Audi A8 L 2022 : Audi A8L लक्झरी सेडान लाँच, मर्सिडीज आणि BMWच्या या गाड्यांना टक्कर देणार, किंमत आणि फीचर्स जाणून घ्या…

| Updated on: Jul 13, 2022 | 8:20 AM

नवीन ऑडी ए88 एलसह आम्‍ही आमच्‍या सूक्ष्‍मदर्शी ग्राहकांना अधिक निवड आणि व्‍यापक वैयक्तिकृत पर्याय देतो. ऑडी ए8 एल सेलिब्रेशन एडिशन आणि ऑडी ए8 एल टेक्‍नोलॉजी आमच्‍या ग्राहकांच्‍या व्‍यक्तिमत्त्वांना सुरे‍खरित्‍या दाखवण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आल्‍या आहेत.

Audi A8 L 2022 : Audi A8L लक्झरी सेडान लाँच, मर्सिडीज आणि BMWच्या या गाड्यांना टक्कर देणार, किंमत आणि फीचर्स जाणून घ्या…
ऑडी ए8
Image Credit source: social
Follow us on

मुंबई : ऑडी (Audi) या जर्मन लक्‍झरी कार (Car) उत्‍पादनक कंपनीने आज भारतात त्‍यांची फ्लॅगशिप सेदान नवीन ऑडी ए8 (Audi A8L) एल लाँच केली. 340 एचपी शक्‍ती आणि 500 एनएम टॉर्कची निर्मिती करणारे 3.0 लिटर टीएफएसआय (पेट्रोल) इंजिनची शक्‍ती असलेली नवीन ऑडी ए8 एल 5.7 सेकंदांमध्‍ये 0 ते 100 किमी/तास गती प्राप्‍त करते. नवीन ऑडी एल8 एल नवीन डिझाइनशैली आणि अनेक लक्‍झरी वैशिष्‍ट्ये व तंत्रज्ञान पर्यायांच्‍या माध्‍यमातून ‘वोर्सप्रंग डर्च टेक्निक’साठी बेंचमार्क देते. नवीन ऑडी ए88 एलसह आम्‍ही आमच्‍या सूक्ष्‍मदर्शी ग्राहकांना अधिक निवड आणि व्‍यापक वैयक्तिकृत पर्याय देतो. ऑडी ए8 एल सेलिब्रेशन एडिशन आणि ऑडी ए8 एल टेक्‍नोलॉजी आमच्‍या ग्राहकांच्‍या व्‍यक्तिमत्त्वांना सुरे‍खरित्‍या दाखवण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आल्‍या आहेत.

  • ऑडी एल8 एल व्‍हेरिएण्‍ट
  • एक्‍स-शोरूम किंमत
  • ऑडी एल8 एल सेलिब्रेशन एडिशन
  • INR 12,900,000
  • ऑडी एल8 एल टेक्‍नोलॉजी
  • INR 15,700,000

ऑडी इंडियाचे प्रमुख बलबीर सिंग धिल्‍लों म्‍हणाले, ‘टऑडी ए8 एल तडजोड न करणा-या वाहतूकीचे प्रतीक आहे आणि नवीन मॉडेलमध्‍ये अधिक ग्‍लॅमर, आरामदायीपणा व तंत्रज्ञान आहे. नवीन ऑडी ए88 एलसह आम्‍ही आमच्‍या सूक्ष्‍मदर्शी ग्राहकांना अधिक निवड आणि व्‍यापक वैयक्तिकृत पर्याय देतो. ऑडी ए८ एल सेलिब्रेशन एडिशन आणि ऑडी ए8 एल टेक्‍नोलॉजी आमच्‍या ग्राहकांच्‍या व्‍यक्तिमत्त्वांना सुरे‍खरित्‍या दाखवण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आल्‍या आहेत.”

श्री. धिल्‍लों पुढे म्‍हणाले, ”संभाव्‍य ऑडी ए8 एल ग्राहकांच्‍या गरजा बदलत आहेत. त्‍यांची त्‍यांच्‍या वैयक्तिक जीवनशैलीला जुळणा-या भावनिक व आरामदायी गतीशीलता अनुभवांची इच्‍छा आहे. वेळ, जागा आणि वैयक्तिक अभिव्‍यक्‍ती यांसारखी मूल्‍ये आज निर्णय घेण्‍यासंदर्भात प्रमुख स्रोत आहेत. सोबत वेईकलची कार्यक्षमता व सुरक्षितता ते आरामदायीपणा व लक्‍झरीपर्यंतची पारंपारिक क्षमता महत्त्वाची आहे. नवीन ऑडी ए8 एल सर्व आवश्‍यकतांची पूर्तता करते आणि आम्‍हाला विश्‍वास आहे की, नवीन फ्लॅगशिप ग्राहकांना ऑडी समूहाकडे लक्ष वेधून घेत राहिल.”

