Summer Season: वाढत्या उन्हामध्ये कृषी संशोधन संस्थेचा शेतकऱ्यांना काय सल्ला? उत्पादनवाढीची पूर्वतयारी

| Updated on: Apr 20, 2022 | 4:07 PM

रब्बी हंगामातील पिकांची काढणी केल्यानंतर शेत शिवार उजाड दिसत आहे. खरिपापाठोपाठ रब्बीची पेरणी झाल्याने सबंध उन्हाळ्यात शेत शिवार हा हिरवागार होता. पण आता पीक काढणी अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता शेती मशागतीवर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे. त्यामुळे शेतजमिनीत कीटकांच्या अंडी आणि गवताच्या बिया हे उन्हाच्या तडाख्यात नष्ट होतात. त्यामुळे शेती मशागत महत्वाची आहे तर दुसरीकडे रब्बी हंगामातील धान्य साठवणूक करण्यापूर्वी ज्यामध्ये साठवणूक केली जाणार आहे ते स्वच्छ करुन घ्यावे लागणार आहे.

Summer Season: वाढत्या उन्हामध्ये कृषी संशोधन संस्थेचा शेतकऱ्यांना काय सल्ला? उत्पादनवाढीची पूर्वतयारी
रब्बी हंगामातील पिकांची काढणी झाल्यानंतर शेतीमशागत ही महत्वाची आहे.
Follow us on

मुंबई : रब्बी हंगामातील पिकांची काढणी केल्यानंतर शेत शिवार उजाड दिसत आहे. खरिपापाठोपाठ रब्बीची पेरणी झाल्याने सबंध उन्हाळ्यात शेत शिवार हा हिरवागार होता. पण आता (Crop Harvesting) पीक काढणी अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता (Agricultural Cultivation) शेती मशागतीवर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे. त्यामुळे (Farming) शेतजमिनीत कीटकांच्या अंडी आणि गवताच्या बिया हे उन्हाच्या तडाख्यात नष्ट होतात. त्यामुळे शेती मशागत महत्वाची आहे तर दुसरीकडे रब्बी हंगामातील धान्य साठवणूक करण्यापूर्वी ज्यामध्ये साठवणूक केली जाणार आहे ते स्वच्छ करुन घ्यावे लागणार आहे. धान्यातील आर्द्रतेचे प्रमाण हे किमान 12 टक्क्यांपेक्षा कमी ठेवावे लागणार आहे. शिवाय ज्या ठिकाणी धान्य साठवणूक केली जाईल ते भांडार सुरक्षित असणे गरजेचे आहे तर साठवणूक कऱण्यापूर्वी धान्यावर 5 टक्के कडुलिंबाच्या तेलाचे द्रावण करून शिंपडावे लागणार आहे. धान्य ठेवण्यापूर्वी उन्हामध्ये ते वाळवून घ्यावे लागणार आहे. त्यामुळे कीटकांची अंडी, अळ्या व इतर बुरशी नष्ट होतात.

कृषितज्ञांचा काय आहे सल्ला?

उन्हाळी हंगामातील पिकांमध्ये थोडा का होईना ओलावा राखावा लागणार आहे. भर उन्हाळ्यामध्ये जमिन कोरडी असल्यास पीक वाढीवर त्याचा परिणाम होत असतो. एवढेच नाही तर पीक उत्पादनात घट होण्याचाही धोका असतोच. त्यामुळे सिंचनाची सोय करणे गरजेचे असल्याचे डॉ. अनंता वशिष्ठ, डॉ. कृष्णन, भाजीपाला विज्ञान विभागाचे अध्यक्ष डॉ. देबकुमार दास, प्रधान शास्त्रज्ञ डॉ.B. जे. पी. एस. डबास, वनस्पती रोग विभागाचे प्रधान शास्त्रज्ञ डॉ. दिनेश कुमार यांनी सांगितले आहे.

चारा पिकांच्या पेऱ्यासाठी उत्तम वातावरण

पाण्याची उपलब्धता असल्यास गवार, मका, बाजरी, चवळीच्या शेंगा आदी चारा पिकांची पेरणी या आठवड्यात करता येणार आहे. या पेरणीच्या दरम्यान शेतात पुरेसा ओलावा असणे आवश्यक असतो. शिवाय बिया 3 ते 4 सेंटी मीटर खोलीवर ठेवाव्या लागणार आहेत. दोन ओळीतील अंतर 25-30 सेंमी ठेवावे लागणार आहे. शेतकऱ्यांनी कापसाच्या पेरणीसाठी शेततळे तयार करून प्रमाणित स्रोतातूनच बियाणे खरेदी करावे लागणार आहेत. उच्च तापमानाची शक्यता लक्षात घेता शेतकऱ्यांनी सकाळी आणि संध्याकाळीच भाजीपाला तोडाव्या लागणार आहेत. भाजीपाला पिकाचे शक्यतो उन्हापासून संरक्षण कसे करता येईल यावर लक्ष ठेवावे लागणार आहे.

भेंडी, आणि टोमॅटोची अशी घ्या काळजी

भेंडीचे पीकाची तोडणी झाल्यानंतर एकरी 5-10 किलो युरिया घालून कीटकांवर सतत लक्ष ठेवावे लागणार आहेत.दरम्यान, कीटकांचे प्रमाण जास्त झाल्यास इथियान 1.5 ते 2 मिली लीटर हे एक लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी लागणार आहे. वाढत्या उन्हामध्ये भेंडीच्या पिकात हलके सिंचन कमी अंतराने करावे लागणार आहे. त्याचप्रमाणे वांगी व टोमॅटोचे कीटकांपासून संरक्षण करण्यासाठी प्रादुर्भाव झालेली टोमॅटो गोळा करून नष्ट करावे लागणार आहे. कीटकांचा प्रादुर्भाव अधिक झाल्यास स्पिनोस्ड कीटकनाशकाची फवारणी ही 48 ईसी 1 मिली हे 4 लिटर पाणी मिसळून फवारावे लागणार आहे.

संबंधित बातम्या :

Latur Market : दर स्थिर असूनही सोयाबीनची विक्रमी आवक, केंद्राच्या निर्णयामुळे तुरीच्या दरात घसरण सुरुच

Latur : ऊन – पावसाच्या खेळात हंगामी पिकेही धोक्यात, कलिंगडच्या उत्पादनात घट

Solapur : शेतकऱ्यांच्या मूलभूत प्रश्नावर ‘स्वाभिमानी’ची हुंकार यात्रा,राजू शेट्टींनी सांगितले ऊस शेतीचे गणित!