मुंबई : टीव्हीएस मोटर कंपनीने (TVS Motor Company) जून 2021 मध्ये वाहनांच्या विक्रीत 27 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. यावर्षी जून महिन्यात कंपनीने 2,51,886 वाहनांची (देशांतर्गत + निर्यात) विक्री केली आहे, तर गेल्या वर्षी याच महिन्यात कंपनीने 1,98,387 वाहनांची विक्री केली होती. तर कंपनीने मे 2021 एकूण 1,66,889 वाहने (देशांतर्गत + निर्यात) विकली होती. (Auto Industry recovering from Covid-19, TVS Motors sold more than 2.38 lakh bikes in June 2021)
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत टीव्हीएस मोटर कंपनीच्या दुचाकींची विक्री 6.19 लाख वाहनांवर गेली आहे, मागील आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत 2.55 लाख वाहनांची विक्री झाली होती. यंदाच्या एप्रिल ते जून या तिमाहीत कंपनीच्या तीन चाकी वाहनांची विक्री 0.39 लाख युनिट्स इतकी आहे. तर मागील वर्षी याच कालावधीत कंपनीने 0.12 लाख तीन चाकी वाहनांची विक्री नोंदवली होती.
मोटारसायकलींच्या विक्रीविषयी बोलायचे झाल्यास, टीव्हीएसने जून 2021 मध्ये 1,46,874 वाहनांची विक्री केली, तर मागील वर्षी याच महिन्यात कंपनीने 84,401 वाहनांची विक्री केली होती. त्याच वेळी, कंपनीने मे 2021 मध्ये 1,25,188 मोटारसायकली आणि एप्रिल 2021 मध्ये 1,33,227 मोटारसायकली विकल्या होत्या. त्याचप्रमाणे जून 2021 मध्ये 54,595 स्कूटर्सची विक्री केली होती. तर जून 2020 मध्ये 65,666 स्कूटर्सची विक्री केली होती. त्याचबरोबर कंपनीने मे 2021 मध्ये 19,627 स्कूटर्स आणि एप्रिल 2021 मध्ये 65,213 स्कूटर्सची विक्री केली होती.
टीव्हीएस मोटर कंपनीचा स्कूटर ब्रँड एनटॉर्क 125 ने मे महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारात एक लाख विक्रीचा टप्पा ओलांडला होता. कंपनी सध्या ही स्कूटर दक्षिण आशिया, लॅटिन अमेरिका, मध्य पूर्व आणि आशियामधील 19 देशांमध्ये विकते. ही स्कूटर ब्ल्यूटूथ कनेक्टिव्हिटी फीचर्ससह सुसज्ज आहे. बीएस-6 125 सीसी स्कूटर तीन व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे, त्यामध्ये डिस्क, ड्रम आणि रेसचा समावेश आहे.
ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह येणाऱ्या या स्कूटरमध्ये 5 इंचांचा एलसीडी डिस्प्ले आहे, ज्यामध्ये लॅप टायमर, 0-60kph एक्सिलरेशन टाइम रेकॉर्डर, टॉप स्पीड रेकॉर्डर, इंजिन टेम्परेचर गॉज, अॅव्हरेज स्पीड इंडिकेटर आणि सर्व्हिस रिमाइंडर दर्शवले जाते.
या स्कूटरची ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी रायडरला ‘Smart Xonnect’ द्वारे त्याचा फोन स्कूटरशी जोडण्याची परवानगी देते. याद्वारे रायडर त्याच्या फोनवरील सर्व डेटा तपासू शकतो. याशिवाय फोन आपल्या एलसीडी डिस्प्लेमध्ये नोटिफिकेशन, ट्रिप रिपोर्ट आणि नेव्हिगेशन अॅरोदेखील दर्शवले जाते.
या स्कूटरमध्ये 124.8cc थ्री-व्हॉल्व्ह, एअर-कूल्ड, फ्यूल-इंजेक्टेड इंजिन आहे जे 7,000rpm वर 9.1bhp पॉवर आणि 5,500rpm वर 10.5Nm पीक टॉर्क जनरेट करते. भारतात TVS Ntorq 125 च्या ड्रम ब्रेक व्हेरिएंटसाठी 71,095 रुपये द्यावे लागतील. त्याचबरोबर डिस्क ब्रेक व्हेरिएंटसाठी 75,395 रुपये, तर Ntorq 125 च्या रेस व्हेरिएंटसाठी आणि सुपरस्क्वेअर व्हेरिएंटसाठी अनुक्रमे 78,375 आणि 81,075 रुपये मोजावे लागतील.
इतर बातम्या
आता 74,990 रुपयांऐवजी 47,990 रुपयांत खरेदी करा इलेक्ट्रिक स्कूटर; जाणून घ्या कंपनीने का केली दरकपात
Renault कारवर मिळवा 65,000 पर्यंत सूट, त्वरा करा! फक्त 31 जुलैपर्यंत ऑफर
(Auto Industry recovering from Covid-19, TVS Motors sold more than 2.38 lakh bikes in June 2021)