मुंबई : अपोलो ऑटोमोबाईल्सने आपल्या तीन नवीन कॉन्सेप्ट कारचे अनावरण केले आहे. हाँगकाँगमध्ये सुरू असलेल्या 2021 चायना इंटरनॅशनल इम्पोर्ट एक्स्पोमध्ये ब्रँडने या तीन कार लॉन्च केल्या आहेत. हा ऑटो एक्स्पो 10 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. अपोलो ऑटोमोबाईल्स कंपनी क्लीन एयर मोबिलिटीकडे वाटचाल करत आहे. (Apollo launched three new concepts cars including electric car in 2021 china international import expo)
तिन्ही अपोलो वाहनांमधील सर्वात आकर्षक कार म्हणजे अपोलो इव्हिजन एस (Apollo EVision S). ही एक प्योर इलेक्ट्रिक चार सीटर कार आहे. ही कार कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी खास तयार करण्यात आल्याचा कंपनीचा दावा आहे.
अहवालानुसार, कंपनीची योजना आहे की, Apollo EVision S चे उत्पादन लवकरच सुरू केले जाईल. ही अपोलो कार Audi e-tron GT आणि Porsche Taycan ला टक्कर देईल. ही इलेक्ट्रिक एसयूव्ही कार आहे.
Apollo EVision S च्या वैशिष्ट्यांबद्दल सांगायचे तर, यात आकर्षक लुक आणि डिझाइन देण्यात आलं आहे. या कारची रचना हायपरकारसारखी दिसते. तसेच यामध्ये ट्रायअँग्युलर हेडलॅम्प देण्यात आले आहेत. यासोबतच 800 व्होल्ट इलेक्ट्रिक पॉवरट्रेन फीचर्स कंपनीनेच दिले आहेत. ऑटो एक्स्पोदरम्यानही ही सिस्टम दाखवण्यात आली होती.
अपोलोने अद्याप तांत्रिक तपशील उघड केलेले नाहीत. यामध्ये ड्युअल इनव्हर्टर बसवलेले आहेत, जे जपानी इलेक्ट्रॉनिक कंपोनन्ट निर्माता ROHM च्या सहकार्याने विकसित केले गेले आहेत.
Audi, BMW, General Motors, Honda, Lamborghini आणि Volkswagen कार निर्मात्यांना अभियांत्रिकी सेवा आउटसोर्सिंग प्रदान करणे हा अपोलोचा प्राथमिक व्यवसाय आहे. ही कंपनी Intensa Emozione V12 हायपरकार देखील तयार करते.
इलेक्ट्रिक कारसाठी जगभरातील कंपन्या आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत. इतकंच नाही तर भारतात अनेक इलेक्ट्रिक कार्सनी धडक दिली आहे, ज्यामध्ये टाटा मोटर्सनेही आपल्या इलेक्ट्रिक कार्स सादर केल्या आहेत. या कारचे स्वतःचे खास फीचर्स आहेत आणि यातील बहुतांश गाड्या सिंगल चार्जवर किमान 300 किमीपर्यंतची रेंज देतात.
इतर बातम्या
कावासकीने भारतात लॉन्च केली मोटरसायकल, जाणून घ्या किती आहे या बाईकची किंमत
ऑलिम्पियन सुमित अंतिलला महिंद्राचं शानदार गिफ्ट, XUV700 ची पहिली Javelin Gold Edition भेट
PHOTO | ही आहे जगातील पहिली इलेक्ट्रिक टू-सीटर फॉर्म्युला रेस कार, जाणून घ्या काय आहे खास
(Apollo launched three new concepts cars including electric car in 2021 china international import expo)