कृषी विभागाचा अंदाज खरा ठरला, पण शेतकऱ्यांना मिळणार का उत्पादकता?

| Updated on: Nov 20, 2021 | 12:43 PM

त्पादनाच्या दृष्टीने महत्वाचा समजला जाणार खऱीप हंगाम यंदा पेरणीपासू काढणीपर्यंत पाण्यातच गेला होता. त्यामुळे झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी शेतकऱ्यांनी रब्बीचे योग्य नियोजन करणे आवश्यक असल्याचा सल्ला कृषी विभागाच्यावतीने देण्यात आला होता. शेतकऱ्यांनी हरभरा लागवडीवरच भर देण्याचे अवाहन वेळोवेळी केले जात होते.

कृषी विभागाचा अंदाज खरा ठरला, पण शेतकऱ्यांना मिळणार का उत्पादकता?
संग्रहीत छायाचित्र
Follow us on

लातूर : उत्पादनाच्या दृष्टीने महत्वाचा समजला जाणार खऱीप हंगाम यंदा पेरणीपासून काढणीपर्यंत पाण्यातच गेला होता. त्यामुळे झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी शेतकऱ्यांनी (Rabbi Season) रब्बीचे योग्य नियोजन करणे आवश्यक असल्याचा सल्ला (Department of Agriculture) कृषी विभागाच्यावतीने देण्यात आला होता. शेतकऱ्यांनी हरभरा लागवडीवरच भर देण्याचे अवाहन वेळोवेळी केले जात होते. मध्यंतरी पावसामुळे रब्बीच्या पेरण्या रखडल्या होत्या पण औरंगाबाद विभागाचा पेरणीचा अहवाल समोर आला असून शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या सल्ल्याचे तंतोतंत पालन केले आहे. औरंगाबाद विभागात हरभऱ्याचे क्षेत्र वाढले आहे. पण आता उत्पादनात वाढ होणार का हे पहावे लागणार आहे.

पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगामातील पेरण्या ह्या वेळेवर झालेल्या नाहीत. याचा परिणाम ज्वारी आणि करडईवर होणार आहे. पण हरभरा आणि गव्हाची पेरणी उशिराने झाली तरी त्याचा उत्पादनावर परिणाम होणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. औरंगाबाद विभागात 42 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. तर हरभरा या पिकानेच अधिकचे क्षेत्र हे व्यापलेले आहे.

हरभऱ्याच्या वाढीव क्षेत्राला निसर्गाचा लहरीपणाही जबाबदार

खरीप हंगामात सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाल्याने यंदा रब्बी हंगामात ज्वारीपेक्षा शेतकऱ्यांनी हरभरा लागवडीवर भर देण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला होता. त्यामुळे हरभऱ्याचे क्षेत्र वाढणार होतेच पण ज्वारी आणि करडई पेरणीच्या दरम्यान, मराठवाड्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे पेरणी झालेल्या क्षेत्रावर दुबार पेरणीचे संकट ओढावले तर ज्या क्षेत्रावर पेराच झाला नाही तिथे पेरण्या लांबणीवर पडल्या होत्या. आता ज्वारी पेरणीची वेळ निघून गेलेली आहे. त्यामुळे शेतकरी हरभऱ्यावरच भर देत आहे. कृषी विभागाच्या सल्ल्याबरोबर निसर्गाचीही कृपादृष्टी यामुळे हरभऱ्याचे क्षेत्र वाढत आहे.

काय आहे औरंगाबाद विभागाची स्थिती?

औरंगाबाद, बीड आणि जालना जिल्ह्यात सरासरी क्षेत्राच्या 42 टक्के क्षेत्रावर रब्बीच्या पेरण्या झालेल्या आहेत. पावसामुळे ही आकडेवारी कमी आहे. मात्र, या तीन्हीही जिल्ह्यात हरभरा पिकाचाच अधिकचा पेरा आहे. औरंगाबाद जिल्ह्यात 28 हजार 213 हेक्टरावर रब्बीचा पेरा झाला आहे. तर बीड जिल्ह्यात 1 लाख 82 हजार 340 हेक्टरावर पेरणी झाली आहे. जालना जिल्ह्यात 75 हजार 140 हेक्टरावर पेरा झाला आहे. बीडमध्ये सर्वाधिक पेरणी झाली आहे तर हरभरा या पिकाचा सर्वाधिक पेरा झाला आहे.

हरभरा पेरणीची अशी घ्या काळजी

हरभरा हे रब्बीतील महत्वाचे पीक आहे. यंदा पोषक वातावरणामुळे हरभऱ्याची लागवड मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. शिवाय कृषी विभागाकडूनही याकरिता प्रोत्साहीत केले जात आहे. त्यामुळे हरभऱ्याची पेरणी शेतकरी 10 डिसेंबरपर्यंतही करता येते. पेरणीसाठी विजय, विशाल, फुले ही जी कृषी विभागाने शिफारस केलेल्या वाणाचा उपयोग गरजेचा आहे. पेरणी करताना दोन ओळीत अंतर हे 30 सेंटीमीटर व दोन रोपातील अंतर हे 10 सेंटीमीटर असणे आवश्यक आहे. पेरणीपूर्वी बीजप्रक्रीया केल्यावर रोगकिडीचा प्रादुर्भाव हा कमी होतो. पेरणीनंतर 30 दिवसांनी पहिले पाणी देणे आवश्यक आहे.

संबंधित बातम्या :

काय सांगता ? कांद्यालाही ‘देशी दारुचा’ डोस, रोगांपासून बचावासाठी शेतकऱ्यांची शक्कल

नंदुरबार बाजार समितीमध्ये लाल मिरचीचा ‘तडका’, यंदा होणार विक्रमी आवक

ढगाळ वातावरणामुळे द्राक्षांच्या घडावर परिणाम, फळबागांचे असे करा व्यवस्थापन