Hyundai Tucson SUV क्रॅश टेस्टमध्ये फेल, NCAP कडून झिरो स्टार रेटिंग

| Updated on: Dec 15, 2021 | 8:19 PM

लॅटिन NCAP ने नुकतीच Hyundai Tucson ची क्रॅश-टेस्ट केली आणि या चाचणीत कारला 0 स्टार रेटिंग मिळाले आहे. सध्या टक्सनची ही जेनरेशन भारतासह अनेक देशांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे.

Hyundai Tucson SUV क्रॅश टेस्टमध्ये फेल, NCAP कडून झिरो स्टार रेटिंग
Hyundai Tucson
Follow us on

मुंबई : भारतीय ग्राहक गेल्या काही वर्षांपासून गाडी खरेदी करताना आपल्या आणि वाहनाच्या सुरक्षिततेचा (Car Safety) अधिक विचार करत असल्याचे निदर्शनास आले आहे. प्रत्येक ग्राहक त्याची ड्रिम कार किती सुरक्षित आहे, याचा विचार हमखास करतो. जगभरात अशा अनेक कंपन्या आहेत ज्या वाहनं बनवताना केवळ तिच्या लुक्स आणि फिचर्सचाच विचर न करता कारच्या सुरक्षिततेचाही खूप विचार करतात. परंतु काही कंपन्या अशाही आहेत ज्यांच्या कार बाहेरुन दमदार दिसतात, परंतु मजबुती आणि सुरक्षिततेच्या बाबतीत मागे पडतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका कारबद्दल सांगणार आहोत, जी कार सुरक्षिततेच्या बाबतीत सर्वात वाईट रेटिंगसह येते. या कारला NCAP (New Car Assessment Program) कडून झिरो रेटिंग मिळालं आहे. (2021 Hyundai Tucson scores zero stars in Latin NCAP crash test)

लॅटिन NCAP ने नुकतीच Hyundai Tucson ची क्रॅश-टेस्ट केली आणि या चाचणीत कारला 0 स्टार रेटिंग मिळाले आहे. सध्या टक्सनची ही जेनरेशन भारतासह अनेक देशांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. Hyundai ने आधीच Tucson ची नवीन जेनरेशन लॉन्च केली आहे, ज्याची भारतात टेस्टिंग केली गेली आहे आणि पुढील वर्षी ही कार लॉन्च होण्याची अपेक्षा आहे.

लहान मुलांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत सुमार

ज्या टक्सनची चाचणी घेण्यात आली ती फक्त ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज आणि बेल्ट प्रीटेन्शनर्सने सुसज्ज होती. यामुळे, कारने समोरील बाजूस पुरेशी सुरक्षा दर्शविली आणि डोक्याची आणि मानेची सुरक्षितताही बरी होती. डॅशबोर्डच्या मागे असलेला ढाचा चालकाच्या गुडघ्यावर आदळल्याने चालकाच्या गुडघ्याला दुखापत झाली. साइड इफेक्ट टेस्टमध्ये पोटाची सुरक्षा आणि डोक्याची सुरक्षा ठिक होती परंतु केवळ छातीची सुरक्षा त्यातल्या त्यात बरी होती. प्रौढांसाठी, SUV ने फ्रंटल, साइड आणि व्हिप्लॅश सेफ्टीमध्ये चांगला स्कोर केला.

टक्सनच्या चाइल्ड ऑक्युपंट प्रोटेक्शनला खराब रेट केले गेले आहे कारण SUV फक्त सेंटर सीटवर लॅप बेल्टसह येते, Hyundai ने टेस्टिंगसाठी चाइल्ड रिस्ट्रेंट सिस्टमची निवड केली नाही. Hyundai ने आधीच भारतात नवीन-जनरेशन टक्सनची टेस्टिंग सुरू केली आहे. या एसयूव्हीचे स्पाय शॉट्स इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. नवीन टक्सन सध्याच्या जनरेशनच्या तुलनेत खूपच शार्प दिसत आहे.

टक्सनचं इंजिन आणि गिअरबॉक्स

आंतरराष्‍ट्रीय बाजारात, टक्‍सन एकूण 9 वेगवेगळ्या पॉवरट्रेनसह ऑफर केली जाते. यामध्ये पेट्रोल, डिझेल, प्लग-इन हायब्रीड आणि हायब्रीडचा समावेश आहे. तथापि, भारतात, टक्सनला 2.0-लीटर नॅचरली अॅस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आणि 2.0 लीटर डिझेल इंजिनसह ऑफर केले जाईल.

पेट्रोल इंजिन 152 PS ची कमाल पॉवर आणि 192 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडलेले आहे. डिझेल इंजिन 185 PS ची कमाल पॉवर आणि 400 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. हे 8 स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडलेले आहे. ग्राहकांना डिझेल इंजिनसह ऑल-व्हील-ड्राइव्ह व्हेरिएंट देखील मिळू शकतं.

व्हिडीओ पाहा

इतर बातम्या

नवीन वर्षात Toyota च्या गाड्या महागणार, Fortuner आणि Innova Crysta चा समावेश

Tesla च्या भारतात 7 ईव्ही लाँच होणार, केंद्र सरकारची मंजुरी, जाणून घ्या लाँचिंग कधी

13 लाखांची Mahindra Scorpio अवघ्या 3.8 लाखात खरेदीची संधी, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर

(2021 Hyundai Tucson scores zero stars in Latin NCAP crash test)