कर्जमुक्तीसाठी शेतकऱ्यांना आज शेवटची संधी, काय आहेत आधार प्रमाणीकरणातील अडचणी?

| Updated on: Nov 15, 2021 | 10:34 AM

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी आज (सोमवार) शेवटचा दिवस शेतकऱ्यांकडे शिल्लक आहे. आधार प्रमाणीकरण केल्याशिवाय शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. गेल्या महिन्याभरापासून आधार प्रमाणीकरण करण्याचे अवाहन सहकार विभागाच्या माध्यमातून केले जात आहे. असे असले तरी जिल्हा निहाय अद्यापही 3 ते 4 हजार शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया पूर्णच केलेली नाही.

कर्जमुक्तीसाठी शेतकऱ्यांना आज शेवटची संधी, काय आहेत आधार प्रमाणीकरणातील अडचणी?
संग्रहीत छायाचित्र
Follow us on

लातूर : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी आज (सोमवार) शेवटचा दिवस शेतकऱ्यांकडे शिल्लक आहे. आधार प्रमाणीकरण केल्याशिवाय शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. गेल्या महिन्याभरापासून (base authentication) आधार प्रमाणीकरण करण्याचे अवाहन (department of co-operation) सहकार विभागाच्या माध्यमातून केले जात आहे. असे असले तरी जिल्हा निहाय अद्यापही 3 ते 4 हजार शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया पूर्णच केलेली नाही. त्यामुळे आज शेवटचा दिवस असून अधिकत्तर शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केले तर कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळणार आहे.

दोन वर्ष कोरोना आणि राज्य सरकारच्या तिजोरीत खडखडाट असल्याने ही कर्जमुक्तीची योजना गेल्या दोन वर्षापासून रखडलेली आहे. आता याला मूर्त स्वरुप देण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने पावले उचलली आहेत. असे असतानाही योजनेत सहभागी असलेल्या शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण का केले नाही हा प्रश्न कायम आहे. सोमवार आधार प्रमाणीकरण करण्याचा शेवटचा दिवस असून शेतकऱ्यांनी प्रमाणीकरण का केले नाही याचे वेगवेगळी कारणे समोर आली आहेत. त्यामुळे आता प्रमाणीकरणाला वाढीव मुदत मिळणार का हे देखील पहावे लागणार आहे.

आधार प्रमाणीकरण न करण्याची काय आहेत कारणे?

कर्जमुक्ती योजनेचा लाभ शेतकऱ्यांनाच मिळावा. यामध्ये अनियमितता होऊ नये म्हणून सहकार विभागाच्यावतीने आधार प्रमाणीकरणाची अट घालून देण्यात आली होती. मात्र, जर या दरम्यानच्या कालावधीत शेतकरी हा मयत झाला असेल किंवा स्थलांतरित झाला असेल तर त्यांचे आधार प्रमाणीकरण झालेले नाही. शिवाय 2020-21 च्या दरम्यान शेतकऱ्याने जर आयकरचा भरणा केला असेल तर असे शेतकरी बॅंकासमोर आलेले नाहीत. कारण ज्यांनी आयकर भरणा केलेला आहे ते शेतकरी योजनेच्या लाभासाठी पात्र नाहीत.

आजच शेवटची संधी

गेल्या महिन्याभरापासून आधार प्रमाणीकरण करण्याबाबत जनजागृती केली जात आहे. मात्र, शेतकऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे तर काही शेतकरी हे दरम्यानच्या कालावधीत मृत झाले आहेत. एकट्या बीड जिल्ह्यात या दीड वर्षाच्या काळात 600 पात्र शेतकरी हे मृत झाल्याने आधार प्रमाणीकरण न केल्याचा आकडा हा मोठा वाटत आहे. मात्र, उर्वरीत शेतकऱ्यांसाठी आज शेवटची संधी असणार आहे. त्यामुळे संलंग्न बॅंकेत जाऊन हे आधार प्रमाणीकरण केल्यावरच कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळणार आहे.

असे करा आधार प्रमाणीकरण

* कोणत्याही शासकीय कामामध्ये आधार कार्ड हे आता आवश्यकच झाले आहे. आता कर्जमुक्तीसाठीही हे आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक झाले आहे. प्रमाणीकरण म्हणजे थोडक्यात आपले आधार अपडेट करणे हा त्याचा अर्थ आहे.
* अनेकांच्या आधार कार्डमध्ये त्रुटी असूनही त्याची दुरुस्ती ही केली जात नाही. त्याची आवश्यकताही वाटत नाही. पण जर तुमचे नाव कर्जमुक्ती यादीत आले आहे पण कर्जमुक्ती झाली नाही तर तुम्हाला ही प्रक्रीया करावीच लागणार आहे.
* आधार प्रमाणीकरण करण्यासाठी शेतकऱ्यास सुरवातीला आधार केंद्रावर जावे लागणार आहे. आधार कार्डमध्ये काही चुका झाल्या असतील त्या निदर्शनात आणून द्याव्या लागणार आहेत. यामध्य बदह करण्यासाठी तुमच्याकडे त्या बदलासंदर्भातले प्रूफ असणे आवश्यक आहे. याकरिता मतदान कार्ड, पॅनकार्ड, जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला जवळ असणे आवश्यक आहे.
* यापुर्वी आधार कार्डवर केवळ संबंधित व्यक्तीचे जन्माचे वर्षाचा उल्लेख केला जात होता. पण आता तारीख, महिना यासह उल्लेख अनिवार्य झाला आहे. अशा दुरुस्त्या शेतकऱ्यांनी करुन घ्यायला हव्यात.
* प्रमाणीकरण करण्यासाठी मोबाईल क्रमांक, जन्माचा दाखला, पॅन ही कागदपत्रे सोबत असणे आवश्यक आहे.
* या प्रमाणीकरणासाठी तालुका सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, जिल्हा उपनिबंधक कार्यालय किंवा बॅंकेमध्येही हे बदल करुन घेता येतात.

संबंधित बातम्या :

कालव्याच्या पाण्यामुळं 22 एकरातील धानाचं नुकसानं, शेतकऱ्यांकडून ठेकेदाराकडे नुकसानभरपाईची मागणी

पद्मश्री पुरस्काराच्या माकरी ‘बीजमाता’ राहीबाईंचा कृषी क्षेत्रातील प्रेरणादायी प्रवास

बीडला नवी ओळख ; रेशीम कोषच्या माध्यमातून दिवसाकाठी लाखोंची उलाढाल