संक्रातीच्या तोंडावर तीळ दराचा कडवटपणा, काय आहेत दर वाढीची कारणे?

| Updated on: Dec 20, 2021 | 11:36 AM

आतापर्यंत खरिपासह सर्व पिकांच्या उत्पादन घटीचे कारण केवळ अवेळी झालेला पाऊस राहिला आहे. पावसामुळे पिकांचे नुकसान तर झालेच आहे पण त्याचा आता प्रत्येक शेतीमालाच्या दरावर परिणाम होत आहे. यंदा तिळाच्या उत्पादनात तब्बल 25 टक्क्यांनी घट होणार आहे. त्यामुळे संक्रातीच्या तोंडावर तिळाच्या दरात तेजी कायम राहणार आहे.

संक्रातीच्या तोंडावर तीळ दराचा कडवटपणा, काय आहेत दर वाढीची कारणे?
संग्रहीत छायाचित्र
Follow us on

पुणे : आतापर्यंत खरिपासह सर्व पिकांच्या उत्पादन घटीचे कारण केवळ अवेळी झालेला पाऊस राहिला आहे. पावसामुळे पिकांचे नुकसान तर झालेच आहे पण त्याचा आता प्रत्येक शेतीमालाच्या दरावर परिणाम होत आहे. यंदा तिळाच्या (reduction in production) उत्पादनात तब्बल 25 टक्क्यांनी घट होणार आहे. त्यामुळे संक्रातीच्या तोंडावर (Increase in sesame prices) तिळाच्या दरात तेजी कायम राहणार आहे. उत्पादनवाढीसाठी शेतकरी एक ना अनेक पर्यायांचा अवलंब करीत असतो. पण मुळातच इतर पिकांच्या तुलनेत तिळाच्या उत्पादनात एकरी उत्पन्न कमी मिळत असल्याने देशात तिळाचे उत्पन्न कमी होत आहे. त्यामुळे गेल्या 4 महिन्यात 40 ते 50 रुपयांनी वाढ झाली आहे. तर यंदा केवळ 3 लाख 25 हजार मेट्रीक टन उत्पादन होणार असल्याचा अंदाज आहे.

पावसाचा परिणाम तिळाच्या दर्जावरही

पावसामुळे केवळ उत्पादनात घट झाली नाही तर पदरी पडलेला तीळही दर्जाहीन आहे. कारण पावसामुळे तीळ हलका आणि कमी दर्जाचा, डागी तीळाचे उत्पादन जास्त निघाले आहे. असे असले तरी चांगल्या प्रतीच्या तीळालाच अधिकची मागणी आहे. तीळाचे उत्पादन काही मोजक्याच राज्यांमध्ये घेतले जाते यामध्ये मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू आणि ओडिशा या राज्यांचा समावेश आहे.

उत्पादन कमी मागणीत वाढ

पावसामुळे देशांतर्गत तीळाचे उत्पादन घटले असले तरी इतर तीळ उत्पादीत देशामंध्येही उत्पादनात घटच आहे. देशात जवळपास 5 लाख मेट्रीक टनाचे उत्पन्न अपेक्षित असते. मात्र, यामध्ये 25 टक्के घट होणार आहे. तर आफ्रिकेमधूनही तीळाची आयात ही बंद झाली आहे. एवढेच नाही तर आयात-निर्यातीसाठी लागणाऱ्या कंटनेरच्या भाड्यात देखील वाढ झालेली आहे. एकंदरीत जगभरात मागणी अधिक अन् उत्पादन कमी अशी अवस्था झालेली आहे. त्यामुळे आगामी महिन्यात होणार असलेल्या संक्रातीच्या सणावर खऱ्या अर्थाने संक्रात आहे.

यामुळे आहे पांढऱ्या तीळाला मागणी

संक्रातीच्या सणात तर तीळाला मागणी असतेच पण त्याचबरोबर आरोग्याच्या दृष्टीनेही तीळाला वेगळे महत्व आहे. आरोग्यकारक लोह, कॉपर, व्हिटॅमिन बी 6 हे घटक सफेद तीळातून मिळतात. यामुळे रक्त पेशी तयार होऊन सहजपणे कार्य करतात. वृद्धत्व कमी करण्याचे, हाडे मजबूत आणि निरोगी बनवण्याचे गुणधर्म काळया तीळांमध्ये असते. याशिवाय तीळ हा फायबरचा उत्तम स्रोत असून तीळ कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसेराइड कमी करण्यास मदत होते त्यामुळे अधिकची मागणी असल्याचे तज्ञांनी सांगितले आहे.

असे वाढत गेले तीळाचे दर

महिना – एक किलोचे दर
जुलै – 95 – 125 रुपये
ऑगस्ट – 100 – 130 रुपये
सप्टेंबर – 110 – 140 रुपये
ऑक्टोंबर – 125 – 160 रुपये
नोव्हेंबर – 130 – 165 रुपये
डिसेंबर – 130 – 170 रुपये

संबंधित बातम्या :

वादळ, वारा, अवकाळी अंगावर झेलत शेवटी ‘राजा’ डोलत बाजारात दाखल, मुहूर्ताच्या दराची उत्सुकता शिगेला

शेती सांभाळत सेंद्रिय खत निर्मितीतून लाखोंची कमाई, कोल्हापूरच्या शेतकरी महिलेची प्रेरणादायी कहाणी…

शर्यतीचा बैल विकत दिला नाही म्हणून चोरला, शोध घेत मालक दाही दिशा फिरला..!