आनंद महिंद्रांनी शब्द पाळला, पॅरालिम्पिकपटू अवनी लेखराला स्पेशल सीट असलेली कस्टमाइझ XUV700 दिली भेट

| Updated on: Jan 21, 2022 | 4:59 PM

टोकियो पॅरालिम्पिक 2021 (Tokyo 2021 Paralympic Games) मध्ये 10 मीटर एअर रायफल कामगिरीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अवनी लेखरासाठी महिंद्रा आणि महिंद्रा (Mahindra & Mahindra) कंपनीने XUV700 कस्टम-मेड केली आहे.

आनंद महिंद्रांनी शब्द पाळला, पॅरालिम्पिकपटू अवनी लेखराला स्पेशल सीट असलेली कस्टमाइझ XUV700 दिली भेट
Avani Lekhara - XUV700 (PS- Twitter)
Follow us on

मुंबई : टोकियो पॅरालिम्पिक 2021 (Tokyo 2021 Paralympic Games) मध्ये 10 मीटर एअर रायफल कामगिरीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अवनी लेखरासाठी महिंद्रा आणि महिंद्रा (Mahindra & Mahindra) कंपनीने XUV700 कस्टम-मेड केली आहे. रायफल शुटिंगमध्ये ती सुवर्ण आणि कांस्यपदक विजेती आहे. या स्पेशल XUV700 ची रचना प्रताप बोस यांनी केली आहे. ही कार स्पेशल सीटसह येते. याशिवाय एक्सटीरियर आणि इंटीरियरमध्ये आणखी काही बदल करण्यात आले आहेत. अवनीची XUV700 एका खास सीटसह येते ज्यात फॉरवर्ड आणि रिटर्न फंक्शन आहे. सीट प्रथम पुढे-मागे सरकते, तसेच सीट फिरते जेणेकरून अवनी SUV मधून बाहेर पडू शकेल आणि शेवटी सीट खाली केली जाऊ शकते जेणेकरून ड्रायव्हर आरामात व्हीलचेअरवरून सीटवर जाऊ शकेल.

XUV700 चे आतील लेआउट उत्तम आहे, सॉफ्ट-टच मटेरियल आणि क्रोम अॅक्सेंटचा वापर केबिनला आणखी उत्कृष्ट बनवतो. मध्यभागी 10.25 इंचांची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम उपलब्ध आहे. XUV700 मध्ये सोनी 3D साउंड सिस्टीम, पुश-बटन स्टार्ट/स्टॉप, केबिन एअर फिल्टर, अॅम्बियंट लायटिंग, ड्युअल-झोन ऑटोमॅटिक एसी, पॉवर्ड फ्रंट सीट, मल्टी-फंक्शन स्टीयरिंग व्हील, क्रूझ कंट्रोल आणि पॅनारोमिक सनरूफ सारखे फीचर्स यात आहेत.

एसयूव्ही कनेक्टेड कार टेक्नोलॉजी आणि अमेझॉन अलेक्सा कॉम्पॅटिबिलिटीसाठी अॅड्रेनॉक्स सूट सादर करते. जे व्हॉईस कमांड वापरून सनरूफ ऑपरेट करू शकते. XUV700 चार ड्रायव्हिंग मोडसह येते, ज्यात Zip, Zap, Zoom आणि Custom मोड्सचा समावेश आहे. XUV700 चे एक स्मार्ट वैशिष्ट्य म्हणजे एंट्रीसाठी पुढील सीट आपोआप मागे घेतली जाते.

सेफ्टी फीचर्स

XUV700 मध्ये फ्रंट आणि साइड एअरबॅग्स, ABS, EBD, हिल-होल्ड कंट्रोल, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम, रिव्हर्सिंग कॅमेरा, 360 डिग्री साराऊंड व्ह्यू इत्यादी सेफ्टी फीचर्स मिळतात. यासह, एसयूव्हीला ऑटो-बूस्टर हेडलॅम्प (जे ऑटोमॅटिक रुपात हेडलॅम्प्स थ्रो आणि इंटेन्सिटी वाढवतात.), ड्रायव्हर स्लीप डिटेक्शन, पर्सनल सिक्योरिटी अलर्ट सारख्या अनेक सेगमेंट-फर्स्ट सेफ्टी फीचर्स देखील यात देण्यात आले आहेत.

इंजिन

XUV700 टर्बो पेट्रोल इंजिन आणि डिझेल पॉवरप्लांटच्या निवडीसह उपलब्ध आहे. पेट्रोल युनिट 2.0 लीटर mStallion युनिट आहे, जे नवीन थार मध्ये उपलब्ध आहे. हे इंजिन 198 bhp पॉवर आणि 380 Nm टॉर्क जनरेट करते. डिझेल इंजिन mHawk इंजिन आहे जे 182 बीएचपी पॉवर आणि 450 एनएम टॉर्क जनरेट करते. ही दोन्ही इंजिन 6 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक ट्रान्समिशनच्या पर्यायासह उपलब्ध आहेत. XUV700 मध्ये 4X4 पॉवरट्रेनचा पर्याय देखील आहे.

इतर बातम्या

शानदार ऑफर! 4.30 लाखांची Datsun कार 2.75 लाखात खरेदीची संधी

पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे ग्राहक त्रस्त, Tata Motors उद्या दोन नवीन CNG कार लाँच करणार

धमाकेदार ऑफर! Maruti Alto अर्ध्या किंमतीत खरेदीची संधी, कार आवडली नाही तर पैसे परत

(Anand Mahindra keeps his promise, gifts bespoke Mahindra XUV 700 to para-athlete Avani Lekhara)