सोलापूर : वाढत्या थकीत वीजबिलापोटी मध्यंतरी (Agricultural Pump) कृषिपंपाचा विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला होता. शेतकऱ्यांच्या कोणत्याही अडचणी लक्षात न घेता त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे उन्हाळी पिकांचेही मोठे नुकसान झाले होते. आता मात्र, राज्यभरातील (Politics Leader) नेत्यांकडेच हजारो आणि लाखोंमध्ये (Electricity Bill) महावितरणची थकबाकी असल्याचे समोर आले आहे. भिक मागून या लोकप्रतिनीधींचे वीजबिल भरण्याचा निर्धारच शिवापूर येथील अनिल पाटील यांनी केले आहे. केवळ निर्णयच नाही तर त्यांनी सोलापुरातील रुपाभवानी मातेचं दर्शन घेऊन भीक मागायला देखील सुरवात केली आहे. राज्यातील लोकप्रतिनिधी हे थकबाकीदार असले तर चालतील पण एखादा शेतकरी थकबाकीत असला तर त्याचा विद्युत पुरवठा खंडीत केला जोतो. राजकीय नेत्यांकडे मात्र, जाणीवपुर्वक दुर्लक्ष केले जात असल्याने पाटील यांना अशाप्रकारे निषेध व्यक्त करण्याचा निर्धार केला आहे.
थकाबाकीचा आकडा हजारोंच्या घरात गेला तरी पथकाची नेमणूक केली जाते शिवाय सलग तीन महिने वीजबिल अदा केले गेले नाही तरी कारवाईची प्रक्रिया सुरु होते. मात्र, राज्यातील 327 लोकप्रतिनीधींकडे हजारो आणि लाखोंच्या घरात थकबाकीचे आकडे आहेत. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यासारख्या नेत्यांकडे 4 लाखाहून अधिकची थकबाकी आहे. या लोकप्रतिधींची थकबाकी अदा करण्यासाठी पाटील यांची आजपासून पायपीट सुरु आहे.
सोलापूर जिल्ह्यातील शिवापूर येथील अनिल पाटील हे शेतकरी आहेत. शेतकरी काबाड कष्ट करुन महावितरणचे बील अदा करीत असताना दुसरीकेड लोकप्रतिनीधींवर लाखोंची थकबाकी ही बाब किती लाजिरवाणी आहे. याचा निषेध व्यक्त करण्यासाठी पाटील यांनी अनोखा मार्ग अवलंबण्यास सुरवात केली आहे. सध्याच्या महागाईच्या जमान्यात शेतकऱ्यांपेक्षा या राजकीय नेत्यांची आर्थिक परस्थिती हालाकिची झाली आहे. त्यामुळे भीक मागून का होईना लोकप्रतिनीधींचे वीजबिल अदा करणारच अशी भूमिका पाटील यांनी घेतली आहे. त्यासाठी गळ्यात एक मोठे खोके अडकिवले आहे तर त्या बॉक्सवरच फोन पे आणि गुगल पे चा नंबरही दिला आहे.
सोलापुरातील रुपाभवानी मातेचं दर्शन घेऊन अनिल पाटील यांनी भीक मागायला सुरुवात केली. राज्यभर प्रत्येक जिल्ह्यात दोन दिवस ते भीक मागणार असून मिळालेली रक्कम संबंधित जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांकडे ते जमा करणार आहेत. फोन पे आणि गुगल पे च्या माध्यमातून ते ही भीक स्वीकारणार आहेत. गळ्यामध्ये एक खपाटाचा डब्बा अडकवून ते भीक मागात आहेत.त्यामुळं अनिल पाटील या शेतकऱ्याने सुरु केलेल्या या अतरंगी आंदोलनाची सर्वत्र चर्चा दिसून येत आहे.