मुंबई: मान्सूनचा पाऊस शनिवारी महाराष्ट्रात (Maharashtra Monsoon Update) दाखल झाला असून त्यानंतर राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पावसानं हजेरी लावली आहे. भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात आजही पाऊस हजेरी लावणार आहे. महाराष्ट्रातील उत्तर कोकण किनारपट्टीच्या भागात आज पाऊस होण्याची शक्यता आहे. उत्तर कोकण किनारपट्टी भागातील रायगड, पालघर, ठाणे आणि मुंबईत ढगांच्या गडगडाटासह पाऊस होऊ शकतो. हवामानतज्ज्ञ के.एस.होसाळीकर यांनी ट्विटकरुन ही माहिती दिली आहे. (Weather Update IMD predicted rainfall in various district of Maharashtra specially Raigad Thane and Palghar)
10.20 hrs
उत्तर कोकणात किनार पट्टीच्या भागात ढगांची दाटी पालघर मुंबई ठाणे रायगड …⛈️⛈️☂️ pic.twitter.com/Z6xeAkh574— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 7, 2021
पालघर जिल्ह्यात अनेक भागात पावसानं हजेरी लावली आहे.काही भागात दमदार तर काही भागात पावसाची संततधार सुरू होती. सकाळपासून पावसाने अचानक हजेरी लावल्याने नागरिकांची उकाड्या पासून सुटका झाली.
भारतीय हवामान विभागानं 4 जून रोजी वर्तवलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रात दिवस राज्यामध्ये बहुतेक ठिकाणी गडगडासहित पावसाची शक्यता आहे. ठाणे, रायगड, दक्षिण कोकण, पुणे, कोल्हापूर,सातारा, सांगली जिल्ह्यामध्ये आजही जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.
मान्सून पाऊस शनिवारी कोकणात दाखल झाला होता. त्यानंतर मान्सून राज्यभरात वेगाने आगेकूच करत आहे. कोकण परिसरात मान्सून अलिबागपर्यंत पोहोचला आहे. पुण्यातही रविवारी मान्सूनचे आगमन झाले होते. मान्सूनचा सध्याचा वेग पाहता तो अपेक्षेपेक्षा लवकर राज्य व्यापेल, असा अंदाज वर्तविला जात आहे. राज्यातील बहुतांश शेतकरी हे शेतीसाठी मान्सूनच्या पावसावर अवलंबून असतात. त्यामुळे मान्सूनच्या आगमनाने शेतकरी सुखावले आहेत. मान्सून राज्यात दाखल झाल्याने आता शेतीच्या कामांना वेग आला आहे.
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार मान्सून 3 जूनला केरळमध्ये दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभाग म्हणजेच आयएमडीने यंदाचा मान्सून सरासरीच्या 101 टक्के असेल असा अंदाजानुसार यंदा मान्सून सामान्य राहणार आहे. यंदा पाऊस सरासरीच्या 101 टक्के पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 96 टक्के ते 104 टक्क्यांपर्यंतच्या पावसाला सामान्य मान्सून म्हटलं जातं
संबंधित बातम्या
केरळमध्ये मान्सून दाखल झाला हे कसं ठरवलं जात? हवामान विभागाचे नेमके निकष काय?
(Weather Update IMD predicted rainfall in various district of Maharashtra specially Raigad Thane and Palghar)