मुंबई : दिवसेंदिवस इंधन दरवाढीचा (Fuel Price Hike) भडका त्यापाठोपाठ सीएनजीच्या किमतीतही वाढ त्यामुळे कार चालवणे कठिण होत चाललं आहे. त्यात आता लोकांचा कल इलेक्ट्रिक कारकडे (Electric Car) वळतोय. मार्केट मध्ये अजून इलेक्ट्रिक कार मोठ्या प्रमाणात उपलब्ध नाही. त्यात Apple कंपनी इलेक्ट्रिक कार वर काम करत असल्याचं समोर आलं. आणि मग चर्चा सुरू झाली नेमकी ही कार असेल कशी? तर याचं उत्तर वनरामाने देण्याचा प्रयत्न केला आहे.
या कंपनीने Apple इलेक्ट्रिक कार कशी असेल याचं रेंडर तयार केलं आहे. आणि ते रेंडर वनरामाने ऑनलाईन प्रसिद्ध केलं आहे. या रेंडरद्वारे Apple इलेक्ट्रिक कार कशी असेल यांचा अंदाज येतो. हे डिझाईन्स Apple बनवत असलेल्या कारचा फक्त अंदाज आहे. प्रत्यक्षात ही कार वेगळी असू शकते. वनराम या कंपनीने Apple ने आजपर्यंत तयार केलेल्या कारच्या डिझाइन चा अभ्यास करून इलेक्ट्रिक कारचं अंदाजे डिझाइन शेअर केलं आहे.
पहिल्या नजरेत ही कार एकदम स्टायलिश दिसत आहे. कारच्या इतर लूकचा विचार केला तर कारचे पार्ट्स एकदम स्मूथ दिसत आहेत. तर या कारची संपूर्ण बॉडी एकच पॅनेल आहे. चित्रांमध्ये मोठी चाके, मागे घेता येण्याजोग्या दरवाजाचे हँडल आणि दाराचे खांब दिसत नाहीत. कारच्या डोरबद्दल बोलायचं झालं तर ते रिट्रैक्टेबल डोर हैंडल्स या डिझाइन मध्ये दिसतात.
डिझायरने ज्या शानसोबत बाहेरुन कार आकर्षित बनवली आहे. त्यापेक्षा जास्त मेहनत आतील कारच्या डिझाईनवर काम केलं आहे. ही कार Apple च्या इतर कार बद्दल केलेल्या अभ्यासानंतर डिझाइन केली आहे. मात्र कारच्या आतील डिझाइनवर डिझायनची कल्पनाशक्ती दिसतेय. गाडीमध्ये पेडल्स, स्लीक आणि स्मार्ट गियरसोबत आकर्षित असं चौकोनी स्टिअरिंग आहे. तर डिडॅशबोर्डवरील डिस्प्ले सगळ्यांचं लक्ष वेधून घेते. या स्मार्ट डिडॅशबोर्डमध्ये स्पीडोमीटर, कारचे डिटेल्स, मॅप, म्यूझिक, अॅप्स आणि सिरी तुम्ही पाहू शकतात. या कारमध्ये चार फिरणाऱ्या सीट असून त्या सेल्फ ड्राइव्हच्या वेळी उपयोग येतील. सगळ्यात महत्त्वाचं आतापर्यंत कार बद्दल जी माहिती सांगण्यात आली आहे, त्याबद्दल अॅपल कंपनी कडून कुठलीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही.
कारच्या लॉन्च बद्दल Apple कंपनीकडून कुठलीही घोषणा करण्यात आली नाही. मात्र तिचे ज्या प्रमाणात पायलट तयार होत आहे. त्या अंदाजावरून Appleची ही ‘प्रोजेक्ट टायटन’ कार 2025 साली येण्याची शक्यता आहे.
इतर बातम्या :