हे सुद्धा वाचा

एक्‍स्‍टीरिअर डिझाइन

  • ● नवीन डायनॅमिक डिजिटल मॅट्रिक्‍स हेडलॅम्‍प्‍स स्‍टाइल दर्जा वाढवतात.
  • ● डिजिटल मॅट्रिक्‍स एलईडी हेडलाइट्समध्‍ये इल्‍यूमिनिटेड ऑडी लोगोसह प्रवेश / निकाससाठी निवडता येणारे अॅनिमेटेड प्रोजेक्‍शन्‍स आहेत.
  • ● व्‍यापक व स्‍पोर्टीयर सिंगल-फ्रेम ग्रिलसह क्रोम अँगल्‍स व क्रोम डिटेलिंग ऑडी ए8 एलला योग्‍य प्रकारची आकर्षकता देतात.
  • ● ओएलईडी टेल लाइट्ससह अद्वितीय टेल लाइट सिग्‍नेचर्स
  • o प्रोक्झिमिटी लायटिंग
  • o लायटिंग पॅटर्न डायमिक मोडशी जुळून जाते (ऑडी ड्राइव्‍ह सिलेक्‍टच्‍या माध्‍यमातून)
  • ● 8 प्रमाणित एक्‍स्‍टीरिअर रंगांमध्‍ये उपलब्‍ध – टेरा ग्रे, डिस्ट्रिक्‍ट ग्रीन, फर्मामेण्‍ट ब्‍ल्‍यू, फ्लोरेट सिल्‍व्‍हर, ग्‍लेशियर व्‍हाइट, मॅनहॅटन ग्रे, वेसूविअस ग्रे आणि मायथोस ब्‍लॅक
  • ● नवीन ड्युअल-टोन 8.26 सेमी (19 इंच) अलॉई व्‍हील्‍ससह 5-आर्म टर्बाइन डिझाइन व ग्रॅफाईट ग्रे पॉलिश
  • इंटीरिअर: फर्स्‍ट क्‍लास केबिन
  • ● रिअर सीट एक्झिक्‍युटिव्‍ह पॅकेज –
  • o रिअर सीट रिक्‍लायनर
  • o आरामदायी वैयक्तिक आसनांसह मसाज व व्‍हेन्टिलेशन
  • o हिटेड फ्रण्‍ट मसाजसह 2 मसाज प्रोग्राम्‍स व 3 इंटेन्सिटीज
  • o रिअर सीट एंटरटेन्‍मेंट स्क्रिन्‍स
  • o रिअर सीट रिमोट
  • ● वाल्‍कोना लेदर सीट अपहोल्‍स्‍टरी
  • ● फ्रण्‍ट व रिअर सीट्ससोबत 8 मसाज फंक्‍शन्‍स व 3 इंटेन्सिटी लेव्‍हल्‍स येतात
  • ● अचूक व सुलभ कार्यसंचालनासाठी एमएमआय नेव्हिगेशन प्‍लससह टच व हॅप्टिक फिडबॅक
  • ● हेड-अप डिस्‍प्‍ले व ऑडी व्‍हर्च्‍युअल कॉकपीट तुम्‍हाला आवश्‍यक असलेली माहिती सुस्‍पष्‍टपणे देतात
  • ● ऑडी स्‍मार्टफोन इंटरफेस
  • ● 4 झोन एअर कंडिशनिंगसह एअर आयोनायझर अरोमाटायझेशन प्रत्‍येकवेळी केबिनमध्‍ये ताजी हवा येण्‍याची खात्री देतात
  • ● अॅम्बियण्‍ट लायटिंगसह 30 रंग
  • ● बँग अॅण्‍ड ऑल्‍यूफसेन अडवान्‍स्‍ड साऊंड सिस्टिमसह 3डी साऊंड. सर्वोत्तम ऑडिओ निर्मितीच्‍या खात्रीसाठी 23 स्‍पीकर्स, 23 चॅनेल बिआकोअर® अॅम्प्लिफायर, 3डी फ्रण्‍ट व रिअर सराऊंड साऊंड आणि आपोआपपणे वाढणारे अकॉस्टिक लेन्‍सेस.
  • ● 4 इंटीरिअर रंगांमध्‍ये उपलब्‍ध – मदर ऑफ पर्ल बिज, कॉग्‍नॅक ब्राऊन, सर्ड ब्राऊन आणि ब्‍लॅक
  • कार्यक्षमता:
  • ● डायनॅमिक 3.0 लिटर टीएफएसआय (पेट्रोल) 48 व्‍ही माइल्‍ड-हायब्रिड इंजिनची शक्‍ती असलेली नवीन ऑडी ए8 एल 340 एचपी शक्‍ती आणि 500 एनएम टॉर्कची निर्मिती करते. ऑडी ए8 एल 5.7 सेकंदांमध्‍ये ० ते 100 किमी/तास गती प्राप्‍त करते.
