Sugarcane : पश्चिम महाराष्ट्रातील कारखान्यांची धुराडी बंद, मराठवाड्यातील ऊस उत्पादकांचा जीव मात्र टांगणीला

| Updated on: May 04, 2022 | 12:13 PM

यंदाच हंगाम पार पाडण्यामध्ये साखर कारखान्यांसह उसतोड कामगारांची महत्वाची भूमिका राहिलेली आहे. त्यामुळेच वेळेत गाळप झाले आहे. परिणामी शेतकऱ्यांचे नुकसान टळले असून यामध्ये कामगारांनी घेतलेली भूमिका महत्वाची ठरली आहे. कामगारांचे हे योगदान लक्षात घेताच साखर कारखाना प्रशासनाकडून उसतोड कामगारांना 15 दिवसांचा पगार बोनस म्हणून दिली जाणार आहे.

Sugarcane : पश्चिम महाराष्ट्रातील कारखान्यांची धुराडी बंद, मराठवाड्यातील ऊस उत्पादकांचा जीव मात्र टांगणीला
पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्याचे गाळप अंतिम टप्प्यात आहे.
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

सोलापूर : एका मागून एक पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखाने बंद होत आहेत. शिवाय हे (Sugar Factory) साखर कारखाने आपले उद्दीष्ट पूर्ण करुन हे साखर कारखाने (Sugar Commissioner) साखर आयुक्तांची परवानगी घेऊन गाळप बंद केले जात आहेत. पश्चिम महाराष्ट्रतील (Sugarcane Sludge) उसाचे गाळप अंतिम टप्प्यात असताना उत्पादकांना दिलासा मिळत आहे पण दुसरीकडे मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या समस्या ह्या कायम आहेत. कारण मे महिन्याचे आठ दिवस उलटले असतानाही तब्बल 50 हजार हेक्टरावर अतिरिक्त उस हा फडातच उभा आहे. तर करमाळा तालुक्यातील श्री देवीचा माळ येथील कमलाभवानी साखर कारखान्याचे गाळप हे बंद झाले आहे. यावर्षीच्या हंगामात 7 लाख 15 हजार टन ऊसाचे गाळप केले आहे.

कारखान्याकडून कामगारांना बोनस

यंदाच हंगाम पार पाडण्यामध्ये साखर कारखान्यांसह उसतोड कामगारांची महत्वाची भूमिका राहिलेली आहे. त्यामुळेच वेळेत गाळप झाले आहे. परिणामी शेतकऱ्यांचे नुकसान टळले असून यामध्ये कामगारांनी घेतलेली भूमिका महत्वाची ठरली आहे. कामगारांचे हे योगदान लक्षात घेताच साखर कारखाना प्रशासनाकडून उसतोड कामगारांना 15 दिवसांचा पगार बोनस म्हणून दिली जाणार आहे. एकंदरीत पश्चिम महाराष्ट्रात उसतोडीचे झालेले नियोजन, आणि गाळपामधील सातत्य यामुळे अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण झाला नाही.

मराठवाड्यात यंत्रणा कार्यन्वित

यंदा मराठवाड्यातील अतिरिक्त उसाचा प्रश्न बिकट झाला आहे. सर्वाधिक अतिरिक्त ऊस हा मराठवाड्यातच आहे. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी एक ना अनेक पर्याय हे समोर आले होते पण अखेर परजिल्ह्यातील वाहतूक यंत्रणा कामी येत आहे. हंगामाच्या अंतिम टप्प्यात का असेना तोड होऊ लागल्याने दिलासा आहे. पण सर्वच जिल्ह्यांमध्ये ही परस्थिती नाही तर उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यात अतिरिक्त उसाला घेऊन शेतकरी चिंतेत आहेत.

हे सुद्धा वाचा

7 लाख 15 हजार टन उसाचे गाळप

करमाळा तालुक्यातील श्री देवीचा माळ येथील कमलाभवानी साखर कारखान्याने यंदाच्या हंगामात 7 लाख 15 हजार टन उसाचे गाळप केले आहे. शिवाय सभासद शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी साखर कारखान्याने घेतलेली भूमिका ही महत्वाची ठरली आहे. या सहा महिन्याच्या काळात हे गाळप करण्यात आले असून आता साखर आयुक्तांच्या परवानगीने कारखान्याचे गाळप हे बंद करण्यात आले आहे. पश्चिम महाराष्ट्रातून आता उसतोड कामगार हे परतीच्या वाटेवर आहेत.