नाशिक : आजही आंदोलनासारख्या लोकशाही मार्गाचा अवलंब करुन न्याय मागितला जातो. या भूमिकेमुळे अनेकांना न्याय मिळतोही. देशातील प्रत्येकाला आंदोवलनाच्या माध्यमातून आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. मात्र, (Nashik Agricultural Income Market Committee) नाशिक येथील इदगाह मैदानावर गेल्या 5 महिन्यांपासून बाजार समितीमधील कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु होते. बाजार समितीच्या गैरप्रकाराबद्दल कर्मचाऱ्यांनी (Employees’ Agitation) आंदोलन सुरु केले होते. अखेर (Police Action) पोलीसांनी कर्मचाऱ्यांचे आंदोलन हे मोडीत काढले आहे. एवढेच नाही आंदोलनाची भूमिका घेतलेल्या कर्मचाऱ्यांचे निलंबनही करण्यात आले आहे.
गेल्या 153 दिवसांपासून येथील इदगाह मैदनात कृषी बाजार समिती संचालकाच्या कारभाराविरोधात आंदोलन सुरु होते. शांततेत आंदोलन सुरु असून एवढ्या दिवसानंतर का होईना न्याय मिळेल अशी भावना कर्मचाऱ्यांची झाली होती. अखेर हे आंदोलन तर मोडीत काढण्यात आले आहेच. शिवाय जे कर्मचारी या आंदोलनात नियमित उपस्थित होते त्यांचे निलंबन करण्यात आले आहे. त्यामुळे या कारवाईमागे नेमके कोण असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. कोट्यावधींचा भ्रष्टाचार बाहेर काढण्यापेक्षा कर्मचाऱ्यांवरच कारवाई हा कुठला न्याय अशी भावना कर्मचाऱ्यांची झाली आहे. पोलीसांनी आंदोलन मोडीत काढले बाजार समिती प्रशासनाने या सहभागी कर्मचाऱ्यांचे निलंबन केले आहे. त्यामुळे आता कर्मचारी काय भूमिका घेणार हे पहावे लागणार आहे.
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये संचालक मंडळाकडून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहेच शिवाय या गैरकारभाराची चर्चा सबंध बाजारपेठेत होत आहे. वाढत्या भ्रष्टाचारामुळे बाजार समितीच्या प्रतिष्ठेचा मुद्दा उपस्थित झाला होता. त्यामुळे संचालक मंडळातील सभापतीपासून सदस्यांपर्यंत चौकशी करण्याची मागणी येथील कर्मचाऱ्यांनी केली होती. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने अखेर कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे अस्त्र काढले. मात्र, कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाकडे ना प्रशासनाने लक्ष दिले ना येथील लोकप्रतिनीधींनी. प्रतिकूल परस्थितीमध्ये आंदोलन सुरुच होते. अखेर पोलीस प्रशासनाने हे आंदोलन मोडीत काढले आहे. त्यामागचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही.
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार मोठ्या प्रमाणात आहे. कांद्याची तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उलाढाल होत असते. मात्र, जेवढ्या प्रमाणात उलाढाल तेवढ्याच मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भ्रष्टाचार झाला असल्याचा कर्मचारी संघटनेने केला आहे. गेल्या 153 दिवसांपासून कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु होते. अखेर पोलीसांनी हे आंदोलन मोडीत काढले आहे. शांततेत सुरु असलेल्या आंदोलनाबाबत पोलीसांनी ही भूमिका का घेतली हा प्रश्न कायम आहे. आंदोलनामध्ये देखील राजकारण झाले असल्याचा कर्मचारी संघटनेचे निलेश दिंडे यांनी केला आहे.