  • ● उल्‍लेखनीय ड्रायव्हिंग गतीशीलतेसाठी प्रमाणित म्‍हणून लीजेण्‍डरी क्‍वॉट्रो ऑल-व्‍हील ड्राइव्‍हसह अॅडप्टिव्‍ह एअर सस्‍पेंशन
  • ● प्रीडिक्टिव्‍ह अॅक्टिव्‍ह सस्‍पेंशन अद्वितीय राइड कम्‍फर्ट देते.
  • o सिस्टिम फ्रण्‍ट कॅमेराचा वापर करत अगोदरच रस्‍त्‍यावरील दुरावस्‍थेला ओळखते आणि सर्वोत्तम आरामदायी राइडिंगसाठी सस्‍पेंशन समायोजित करते.
  • o जवळपास 30 किमी/तास गतीपर्यंत प्रीडिक्टिव्‍ह कम्‍पेन्‍सेशन
  • o एलिव्हेटेड एंट्री फंक्शन सहज प्रवेश आणि बाहेर पडण्यासाठी दरवाजे उघडताना वेईकलला 50 मिमी पर्यंत वाढवते.
  • o अॅक्टिव्‍ह रोल आणि पिच रिडक्‍शन
  • o कम्‍फर्ट प्‍लस मोडच्‍या माध्‍यमातून कार्यान्वित कर्व्‍ह टिल्टिंग फंक्‍शन पार्श्‍व बल कमी करते.
  • ● अद्वितीय ड्रायव्हिंग अनुभवासाठी ऑडी ड्राइव्‍ह सिलेक्‍ट
  • आरामदायीपणा व तंत्रज्ञान:
  • ● मॅट्रिक्‍स एलईडी रिअर रिडिंग लाइट्स
  • ● दरवाज्‍यांसाठी पॉवर लॅचिंग
  • ● क्रूझ कंट्रोलसह स्‍पीड लिमिटर
  • ● पुढील बाजूस ऑडी फोन बॉक्‍ससह वायरलेस चार्जिंग
  • ● कम्‍फर्ट की सह सेन्‍सर कंट्रोल्‍ड लगेज कम्‍पार्टमेंट रीलीज व क्‍लोजिंग
  • ● पॅनोरॅमिक सनरूफ
  • ● रिअर यूएसबी सी पोर्टस्
  • ● 230 व्‍ही सॉकेट
  • ● ऑडी एक्‍सक्‍लुसिव्‍ह कूल बॉक्‍स
  • सुरक्षितता:
  • ● ऑडी प्री-सेन्‍स बेसिक दुखापतीचा धोका कमी करण्‍यासाठी अपघाताच्‍या अंदाजामध्‍ये मिलीसेकंदांमध्‍ये कार्यान्वित होते.
  • ● पुढील व मागील बाजूच्‍या सर्व सीट बेल्‍ट्ससाठी प्रतिबंधात्‍मक सेल्‍फ-टायटनिंग फंक्‍शन
  • ● 8 एअरबॅग्‍ज (फ्रण्‍ट व रिअर सीट साइड एअरबॅग्‍ससह)
  • ● 10 एअरबॅग्‍जपर्यंत अपग्रेडेबलसह सेफ्टी पॅकेज प्‍लसचा भाग म्‍हणून फ्रण्‍ट व रिअरसाठी पर्यायी सेंट्रल एअरबॅग्‍ज
  • ● पार्क असिस्‍ट प्‍लससोबत 360 डिग्री कॅमेरा, तसेच ऑब्‍स्‍टॅकल डिटेक्शन आणि मॅनोव्‍ह्युअर असिस्‍ट
  • विक्री-पश्‍चात्त लाभ:
  • ● प्रमाणित म्‍हणून 5 वर्षांची वॉरंटी, जवळपास 7 वर्षांपर्यंत विस्‍तारित करता येते.
  • ● प्रमाणित म्‍हणून 5 वर्षांचे रोड साइड असिस्‍टण्‍स (आरएसए), सोबत जवळपास 10 वर्षांपर्यत विस्‍तारित करता येण्‍याचा पर्याय
  • ● 3 वर्षांचे कम्‍प्रेहेन्सिव्‍ह सर्विस पॅकेज

(हेडलाईन व्यतिरीक्त सदर वृत्तातील मजकूर tv9marathi ने संपादीत केलेला नसून उपरोक्त माहिती ही सिंडीकेटेड फीडमधून प्रकाशित करण्यात आली आहे.)