मुंबई : नवीन कार (New Car) खरेदी केल्यानंतर त्याच्या मेंटेनेंसकडे (Maintenance) लक्ष देणे महत्वाचे असते. गाडी सुरुवातीपासून मेंटेन ठेवल्यास गाडीचा परफॉर्मेंस तर वाढतोच शिवाय युजर्सच्या सेफ्टीसाठीदेखील ते आवश्यक ठरत असते. आपल्यातील अनेक लोकांना गाडी खरेदी केल्यावर तिचा कशा प्रकारे मेंटेनेंस ठेवायचा याबाबत पुरेशी माहिती उपलब्ध नसते. त्यामुळे नवीन गाडी घेउनही काही वर्षांनंतर गाडीच्या मायलेजसह (Mileage) इतर तक्रारी सुरु होत असतात. कारची योग्य निगा न राखल्याने अनेक समस्या निर्माण होत असतात. कार चांगली मेंटेन ठेवल्यास ती दीर्घ काळापर्यंत उत्तम मायलेज देते. नवीन कारची खरेदी केल्यावर तिची देखभाल कशी राखावी याबाबत काही महत्वाच्या मुद्यांवर या लेखातून चर्चा करणार आहोत.