मुंबई : यंदा सातत्याने वातावरणात बदल होत आहे. खरिपात अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले तर आता रब्बी हंगामामध्येही तीच अवस्था आहे. लाखो हेक्टरमधील लाखो शेतकऱ्यांची (Crop Damage) पिके पडली आहेत किंवा मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झाली आहेत. शेतात असलेले पीक कसे वाचवायचे हे शेतकऱ्यांसमोरचे मोठे आव्हान आहे. आशा प्रतिकूल परस्थितीमध्ये (Advice from agriculturalists) कृषितज्ञांचा सल्लाच फायदेशीर ठरणार आहे. अन्यथा (Drug spray) औषध फवारणीवर अधिकचा खर्च करुनही काही उपयोग होणार नाही. शेतकऱ्यांनी संयम राखून सर्व प्रथम सल्ला घेऊनच उपाययोजना करणे गरजेचे आहे. या काळात मोठ्या प्रमाणात उत्पन्न देणारी पिके कशी वाचवता येतील याकडे अधिक लक्ष देणे अधिक गरजेचे आहे. डॉ. राजेंद्र प्रसाद केंद्रीय कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिमी भागात फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात किमान 9.9 अंश सेल्सिअ तर कमाल तापमान 20.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंदवले गेले आहे. याचबरोबर 29.6 मिमी पावसाची नोंद झाली आहे. यामुळे विशेषत: फळपिकांवर त्याचा वाईट परिणाम झाला तर तो कसा कमी करता येईल, हेच शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचे आहे.
सरासरीपेक्षा तापमानात घट झाली तर त्याचा परिणाम आंबा मोहरावर होतो. शिवाल लिची फळाचेही नुकसान होते. तापमान 10 अंशापर्यंत आल्यास मोहर गळतो किंवा जागेवरच वाळून जातो. त्यामुळे संपूर्ण हंगामाच धोक्यात येऊ शकतो. या दरम्यान मोहर हा काळा पडतो. हे नुकसान टाळण्यासाठी डॉ. एस. सिंग सांगतात की, हेक्साकोनाझोल 1 मि.ली. प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करणे आवश्यक आहे. त्यामुळे ज्या आंबा झाडांना मोहर आलेलाच नाही किंवा लिची अजून फुलले नाहीत त्यावर याचा अनुकूल परिणाम होणार आहे. शिवाय पावसाच्या पाण्याने लिचीवरील कीड धुऊन जाणार असून हे फळपिकही बहरणार आहे.
ऑक्टोंबर महिन्यात लागवड केलेली पपई ता सुमारे चार महिन्यांची झाली आहे. पपई पीक हे 24 तासापेक्षा अधिकच्या काळात पाण्यात राहिले तर पुन्हा वाचवणे अशक्य आहे. त्यामुळे पाण्याची साठवणूक होते त्या ठिकाणाहून त्याचा निचरा होणे गरजेचे आहे. पावसामुळे माती ओली झाली होते आणि माती सुकल्यानंतर हलकी मशागत करावी लागणार आहे. वातावरण कोरडे झाल्यावर 100 ग्रॅम युरिया 50 ग्रॅम म्युरेट पोटॅश आणि 100 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेटा डोस महत्वाचा राहणार आहे. पपईतील मूळ कार्य आणि विषाणूजन्य आजारांसाठी सांगितलेले उपाय दर महिन्यातून करणे गरजेचे आहे. शिवाय मार्च-एप्रिलमध्ये पपईची लागवड करण्यासाठी रोपवाटिकेत पपईचे बी टाकल्याने पुढील हंगामातील नियोजन होणार आहे.
हिवाळ्यात जेव्हा तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली जाते आणि जोरदार वाऱ्यासह पाऊस पडतो त्यावेळी केळीची झाडेही कोसळतात. याच दरम्यान केळीची पाने अधिक फुलतात. त्यामुळे रोगट पाने शेतातून कापून टाकावी लागणार आहेत. यामुळे रोगराईची तीव्रताही कमी होईल. माती कोरडी झाल्यावर 200 ग्रॅम युरिया, 200 ग्रॅम म्युरेटर ऑफ पोटॅश आणि 100 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट प्रति केळीच्या रोपाचा वापर करावा. यामुळे वनस्पती लवकर निरोगी असल्याचे दिसून येते. त्यामुळे पुन्हा केळीची बाग येत्या एप्रिल महिन्यापर्यंत पुन्हा हिरवीगार दिसेल.
P.M.KISAN : योजनेतील अपात्र शेतकऱ्यांचे खाते सील अन् रक्कमही परत, काय आहे धोरणात बदल?
अवकाळीच्या नुकसानी खुणा : निसर्गानं सर्वकाही हिरावलं आता शेतकऱ्याचं सरकारकडे हे साकडं!
Sugarcane fire : तोडणीला आलेला ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी, 39 शेतकऱ्यांच्या स्वप्नांची राख-रांगोळी