा आगोदर विचार करण्याची मागणी केली आहे.
या गाळप हंगामात केंद्र शासनाने निश्चित केलेल्या एफआरपी दराप्रमाणे 10 टक्के उताऱ्यासाठी 2900 रुपये प्रतिटन दर निश्चित करण्यात आला आहे. 2021-22 मध्ये राज्यात ऊस लागवडीचे क्षेत्र 12.32 लाख हेक्टर असून 97 टन प्रति हेक्टर उत्पादन अपेक्षित आहे. 1096 लाख मे.टन उसाचे गाळप होण्याचा अंदाज असून 112 लाख टन साखर उत्पादित होण्याची शक्यता आहे. या हंगामात अंदाजे १९३ साखर कारखाने सुरु राहतील असा अंदाज बांधण्यात आला आहे. (Sugar factories should give priority to sugarcane growers in Beed district, Beed Role of farmers in the district)
उभारणीपासून 14 वेळा भरले मांजरा धरण, काय होता उद्देश आणि सध्याचे वास्तव
….म्हणून राज्य सरकारला ई-पीक पाहणीची गरज भासली, पडद्यामागची गोष्ट
कांदा उत्पादकांचे योग्य टाईमिंग, साठवलेल्या कांद्यातून शेतकऱ्यांची चांदी