मुंबई : eBikeGo ही कंपनी भाड्याने इलेक्ट्रिक वाहनं पुरवते, ही कंपनी लवकरच एक नवीन ‘Rugged’ इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करणार आहे. ही स्कूटर 25 ऑगस्ट रोजी eBikeGo च्या नवीन ब्रँड अंतर्गत सादर केली जाईल. कंपनीचा दावा आहे की, ही आतापर्यंतची सर्वात मजबूत स्कूटर असेल. ही स्कूटर भारतातच डिझाईन आणि मॅन्युफॅक्चर करण्यात आली आहे. (Ebikego is will launch new electric scooter, drive 1Km in just 20 paisa)
या इलेक्ट्रिक स्कूटरला आयसीएटीची (ICAT) मान्यता मिळाली आहे आणि ती फेम II सबसिडीसाठी देखील पात्र असेल. ही स्कूटर 25 ऑगस्ट रोजी सादर केली जाईल आणि यासाठी लिमिटेड प्री-ऑर्डर घेण्यात येतील. EBikeGo ने दावा केला आहे की नवीन स्कूटर EBGmatics (IoT टेक्नोलॉजीसाठी eBikeGo ची प्रॉपर्टी) द्वारे गोळा केलेल्या लाखो डेटा पॉइंट्स अॅनालाईज करुन तयार केली गेली आहे.
EBikeGo चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी इरफान खान म्हणाले की, आम्ही एक मजबूत इलेक्ट्रिक वाहन बनवण्यासाठी जवळपास तीन वर्षे वाट पाहिली आणि त्यानंतर आम्ही या दिशेने पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. आम्हाला असं किफायतशीर इलेक्ट्रिक वाहन बनवायचं आहे जे सामान्य लोकांना सहजपणे स्वीकारता येईल.
eBikeGo ने अलीकडेच घोषणा केली आहे की, ते देशातील पाच शहरांमध्ये 3,000 आयओटी सक्षम सार्वजनिक चार्जिंग स्टेशन स्थापित करण्यासाठी काम करतील. हे चार्जिंग स्टेशन संबंधित शहरांमध्ये दुचाकी आणि तीन चाकी इलेक्ट्रिक वाहनं चार्ज करू शकतील. या चार्जिंग स्टेशन्सवर सहज प्रवेश करण्यासाठी, ते इंटरनेटशी जोडलेले असतील आणि ग्राहक क्यूआर कोड स्कॅन करून चार्जिंग स्टेशनचा वापर करू शकतील.
यासह, कंपनी स्मार्टफोन अॅप्लिकेशनदेखील प्रदान करेल, जेणेकरून वापरकर्त्यांना वाहन चार्ज करण्यासाठी किती युनिट्स वापरलं गेलं याबाबतची माहिती मिळू शकेल. ग्राहक या चार्जिंग स्टेशनवर UPI, क्रेडिट किंवा डेबिट कार्ड किंवा रोख पेमेंट करू शकतील. eBikeGo च्या मते, या इलेक्ट्रिक वाहनांना चार्ज करण्यासाठी सुमारे 20-50 पैसे प्रति किलोमीटर खर्च येईल, जे पेट्रोल वाहनांपेक्षा सुमारे पाच पट स्वस्त असेल.
इतर बातम्या
अवघ्या 25 हजारात खरेदी करा जबरदस्त मायलेज देणारी बाईक, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर
अवघ्या 92 हजारात घरी न्या Maruti ची 31 KM मायलेज देणारी कार, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर
महिंद्रा कडून Bolero Neo N10 (O) ची किंमत जाहीर, जाणून घ्या टॉप मॉडेलमध्ये काय आहे खास
(Ebikego is will launch new electric scooter, drive 1Km in just 20 paisa)