लातूर : अतिवृष्टी (Heavy Rain) आणि सततच्या पावसामुळे सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. सोयाबीनचा दर्जा तर ढासाळलेलाच होता पण दरही कवडीमोल मिळाल्याने शेतकऱ्यांची निराशा झाली होती. त्यामुळे सोयाबीन हे फायद्याचे पीक ठरले नसले तरी सोयाबीनचे बुस्कट (कटार) हे किती फायदेशीर आहे याची माहिती आपण घेणार आहोत. (compost fertilizer) शेती व्यवसायातील प्रत्येक बाबीचा वापर हा करता येतो. कोणतीच गोष्ट ही टाकावू ठरत नाही त्याप्रमाणेच सोयाबीनच्या बुस्काटाचे आहे.
मळणी यंत्राद्वारे सोयाबीन करुन झाले की उरलेले अवशेष म्हणजे हे बुस्कट. याचा वापर शेतकरी शक्यतो जनावरांच्या चाऱ्यासाठी करतात. अन्यथा ते बांधावर टाकून दिले जाते किंवा जाळून टाकले जाते. पण याच बुस्कटाचे बरेच गुणधर्म आहेत. या सोयाबीनच्या बुस्कटापासून कंपोस्ट खत तयार करता येते.याबाबत या लेखात आपण सविस्तर माहिती घेऊ.
काही दिवसांपूर्वीच सोयाबीन मळणीची कामे पार पडलेली आहेत. त्यामुळे शेतशिवारात आजही बुस्कटाचे ढिगारे पाहवयास मिळतात. आता हे ढिगारे एक तर चारा म्हणून जनावरांच्या दावणीला जाणार किंवा मशरूम उगवण्यासाठी तर काही ठिकाणी भट्टीमध्ये जाळण्यासाठी सोयाबीन कुटार वापरात आणले जाते. याकरिता एका ट्रॅक्टरला तीनशे ते पाचशे रुपये मिळतात तर काही शेतकरी हा कुटार पेटवून देतात. ज्यामुळे संपर्कात आलेली जमीन निर्जीव होते.
जैविक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कडे किंवा कृषी औषध विक्रेत्यांकडे वेस्ट डी कंपोजर सहज मिळून जाते. हे वेस्ट डी कंपोजर आणल्यानंतर ते 200 लिटर च्या टाकीतटाकून त्यामध्ये दोन किलो गूळ आणि पाणी हे मिश्रण सात दिवस सावली ठेवायचे. दररोज त्याला पाच मिनिट हलवायचे या माध्यमातून सातव्या दिवशी पिवळट असे द्रावण तयार होते. हे तयार पिवळट द्रावण पाण्यात मिसळून सोयाबीन कुटारावर शिंपडले तर यातून अडीच ते तीन महिन्यात उत्तम दर्जाचे कंपोस्ट खत तयार होते. जे शेतीसाठी व जमिनीसाठी उत्तम आहे व पिकांना पोषक आहे.
टाकावू असलेल्या बुस्कटाचा कंपोस्ट खत म्हणून वापर केल्यास शेती पिकाच्या उत्पादनात वाढ होणार आहे. अनेक वेळा केवळ खताचा मारा नसल्याने उत्पादना घट होते. मात्र, आता सोयाबीनच्या बुस्कटापासूनही कंपोष्ट खताची निर्मिती होत असल्याने उत्पादनात वाढ होणार आहे. फक्त शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया करणे गरजेचे आहे.
कोराना काळात मनरेगाचा आधार अन् आता तिजोरीच रिकामी
हवामान बदलाने 2030 पर्यंत शेतीचे चित्र बदलणार, ‘या’ दोन मुख्य पिकावर होणार परिणाम
कापूस उत्पादकांना अच्छे दिन, भविष्यही उज्वल मात्र घ्यावी लागणार ‘ही’ काळजी