एक वेळ अशी होती, जेव्हा Mahindra Thar साठी 6 महिन्याचा वेटिंग पीरियड होता. म्हणजे, आज जर तुम्ही थार बुक केली, तर तुम्हाला 6 महिन्यांनी पुढच्या जानेवारीत ही गाडी मिळणार. असच काहीस आणखी एका कारसोबत होतय. मार्केटमध्ये या कारची इतकी डिमांड आहे की, कंपनीला प्रोडक्शन पूर्ण करणं जमत नाहीय. आता जास्त सस्पेंस क्रिएट करण्याचा काही फायदा नाहीय. आम्ही टोयोटाच्या अर्बन क्रूजर गाडीबद्दल बोलतोय. टोयोटाच्या या गाडीला मारुति सोबत पार्टनरशिपमध्ये डेवलप करण्यात आलय. मारुतीने ही कार फ्रॉन्क्स नावाने सादर केलीय. टोयोटाने ही कार अर्बन क्रूजर नावाने लॉन्च केली आहे.
टोयोटाने जेव्हा अर्बन क्रूजर लॉन्च केली. त्यावेळी या कारसाठी 2 महिन्याचा वेटिंग पीरियड होता. पण सध्या हा वेटिंग पीरियड एक महिन्याचा आहे. अशावेळी तुम्ही आज टोयोटो अर्बन क्रूजर गाडी बुक केली, तर या गाडीची डिलिवरी तुम्हाला 15 ऑगस्टच्या आसपास मिळेल.
गाडीच काय वैशिष्ट्य?
टोयोटा अर्बन क्रूजर टेसर आणि मारुति सुजुकी फ्रोंक्समध्ये समान पावरट्रेन आहे. यात दोन इंजिन ऑप्शन आहेत. 1.2-लीटर डुअल जेट डुअल-वीवीटी पेट्रोल इंजिन आणि 1.0-लीटर टर्बो पेट्रोल आहे. 1.2-लीटर युनिटला 5-स्पीड एमटी या 5-स्पीड एएमटी सोबत जोडलं जाऊ शकतं. 1.0-लीटर युनिटमध्ये 5-स्पीड एमटी आणि 6-स्पीड एटी विकल्प आहे. त्या शिवाय 1.2-लीटर यूनिट 5-स्पीड MT सोबत CNG पर्याय देण्यात आला आहे.
इंटीरियर कसं आहे?
इंटीरियर बद्दल बोलायच झाल्यास याच्या केबिनमध्ये नवीन सीट अपहोल्स्ट्री फ्रेश थीम वर आधारित आहे. फीचर्समध्ये क्रॉसओवर वायरलेस स्मार्टफोन कनेक्टिविटीसोबत एक मोठी इंफोटेनमेंट स्क्रीन, एक सेमी-डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, ऑटोमेटिक क्लायमेट कंट्रोल, एक वायरलेस चार्जर, एंबिएंट लायटिंग, स्टीयरिंग-माउंटेड कंट्रोल, एक 360-डिग्री सराऊंड कॅमरा आणि एक हेड-अप डिस्प्ले देण्यात आला आहे.