2022 Yamaha FZS-Fi DLX भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
यामाहा मोटर इंडियाने सोमवारी आपली नवीन मोटरसायकल सादर केली आहे. या नवीन मॉडेलचे नाव Yamaha FZS-Fi Dlx असे आहे. 2022 FZS-Fi ची सुरुवातीची किंमत 1,15,900 रुपये इतकी आहे, तर नवीन FZS-Fi Dlx ची किंमत 1,18,900 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.
1 / 5
यामाहा मोटर इंडियाने सोमवारी आपली नवीन मोटरसायकल सादर केली आहे. या नवीन मॉडेलचे नाव Yamaha FZS-Fi Dlx असे आहे. 2022 FZS-Fi ची सुरुवातीची किंमत 1,15,900 रुपये इतकी आहे, तर नवीन FZS-Fi Dlx ची किंमत 1,18,900 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. या दोन्ही किंमती एक्स-शोरूम दिल्लीतल्या आहेत. (फोटो : yamaha-motor-india.com)
2 / 5
कंपनीने सांगितले की नवीन FZS-Fi द कॉल ऑफ द ब्लू उपक्रमांतर्गत सादर करण्यात आली आहे. नवीन मॉडेलमध्ये स्टायलिंगसोबतच फिचर्सही रिफ्रेश करण्यात आले आहेत. (फोटो: yamaha-motor-india.com)
3 / 5
दोन्ही नवीन Yamaha FZS-Fi मॉडेल कंपनीच्या ब्लूटूथ इनेबल कनेक्ट एक्स अॅपसह येतात. यात एलईडी टेल लाइट्स मिळतील. (फोटो: yamaha-motor-india.com)
4 / 5
तर FZS-Fi Dlx प्रकारात LED फ्लॅश देखील मिळेल, जो मेटॅलिक ब्लॅक आणि मेटॅलिक डीप रेड आणि सॉलिड ग्रे या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये येतो. तसेच त्यात कलरफुल एलॉय उपलब्ध आहेत. (फोटो: yamaha-motor-india.com)
5 / 5
2022 Yamaha FZS-Fi च्या इंजिनबद्दल बोलायचे झाले तर यात 149 cc चे इंजिन आहे. हे इंजिन 7,250 rpm वर 12.4PS पॉवर जनरेट करू शकते. तसेच, ही मोटरसायकल 5500 rpm वर 13.3 Nm पीक टॉर्क निर्माण करू शकते. (फोटो: yamaha-motor-india.com)