अमरावती: गव्हाचे वाढते क्षेत्र आणि (Rabi Crop) रब्बी हंगामातील पोषक वातावरण यामुळे (Wheat Production) गहू उत्पादनातही वाढ झाली आहे. वाढीव उत्पादनाबरोबर वाढती मागणी आणि रशिया-युक्रेन युध्दामुळे निर्माण झालेली परस्थिती दरही विक्रमी मिळेल असा आशावाद होता. शिवाय परस्थितीही तशीच आहे पण सध्या खेडा खरोदीमुळे गव्हाला वाढीव दर मिळत नाही. मध्य प्रदेशातील (Traders) व्यापाऱ्यांकडून थेट खेडा पध्दतीने शेतकऱ्यांकडून गहू घेतला जात आहे. त्यामुळे बाजारपेठेकडे विचारणाही होत नाही. शिवाय हे व्यापारी कमी दरात गव्हाची खरेदी करुन त्यावर प्रक्रिया करुन तोच गहू अधिकच्या दरात बाजारपेठेत विक्री करीत आहेत. शेतकरी थेट बांधावर व्यापारी येत असल्यामुळे गव्हाची विक्री करीत आहे.
रबी हंगामातील गव्हाची काढणी कामे होताच मध्यप्रदेशातील व्यापाऱ्यांनी अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागात खेडा खरेदी सुरु केली आहे. म्हणजेच लहान मोठे व्यापारी थेट शेतकऱ्यांच्या घराजवळ जाऊनच गव्हाची खरेदी करीत आहेत. 2 हजार रुपये प्रति क्विंटलप्रमाणे गव्हाची खरेदी होत आहे. शेतकऱ्यांनाही जागेवर 2 हजाराचा दर मिळत असल्याने विक्रीला सुरवात केली आहे. गव्हाची विक्रीपध्दतच यामुळे बदलली आहे. गव्हाची खरेदी की जागेवर पैसे यामुळे शेतकऱी हे बाजारपेठेकडे फिरकलेलेच नाहीत.
खेडा खरेदी पध्दतीमुळे शेतकऱ्यांचा शेतीमाल हा जागेवर विक्री होत असला तरी त्या मालाला बाजारपेठेचा दर मिळत नाही. उलट हे व्यापारी गहू विकत घेऊन ते मिलमध्ये साफसफाई करतात आणि पुन्हा बाजारपेठेत 2 हजार 700 रुपयांनी विकत आहेत. प्रति क्विंटलमागे 700 रुपयांचा फायदा हा व्यापाऱ्यांना होत आहे. यंदा गव्हाच्या मागणीत वाढ होण्याची चिन्हे आहेत मात्र, खेडा खरेदीमुळे शेतकऱ्यांना त्याचा पाहिजे त्या प्रमाणात फायदा होताना दिसत नाही.
ग्रामीण भागात सुरु झालेल्या खेडा खरेदीमुळे गावातला गहू अद्यापही बाजारपेठेत दाखलच झालेला नाही. त्यामुळे उत्पादन वाढूनही अद्याप अमरावती बाजार समितीमध्ये गव्हाची पाहिजे त्याप्रमाणात आवकच झालेली नाही. अशा या पध्दतीमुळे मागणीपेक्षा अधिक पुरवठा झाला तर दरवाढीची अपेक्षा पूर्ण होणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजारपेठेचा अभ्यास करुनच खेडा खरेदीवर गव्हाची विक्री करावी असा सल्ला देण्यात आला आहे.
Latur : ऊन – पावसाच्या खेळात हंगामी पिकेही धोक्यात, कलिंगडच्या उत्पादनात घट