लातूर : एकीकडे सोयाबीनची आवक घटत आहे तर दुसरीकडे दर घटत आहेत. ()Soyabean) शिवाय 50 टक्क्याहून अधिकच्या क्षेत्रावरील सोयाबीन हे पावसाच्या पाण्यात आहे. दरवर्षी सोयाबीनची आवक घटली तर दर वाढतात ही परस्थिती असते. यंदा मात्र चित्र वेगळे आहे. आवक घटूनही दर हे दिवसेंदिवस घटत आहे. 8800 वर गेलेले सोयाबीन थेट 5600 वर येऊन ठेपलेले आहे. (Farmer) अशा परस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी नेमके काय करावे याची आज आपण माहिती घेणार आहोत…
खरीपातील नगदी पिक असलेल्या सोयाबीनवर शेतकऱ्यांची आर्थिक मदार असते. यंदा मात्र, सर्वकाही शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या गोष्टी घडत आहेत. हंगामाच्या सुरवातीला पावसाने ओढ दिल्याने दुबार पेरणी करावी लागली होती तर पीक काढणीला आले असतानाच मराठवाड्यासह राज्यात पावसाचा कहर झाला होता. त्यामुळे हातातोंडाशी आलेले पिक अजूनही पाण्यात आहे.
मात्र, उशिराने पेरणी झालेले सोयाबीन सुस्थितीती आहे. सध्या उशिराने पेरणी झालेल्या सोयाबीन काढणीला सुरवात झाली आहे. त्यामुळे काढणीनंतर लागलीच सोयाबीनची विक्री करावी की नाही…अधिकच्या दराची प्रतिक्षा करण्यापेक्षा शेतकऱ्यांनी काय निर्णय घ्यावा..तसेत वाढीव दरासाठी शेतकऱ्यामकडे काय पर्याय आहेत याबाबत कृषी तज्ञ रामेश्वर चांडक यांनी मार्गदर्शन केले आहे…
1)* पावसामुळे खरीपातील सर्वच पिकांचे नुकसान हे झालेले आहे. विशेष: पहिल्या पेऱ्यातील सोयाबीनला तर कोंभ फुटलेले आहे. त्यामुळे आशा सोयाबीनची काढणी झाली की लगेच विक्री करणे आवश्यक आहे. अन्यथा साठवणूक केलेल्या सोयाबीन हे कुजणार आहे. त्यामुळे मिळेल त्या दरामध्ये सोयाबीनची विक्री करणे शेतकऱ्यांच्या फायद्याचे राहणार आहे.
2)* ज्या सोयाबीनची काढणी ही पावसाच्या अगोदर झाली आहे. त्या शेतकऱ्यांनी सोयाबीन साठवणूकीला हरकत नाही. जे सोयाबीन डागाळलेले नाही त्याची साठवणूक केली तरी त्याच्या गुणवत्तेवर काही परिणाम हा होणार नाही. शिवाय भविष्यात सोयाबीनचे दर वाढण्याचे संकेत आहेत. त्या दरम्यान सोयाबीनची विक्री केली तर शेतकऱ्यांना अधिकचा फायदा होणार आहे.
3)* पीक साठवूण ठेवण्याची शेतकऱ्यांची क्षमता ही अधिक नसते. त्यामुळे पावसात भिजलेल्या सोयाबीनला मिळेल त्या दरात विक्री करणे हेच शेतकऱ्यांच्या हीताचे राहणार आहे.
4)*वेअर हाऊस एक उत्तम पर्याय…शेती मालाची साठवणूक करण्यासाठी आता वेअर हाऊस उभारण्यात आलेली आहेत. शेतीमालाच्या साठवणूकीवर सध्याच्या दरानुसार शेतकऱ्यांना 75 टक्के रक्कम ही अदा केली जाते. त्यामुळे योग्य वेळी शेतीमालाला योग्य दर मिळणार आहे. तर धान्याचे नुकसानही होणार नाही. कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच बुलढाणा अर्बनचे वेअर हाऊस आहेत. त्याचा उपयोग शेतकऱ्यांनी करणे आवश्यक आहे.
5)*कृषी उत्पन्न बाजार समिती येथे वेअर हाऊसची उभारणी करण्यात आलेली आहे. शिवाय येथे शेतीमालाची साठवणूक केल्यावर या मालावर शेतकऱ्यांना कर्जही मिळते. आणि योग्य भाव झाल्यात त्याची विक्री केली जाते. यामुळे मिळालेल्या पैशाच्या जोरावर शेतकऱ्यांना कुटुंबाचा उदरनिर्वाह करता येणार आहे.
6) *सोयाबीन हे पावसाने किंवा अन्य कारणाने काळवंडले असेल तर त्याची साठवणूक करु नये. मिळेल त्या दरात त्याची विक्री केली तर शेतकऱ्यांच्या फायद्याचे राहणार आहे.
लातूरची बाजारपेठ ही सोयाबीनसाठी प्रसिध्द आहे. पण यंदा नैसर्गिक संकट आणि केंद्र सरकारचे निर्णय यामुळे आवक ही दिवसेंदिवस घटत आहे. 11500 वर गेलेले सोयाबीन थेट 5800 वर येऊन पोहचले आहे. शिवाय पावसाने उघडीप दिल्याने शेती कामे सुरु झाली असून त्याचा देखील परिणाम आयातीवर झाल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील बालाजी जाधव यांनी सांगिलते आहे. भविष्यात आवक वाढली तर त्याचा परिणाम हा दरावरच होणार आहे. (The fall in soyabean prices, the options that farmers have, )
कथा साखर कारखान्याची, व्यथा शेतकऱ्यांच्या थकीत ‘एफआरपी’ रकमेची
वेळप्रसंगी निकष बदला, पण नुकसानची नोंद घ्या : पालकमंत्री देशमुख
राज्य सरकराचा शेतकऱ्यांना दिलासा : विम्यापोटी 973 कोटी 16 लाखाचा निधी विमा कंपन्यांना वर्ग