मुंबई : नैसर्गिक संकटे, उत्पादनात घट आणि यामधून नैराश्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतच आहेत. (Farmer Suicide ) शेती व्यवसयात प्रगती होत असली तरी वाढत्या आत्महत्या या वास्तवाकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. एनसीआरबी च्या अहवालानुसार 2020 मध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या घटनांमध्ये 18% वाढ झाली आहे. यामध्ये दुर्देव म्हणजे महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या झालेल्या आहेत. शेती व्यवसयासाठी सरकारी योजना, विविध बाबतींमध्ये सवलती असे असताना देखील शेतकरी आणि शेतमजूर यांच्या आत्महत्यांमध्ये वाढ होत आहे. (Maharashtra has the highest number of farmer suicides ) एकट्या महाराष्ट्रात 4006 आत्महत्या ह्या झालेल्या आहेत. त्यामुळे 2019 नंतर 2020 मध्येही शेतकऱ्यांच्या आत्महत्येमध्ये महाराष्ट्रच आघाडीवर आहे.
सर्व सरकारी प्रयत्नानंतरही देशातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्यात असे वाटत नाही. 2019 च्या तुलनेत 2020 मध्ये शेतकरी आणि शेतमजू आत्महत्यांच्या घटनांमध्ये सुमारे 4 टक्क्यांनी वाढ आत्महत्या झाल्या आहेत. त्यानंतर कर्नाटकातील कृषी क्षेत्रातील 2016 आंध्र प्रदेश 889, मध्य प्रदेश 735 आणि छत्तीसगड 537 लोकांनी आत्महत्या केली. २०१९ मध्येही ही राज्ये या प्रकरणात इतर राज्यांच्या तुलनेत आघाडीवरच होती.
नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या (एनसीआरबी) ने गुरुवारी 28 ऑक्टोबर रोजी भारतात झालेल्या आत्महत्यांवरील आकडेवारी जाहीर केली आहे. यावरुन शेतकरी आणि शेतमजूर यांच्या आत्महत्या थांबण्याऐवजी वाढत आहेत. देशात 2020 दरम्यान कृषी क्षेत्रात एकूण 10,677 जणांनी आत्महत्या केल्या, ज्याचे प्रमाण एकूण आत्महत्यापैकी 7 टक्के आहे. यात 5579 शेतकरी आणि 5098 शेतमजूरांच्या आत्महत्यांचा समावेश आहे.
सलग चार वर्षे घट झाल्यानंतर कृषी क्षेत्रातील आत्महत्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. 2016 मध्ये एकूण 11379 शेतकरी आणि शेतमजूरांनी आत्महत्या केली. 2017 मध्ये ती 10655 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होत्या. यावर्षी प्रमाण हे घटले होते. 2018 मध्ये 10349 आणि 2019 मध्ये अशा एकूण 10281आत्महत्या झाल्या. 2020 मध्ये आत्महत्या प्रकरणांची संख्या 10677 एवढी होती. जी 2017 च्या तुलनेत वाढलेली आहे.
पंजाबमध्ये अशा एकूण 257 आणि हरियाणात 280 आत्महत्यांचे गुन्हे दाखल करण्यात आले. पश्चिम बंगाल, बिहार, नागालँड, त्रिपुरा, उत्तराखंड, चंदीगड, दिल्ली, लडाख, लक्षद्वीप आणि पुद्दुचेरी येथे शून्य आत्महत्येचे अहवाल आले. विशेष म्हणजे ही आकडेवारी शेतकरी आणि शेतमजूर अशी विभागली गेली आहे. येथे शेतकरी स्वत:ची जमीन असलेले आहेत आणि ते त्याची लागवड करतात, तर शेतमजूर म्हणजे ज्यांच्याकडे स्वतःची जमीन नाही आणि त्यांच्या उत्पन्नाचा स्रोत इतरांच्या शेतात काम करतात.
‘या’ तालुक्यात वर्षभरापूर्वीच सुरु झाली होती ‘शेत पाणंद रस्ते’ योजना सुरु
‘ई-पीक पाहणी’ अन् विमा परताव्यातही नांदेडच अव्वल, काय आहेत कारणं?