गाळप हंगाम सुरु होताच ऊस वाहतूकदार, मुकादमांचा कोयता बंद मेळावा

| Updated on: Oct 15, 2021 | 7:10 PM

ऊस वाहतूकदार आणि मुकादमाच्या अडचणी सुरु झाल्या आहेत. त्यामुळेच उद्या (शनिवारी) या दोन्ही घटकांचे प्रश्न घेऊन सांगली येथे ऊसतोड मुकादम आणि वाहतूकदारांचा कोयता बंद मेळावा घेण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र जनविकास ऊसतोड मंडळाचे संस्थापक अध्यक्ष हरिदास लेंगरे यांनी दिली.

गाळप हंगाम सुरु होताच ऊस वाहतूकदार, मुकादमांचा कोयता बंद मेळावा
संग्रहीत छायाचित्र
Follow us on

सांगली : यंदाचा ऊस गाळप हंगाम (sugarcane sludge season) शुक्रवारपासून सुरु झाला आहे. हंगामाच्या पहिल्याच दिवशी सर्व (Sugar Factory) साखर कारखाने सुरु झाले नसले तरी मुहुर्त पाहून साखर कारखाने सुरु होत असतात. असे असले तरी ऊस वाहतूकदार आणि मुकादमाच्या अडचणी सुरु झाल्या आहेत. त्यामुळेच उद्या (शनिवारी) या दोन्ही घटकांचे प्रश्न घेऊन सांगली येथे ऊसतोड मुकादम आणि वाहतूकदारांचा कोयता बंद मेळावा घेण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र जनविकास ऊसतोड मंडळाचे संस्थापक अध्यक्ष हरिदास लेंगरे यांनी दिली.

कारखान्यांकडून ऊसतोडणी मजुरांना उचल देण्यासाठी चार-पाच लाख दिले जातात. कामगार आठ – दहा लागतात. प्रत्येकाला लाखावर उचल दिल्याशिवाय ते ऊस तोडणीसाठी येत नाहीत. अनेक वेळा उचल देऊनही येत नाहीत. त्यामुळे मुकादम आणि ऊसतोडणी वाहतूकदारांचे आर्थिक नुकसान होते. त्याची जबाबदारी कोणीच घेत नाहीत. ऊसतोड मुकादम व ऊस तोड वाहतूकदार अडचणीत त्यामुळे कोयता बंद मेळावा घेतला जाणार आहे.

राज्यात 11 लाख ऊसतोड कामगार

राज्यात 101 सहकार, तर 87 खासगी कारखाने सुरू आहेत. 11 लाख ऊसतोड कामगार आहेत. चार-पाच लाख नोंदणीकृत आहेत. त्यामुळे कामगार हे काही बांधील नाहीत. ऊसतोडणीच्या नावाखाली ते उचल घेतात पण ऊसतोडणीसाठी येतच नाहीत. यावर कुणाचाच अंकूश नसल्याने वाहतूकदार आणि मुकादम यांचेच नुकसान होत आहे.

कारखान्यांकडून नियम पायदळी

ऊसतोड मजूरांसह वाहनधारक आणि मुकादम यांचे विमा काढण्याचे आदेश साखर आयुक्ताने साखर कारखान्यांना दिले होते. 2018 सालीच हे आदेश देण्यात आले होते अद्यापही त्यची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे साखर कारखाने अडचणीत आल्यावर सरकार अनुदान देते पण वाहतूकदार संकटात असताना मदत करीत नसल्याचा सूरही वाहतूकदारांमध्ये आहे.

ऊसतोड कामगारांना ओळखपत्र

महामंडळांतर्गत संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजना, आरोग्य विमा या व यांसारख्या अन्य योजनांचा लाभ देण्यासाठी ऊसतोड कामगार नोंदणी करून त्यांना ओळखपत्र देणे गरजेचे आहे. यासाठी संकलित केलेली माहिती संपूर्ण संगणकीकृत करून एका अँप द्वारे नोंदणी व ओळखपत्र प्रक्रिया आणखी सुलभ करण्यात येणार आहे. ऊसतोड कामगार बांधवांनी आवश्यक माहिती व कागदपत्रे वेळेत ग्रामसेवकांकडे जमा करून आपली नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. (Sugarcane transporters and mukadam’s Koyata Bandh Mela, Fair at Sangli)

संबंधित बातम्या :

शेतकऱ्यांनो सोयाबीनच्या घसरत्या दरातही ‘हाच’ निर्णय घ्या अन्यथा अधिकचे नुकसान….

‘अन्नत्याग’ नंतर आता लातूरात भाजपच्याच आमदाराची शेतकऱ्यांसाठी ‘पदयात्रा’

पावसाळी कांदा पिवळा पडलायं ? मग अशी करा उपाययोजना