दोन दिवस धोक्याचेच, वातावरणानुसार शेती पिकांची ‘अशी’ घ्या काळजी, कृषितज्ञांचा शेतकऱ्यांना काय सल्ला?

| Updated on: Dec 30, 2021 | 11:42 AM

अजून दोन दिवस अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरण हे कायम राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पावसापूर्वी आणि उघडीपीनंतर शेतकऱ्यांना नेमकी काय काळजी घ्यावी याचा योग्य माहिती असणे गरजेचे आहे. 

दोन दिवस धोक्याचेच, वातावरणानुसार शेती पिकांची अशी घ्या काळजी, कृषितज्ञांचा शेतकऱ्यांना काय सल्ला?
संग्रहीत छायाचित्र
Follow us on

नांदेड :  (Untimely rain) अवकाळी पावसाचा फटका केवळ विदर्भातील (crop damage) पिकांनाच बसला असे नाही तर दोन दिवसांपासून बीड, औरंगाबाद, परभणी आणि नांदेड या जिल्ह्यामध्ये झालेल्या पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान झाले आहे. शिवाय अजून दोन दिवस अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरण हे कायम राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पावसापूर्वी आणि उघडीपीनंतर शेतकऱ्यांना नेमकी काय काळजी घ्यावी याचा योग्य माहिती असणे गरजेचे आहे.

शेतकऱ्यांसाठी महत्वाचा सल्ला

गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे. शिवाय अजून दोन दिवस याचा धोका असल्याचे हवामान विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे. त्यामुळे या काळात शेतकऱ्यांनी शेतामध्ये उभ्या असलेल्या पिकांवर काही फवारणी करु नये. महागडी औषधे खरेदी करुन घाईगडबीत फवारणी केली आणि पावसाच्या सरी जरी बरसल्या तरी त्या फवारणीचा उपयोग होणार नाही. शिवाय सध्याच्य वातावरणामध्ये कोणत्या पिकावर कोणत्या अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. हे सांगणे देखील कठीण आहे. याकरिता शेतकऱ्यांना थोडी प्रतिक्षा ही करावीच लागणार आहे. त्यानंतरच कोणत्या पिकावर काय फवारावे लागणार हे स्पष्ट होईल असे कृषितज्ञ रामेश्वर चांडक यांनी सांगितले आहे. सध्या केवळ पिकावर कोणत्या किडीचा प्रादुर्भाव होतोय हे पाहणे गरजेचे आहे.

उघडीपीनंतर असे करा नियंत्रण

मोहरी पिकावर अधिकच्या किडीचा प्रादुर्भाव झाल्यास कोरड्या वातावरणात प्रति लिटर पाण्यात 0.25 मिली इमिडाक्लोपीड मिसळून फवारणी करणे गरजेचे आहे. तर हरभऱ्यावरील घाटीअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बांबूचे त्रिकोणी पक्षी थांबे ते ही प्रति एकरी 8 लावणे गरजेचे आहे. जैविक नियंत्रणासाठी एकरी दोन ते तीन कामगंध सापळे पिकाच्या उंचीच्या वर लावणे गरजेचे आहे. करपा रोगाची लक्षणे दिसताच कार्बांडीजम प्रति लिटर 1.o ग्रॅम किंवा डिथेन-एम-45.2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारावे लागणार आहे. कांद्यावरही करपा रोगाचा प्रादुर्भानृव झाल्यास डेथेन-एम-45 फवारणी करणे योग्य आहे.

नांदेड जिल्ह्यात अवकाळीसह गारपिट

नांदेड जिल्ह्य़ातील अनेक भागात बुधवारी रात्री अवकाळी पावसासह गारपीट झाली. किनवट तालुक्यातील शिवणी, बिलोली तालुक्यातील बडूर, सगरोळी, हिप्परगा तर अर्धापूर तालुक्यात ही गारपीट झाल्याने हरबारा, तुर, ज्वारी पिकांसह भाजीपाल्याचंही मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. यापूर्वी अतिवृष्टीमुळे खरीप गेले आता गारपीटीनं रब्बी पिकंही धोक्यात आले आहे.

संबंधित बातम्या :

शेतकऱ्यांसाठी महत्वाचे : कृषी उद्योगाचा आराखडा ते कर्ज मंजुरीपर्यंतचे प्रशिक्षण ; काय आहे कृषी विभागाचा अनोखा उपक्रम

‘पीएम किसान’ च्या दहाव्या हप्त्याचा मुहूर्त ठरला, शेतकऱ्यांचा होणार सन्मान अन् घ्यावी लागणार ही काळजी!

पीक पध्दतीमध्ये होतोय बदल, उत्तर भारतामधील राजमा मराठवाड्यात, अशी करा लागवड अन् भरघोस उत्पादन