लातूर : रब्बी हंगामावर नैसर्गिक संकट कमी म्हणून की काय आता वन्यप्राण्यांचाही धोका वाढत आहे. त्यामुळे पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. रानडुकरे, हरीण हे केवळ (crop damage) पिकाची नासाडी करीत आहेत. आता पीक बहरले असतानाच वन्य प्राण्यांचा हौदोस वाढला असून शेतकऱ्यांच्या समस्यांमध्ये वाढ होत आहे. आतापर्यंत भुईमूग, मका या पिकांनाच वन्यप्राण्यांचा धोका होता पण आता (Rabi season) रब्बीतील ज्वारी, हरभरा, गहू या पिकांचीही नासाडी होत आहे. मशागतीच्या अवस्थेतील पिकांची नासाडी झाल्याने भविष्यात उत्पादन घट होण्याचा धोका आहे. त्यामुळे थंडीच्या कडाक्यात शेतकऱ्यांना रात्र जागून काढावी लागत आहे. त्यामुळे पिकांचे संरक्षण करीत असताना शेतकऱ्यांवर वन्यप्राण्यांचे हल्लेही होत आहेत. त्यामुळे पिकांचे संरक्षण करण्यासाठी काही उपाय आहेत त्याचा उपयोग शेतकऱ्यांना होणार आहे.
ही पध्दत अत्यंत सोपी असून सर्वसामान्य शेतकऱ्यासही शक्य होणारी आहे. शिवाय ही शक्कल एका शेतकऱ्याचीच असून आता भुईमूंग, मका या पीकाभोवती रंगबेरंगी साड्या बांधल्या जात असल्याचे आपल्या निदर्शलास येते. यामध्ये रानडुकरांच्या वर्तवणूक पार्श्वभूमीचा वापर केला गेला आहे. या पद्धतीत विविध रंगांच्या साड्या पिकांच्या भोवती रोवल्या जातात. त्यामुळे रानडुकरांना शेतात कुणीतरी मानव असल्याचा भास होतो. त्यामुळे ते शेतात प्रवेश करण्यास भीतात. या पद्धतीचा जिथे मानवाची रेलचेल किंवा येणे-जाणे जास्त आहे, अशा भागात जास्त वापर होतो. यामुळे रानडुकरांमुळे होणाऱ्या नुकसानीचे प्रमाण 40 ते 50 टक्क्यांपर्यंत कमी करता येते.
रानडुकरांची दृष्टी आणि श्रवण हे दोन्हीही ज्ञानेंद्रीय ही कमकुवत असतात. याच ज्ञानेंद्रीयाच्या मदतीनेच ते आपले निवारा व अन्नाचा शोध घेत असतो. स्थानिक केस कापण्याच्या दुकानातून मानवी केस गोळा करून आपण रानडुकरांचा प्रभावीपणे बंदोबस्त करू शकतो. ही पद्धत अत्यंत कमी खर्चाची आहे. शेतात हे मानवी केस विस्कटून सर्वदूर पसरविल्याने अन्नाच्या शोधात येणाऱ्या रानडुकरांच्या श्वसन नलिकेत हे केस अडकतात आणि ते सैरावैरा धावायला लागतात. मारठवाड्यात अनेक शेतकरी हा प्रयोग करत आहेत. ही पध्दत जरा निराळी असली तरी तेवढीच फायदेशीर आहे. शिवाय याकरिता खर्चही कमी आहे.
रानडुक्कर आणि इतर वन्य प्राण्यांना हुसकावून लावण्यासाठी शेतकरी बांधव विविध पारंपरिक पद्धतीचा अवलंब करतात. जसे की, फटाक्यांचा वापर, स्थानिक ड्रम, रिकामे कॅन पत्राचे भांडे, जाळ करणे आणि जोरजोरात ओरडणे या पद्धतींचा वापर करतात. आता वेगवेळ्या आवाजाचे किंवा गाण्यांचे यंत्रही बाजारात उपलब्ध झालेले आहेत. त्याचा वापर करूनही रानडूकरांना विचलीत केले जाते. शिवाय हे रात्री सुरु करुन ठेवले की पहाटेपर्यंत सुरुच राहते. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिकचे कष्ट करावे लागणार नाहीत.
काही वेळेस शेतकरी पिकांचे वन्य प्राणी आणि रानडुकरांपासून रक्षण करण्यासाठी पारंपरिक स्थानिक कुत्रे पाळतात. ज्यांच्या मदतीने या रानडुकरांना पळविले जाते व पिकांचे नुकसान टाळता येते.