लातूर : शेत जमिनीच्या दर्जानुसार उत्पादन ठरते. मात्र, अनेक शेतकरी हे पारंपारिक पध्दतीनेच पीकांची लागवड करतात. परिणामी उत्पादनात घट होते. (Soil testing to increase production) उत्पादन वाढवायचे असेल तर शेत जमिनक्षेत्र हे कोणत्या पिकासाठी पोषक आहे किंवा त्यासाठी काय करावे लागणार आहे याची माहिती असणे आवश्यक आहे. त्याच अनुशंगाने भारत सरकारच्या वतीने शेतकर्यांच्या हितासाठी सन 2015 मध्ये (Soil Health Card Scheme 2021) मृदा आरोग्य कार्ड योजना सुरू केली गेली.
या योजनेंतर्गत देशातील शेतकर्यांना जमिनीच्या माती गुणवत्तेचा अभ्यास करून चांगले पीक घेण्यास मदत केली जाईल. या मृदा आरोग्य कार्ड योजनेंतर्गत शेतकर्यांना आरोग्य कार्ड दिले जाईल, ज्यामध्ये शेतकर्यांच्या जमिनीच्या मातीच्या प्रकाराविषयी व मातीची गुणवत्ता याची माहिती दिली जाईल आणि या योजनेच्या आधारे शेतकर्यांना चांगली पिके घेण्यास मदत होईल.
शेतकरी हे पारंपारिक पध्दतीने पिकांची लागवड करतात. शेतजमिनीचा अभ्यास न करताच लागवड केली तर त्याचा उत्पादनावर आणि शेतजमिनीवरही होतो. या योजनेचे मुख्य उद्दीष्ट म्हणजे देशातील शेतकर्यांना त्यांच्या जमिनीचा अभ्यास करून मृदा आरोग्य कार्ड प्रदान करणे. जेणेकरुन शेतकरी जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे शेती करू शकेल. मातीच्या आरोग्यानुसार पिके लावण्यास प्रोत्साहित केले जात आहे. मृदा आरोग्य कार्ड योजना 2021 मातीच्या गुणवत्तेनुसार पीक लावून पिकाची उत्पादक क्षमता वाढवेल, जेणेकरुन शेतकर्यांचे उत्पन्नही वाढेल आणि खतांचा उपयोग मातीचा आधार व समतोल वाढविण्याचे उद्दीष्ट आहे. शेतकऱ्यांना कमी किंमतीत अधिक उत्पादन मिळू शकेल.
शेत जमिनीमध्ये बदल हे काही वर्षाकाठीच होतात असे नाही. त्यामुळे या कार्डसाठी नियोजित कालावधी ठरवून देण्यात आलेला आहे. केंद्र शासनाच्या वतीने मृदा आरोग्य कार्ड प्रत्येक 3 वर्षात शेतकर्यांना देण्यात येईल. शेतकर्यांना त्यांच्या शेतीच्या गुणवत्तेनुसार हे कार्ड प्रदान केले जाईल जे 3 वर्षांसाठी 1 वेळा असेल. या योजनेनुसार, 3 वर्षांत भारतभरातील सुमारे 14 कोटी शेतकर्यांना हे कार्ड देण्याचे सरकारचे उद्दीष्ट आहे. हे मृदा आरोग्य कार्ड शेतातील पोषण / खतांविषयी माहिती देईल. मृदा आरोग्य कार्ड हे एक रिपोर्ट कार्ड आहे ज्यामध्ये मातीच्या गुणवत्तेबद्दल महत्त्वपूर्ण माहिती प्रदान केली जाईल.
शेत जमिन नेमकी कोणत्या पध्दतीची आहे आणि त्यामध्ये कोणती पिके घ्यावीत यासाठी मृदेचे आरोग्य माहिती असणे आवश्यक आहे. तरच उत्पादनात वाढ होणार आहे. त्यामुळे या मृदा आरोग्य कार्डमध्ये शेती उत्पादक क्षमता, त्याची पौष्टिक उपस्थिती आणि पौष्टिक कमतरता शिवाय जमिनीत पाण्याचा अंश किती आहे आणि शेतजमिनीत गुणवत्ता कमी असेल तर सुधारण्यासाठी काय करायला हवे याचे मार्गदर्शन केले जाते.
आता शेतरस्त्यांचा प्रश्न मिटणार, शेत-पाणंद रस्ते उभारणीसाठी राज्य सरकारची योजना
कुक्कुटपालनातून मिळेल उभारी त्याला राज्य सरकारच्या अनुदानाचीही जोड
तंबाखूचे उत्पादन वाढणार, केंद्र सरकारने उत्पादनावरील दंड केला निम्म्याने कमी