मुंबई : राज्याच्या मंत्रिमंडळाची आज बैठक झाली. बैठकीनंतर कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या विभागाविषयीची माहिती पत्रकारांना दिली. अब्दुल सत्तार म्हणाले, ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं. त्यांच्याबाबत कॅबिनेटमध्ये निर्णय झाला. 24 लाख हेक्टर नुकसानाचा औपचारिक आकडा आला आहे. जुलै, ऑगस्टमध्ये नुकसान झालं. त्याचे पैसे सप्टेंबरमध्ये दिले. चार हजार सहाशे कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या ऑनलाईन अकाउंटवर गेले. ते त्यांनी विड्रालही केलेत.
आताही येणाऱ्या काही दिवसांत तीन हेक्टरपर्यंत नुकसान झाल्यास त्यांनाही देण्यात येईल. एनडीआरएफच्या नियमापेक्षा जास्त मदत देण्याबाबत चर्चा झाली. अंतिम निर्णय अद्याप झाला नाही, असंही अब्दुल सत्तार यांनी सांगितलं.
काही लोकं बांधावर जाऊन शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करू लागले. कोणताही नुकसान झालेला शेतकरी भरपाईपासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.
शेतकऱ्यांच्या बाबतीत हे सरकार गतिमान पद्धतीनं निर्णय घेत आहे. नुकसान झालेला शेतकरी भरपाईपासून वंचित राहणार नाही. उद्योगांच्या बाबतीतही संभ्रम निर्माण करू लागलेत. त्याचाही खुलासा उदय सामंत यांनी दिला आहे. तीन-साडेतीन महिन्यात कोणताही उद्योग बाहेर गेलेले नाहीत. बाहेर गेलेल्या उद्योग हे यापूर्वीच्या सरकारच्या काळात गेले आहेत.
कापसाची खरेदी करायला व्यापारी मार्केटमध्ये तयार आहे. 32 केंद्रात 8 हजार रुपयांपर्यंत कापसाचा भाव आहे. हा भाव हमीभावापेक्षा जास्त आहे. त्यामुळं कापूस विकण्यास शेतकऱ्यांना काही अडचण नाही.
कोणाच्या काळात वेदांता प्रकल्प गेला. कधी गेला. याचा खुलासा करण्यात आलाय. नवीन सरकारच्या काळात एकही प्रकल्प बाहेर गेला नाही. हा पुरावा श्वेतपत्रिकेपेक्षा काही कमी नसल्याचं अब्दुल सत्तार म्हणाले.
शेतकरी आणि उद्योगाबाबत चर्चा झाली. तारखेनिहाय खुलासा देण्यात आला आहे. इतर सविस्तर माहिती मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री देतील, असंही सत्तार यांनी सांगितलं.
खासदार डॉ. श्रीकांत हेसुद्धा आदित्य ठाकरे येणार असलेल्या दिवशी सिल्लोडला येणार आहेत. 7 तारखेला तुम्ही या. तुम्हालाही सिल्लोडचं निमंत्रण, असंही अब्दुल सत्तार यांनी म्हंटलं.