Mahindra XUV700 च्या खरेदीवर 25000 रुपयांचा लॉयल्टी बोनस, जाणून घ्या डिटेल्स

| Updated on: Oct 09, 2021 | 5:13 PM

महिंद्रा अँड महिंद्रा (Mahindra & Mahindra) कंपनीच्या नवीन लॉन्च झालेल्या XUV700 च्या खरेदीवर कंपनीच्या विद्यमान ग्राहकांना 25,000 रुपयांचा लॉयल्टी बोनस दिला जात आहे.

Mahindra XUV700 च्या खरेदीवर 25000 रुपयांचा लॉयल्टी बोनस, जाणून घ्या डिटेल्स
mahindra XUV700
Follow us on

मुंबई : महिंद्रा अँड महिंद्रा (Mahindra & Mahindra) कंपनीच्या नवीन लॉन्च झालेल्या XUV700 च्या खरेदीवर कंपनीच्या विद्यमान ग्राहकांना 25,000 रुपयांचा लॉयल्टी बोनस दिला जात आहे. पाच आणि सात सीटर कॉन्फिगरेशनमध्ये उपलब्ध, मिडसाईज एसयूव्हीने भारतात आधीच विकल्या गेलेल्या 25,000 युनिट्सच्या दोन बॅचसह देशांतर्गत बाजारात चांगलीच खळबळ उडवून दिली आहे. (25,000 rupees Loyalty Bonus On Buying Mahindra XUV700, know Details)

भारतीय कार उत्पादक कंपनीने 7 ऑक्टोबर 2021 पासून अधिकृत डीलरशिप आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर XUV700 ची बुकिंग सुरू केली आणि एका तासाच्या आत महिंद्रा XUV700 ची पहिली बॅच ग्राहकांनी रिझर्व्ह केली आहे. त्यानंतर कंपनीने दुसऱ्या बॅचच्या किंमतीत वाढली केली, तरीदेखील प्रचंड मागणीमुळे पुढील अर्ध्या तासासाठी बुकिंग घेणे कंपनीला बंद करावे लागले.

या कारची किंमत 19.79 लाख रुपये आहे. महिंद्रा 1.8 लाख रुपयांच्या अतिरिक्त पेमेंटवर AX7 ऑटोमॅटिकसह लक्झरी पॅक ऑफर करेल. AX7 डिझेल ऑटोमॅटिकसह AWD व्हेरिएंट देखील उपलब्ध आहे. त्याची किंमत 1.3 लाख रुपये अधिक असेल. महिंद्रा ने ऑगस्ट मध्ये XUV700 चे उत्पादन सुरू केले. तथापि, वाहन वितरणाची तारीख अद्याप उघड झालेली नाही. महिंद्रा पुढील महिन्याच्या अखेरीस डिलिव्हरी सुरू करण्याची शक्यता आहे.

फीचर्स

XUV700 चे आतील लेआउट उत्तम आहे, सॉफ्ट-टच मटेरियल आणि क्रोम अॅक्सेंटचा वापर केबिनला आणखी उत्कृष्ट बनवतो. मध्यभागी 10.25 इंचांची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम उपलब्ध आहे. XUV700 मध्ये सोनी 3D साउंड सिस्टीम, पुश-बटन स्टार्ट/स्टॉप, केबिन एअर फिल्टर, अॅम्बियंट लायटिंग, ड्युअल-झोन ऑटोमॅटिक एसी, पॉवर्ड फ्रंट सीट, मल्टी-फंक्शन स्टीयरिंग व्हील, क्रूझ कंट्रोल आणि पॅनारोमिक सनरूफ सारखे फीचर्स यात आहेत.

एसयूव्ही कनेक्टेड कार टेक्नोलॉजी आणि अमेझॉन अलेक्सा कॉम्पॅटिबिलिटीसाठी अॅड्रेनॉक्स सूट सादर करते. जे व्हॉईस कमांड वापरून सनरूफ ऑपरेट करू शकते. XUV700 चार ड्रायव्हिंग मोडसह येते, ज्यात Zip, Zap, Zoom आणि Custom मोड्सचा समावेश आहे. XUV700 चे एक स्मार्ट वैशिष्ट्य म्हणजे एंट्रीसाठी पुढील सीट आपोआप मागे घेतली जाते.

सेफ्टी फीचर्स

XUV700 मध्ये फ्रंट आणि साइड एअरबॅग्स, ABS, EBD, हिल-होल्ड कंट्रोल, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम, रिव्हर्सिंग कॅमेरा, 360 डिग्री साराऊंड व्ह्यू इत्यादी सेफ्टी फीचर्स मिळतात. यासह, एसयूव्हीला ऑटो-बूस्टर हेडलॅम्प (जे ऑटोमॅटिक रुपात हेडलॅम्प्स थ्रो आणि इंटेन्सिटी वाढवतात.), ड्रायव्हर स्लीप डिटेक्शन, पर्सनल सिक्योरिटी अलर्ट सारख्या अनेक सेगमेंट-फर्स्ट सेफ्टी फीचर्स देखील यात देण्यात आले आहेत.

इंजिन

XUV700 टर्बो पेट्रोल इंजिन आणि डिझेल पॉवरप्लांटच्या निवडीसह उपलब्ध आहे. पेट्रोल युनिट 2.0 लीटर mStallion युनिट आहे, जे नवीन थार मध्ये उपलब्ध आहे. हे इंजिन 198 bhp पॉवर आणि 380 Nm टॉर्क जनरेट करते. डिझेल इंजिन mHawk इंजिन आहे जे 182 बीएचपी पॉवर आणि 450 एनएम टॉर्क जनरेट करते. ही दोन्ही इंजिन 6 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक ट्रान्समिशनच्या पर्यायासह उपलब्ध आहेत. XUV700 मध्ये 4X4 पॉवरट्रेनचा पर्याय देखील आहे.

इतर बातम्या

डुकाटीची शानदार सुपरस्पोर्ट 950 मोटारसायकल बाजारात, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

बहुप्रतीक्षित Tata Punch भारतात लाँच, 21000 रुपये देऊन बुक करा शानदार मायक्रो एसयूव्ही

MG Astor लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या कसा असेल कारचा लूक, किंमत आणि फीचर्स

(25,000 rupees Loyalty Bonus On Buying Mahindra XUV700, know Details)