मुंबई : बजाज ऑटोने (Bajaj Auto) आपल्या पल्सर, अॅव्हेंजर आणि डॉमिनर बाईकच्या किंमतीत बदल केला आहे. यात कंपनीने Pulsar 180 Dagger Edition ची किंमतसुद्धा वाढवली आहे. पूर्वी या मोटारसायकलची किंमत 1,09,907 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) इतकी होती आणि आता या बाईकची किंमत 3,456 रुपयांनी वाढविण्यात आली आहे. त्यामुळे आता या बाईकची किंमत 1,13,363 रुपयांवर गेली आहे (एक्स-शोरूम, दिल्ली). (Bajaj Auto increases price of Pulsar and Avenger with dagger edge edition, check new prices)
Pulsar 150 Dagger Edge एडिशन पर्ल व्हाईट आणि सफायर ब्लू कलर या दोन कलर स्कीम्समध्ये सादर करण्यात आली आहे. यापूर्वी मडगार्ड आणि रिमवर रेड हायलाइट देण्यात आला होता, आताच्या Dagger Edge एडिशनमधील बाईक्सच्या मडगार्ड आणि रिमवर व्हाईट हायलाइट कलर देण्यात आला आहे. नवीन पेंट स्कीमव्यतिरिक्त यामध्ये इतर कोणतेही बदल करण्यात आले नाहीत. यात 149.5 सीसी फोर-स्ट्रोक इंजिन आहे जे 8,500 आरपीएम वर 13.8bhp ची मॅक्सिमम पॉवर आणि 6500 आरपीएम वर पीक टॉर्क जनरेट करते.
कंपनीने Pulsar 180 Dagger Edition या बाईकशिवाय पल्सर NS160, NS200, RS200, Avenger Street 160 आणि Avenger Cruise 220 च्या किंमतीत वाढ केली आहे. पल्सर एनएस 160 ची किंमत 2000 रुपयांनी वाढवली असून आता या बाईकची किंमत 1.12 लाख रुपयांवर गेली आहे. त्याचबरोबर एनएस 200 ची किंमत 4 हजार रुपये आणि आरएस 200 ची किंमत 5 हजारांनी वाढविण्यात आली आहे. आता या दोन्ही बाईकची किंमत अनुक्रमे 1.35 लाख आणि 1.57 लाख रुपयांवर गेली आहे. याशिवाय अॅव्हेंजर स्ट्रीट 160 आणि अॅव्हेंजर क्रूझ 220 ची किंमत 3 हजार आणि 5 हजारांनी वाढविण्यात आली आहे. आता या दोन्ही बाईकची अनुक्रमे 1.05 लाख आणि 1.31 लाखांवर गेली आहे. या सर्व किंमती एक्स शोरूम, दिल्लीतल्या आहेत.
ही बाईक पर्ल व्हाइट, व्हॉल्कॅनिक रेड आणि स्पार्कल ब्लू मॅट कलरमध्ये सादर करण्यात आली आहे. व्हाईट-ब्लॅक ग्राफिक्स आणि हायलाइट्स व्हॉल्कॅनिक रेड कलरसह उपलब्ध असताना स्पार्कल ब्लॅक ऑप्शनमध्ये केवळ रेड ग्राफिक्स आणि हायलाइट्स उपलब्ध आहेत. यात 178.6 सीसी इंजिन आहे जे 8,500 आरपीएम वर 16.8 बीएचपी पॉवर आणि 6500 आरपीएमवर वर 14.52 एनएम पीक टॉर्क जनरेट करते.
Pulsar 220F पर्ल व्हाइट, व्हॉल्केनिक रेड, स्पार्कल ब्लू आणि सफायर ब्लू कलरमध्ये सादर करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त यामध्ये अन्य कोणतेही बदल केले गेलेले नाहीत. यात 220 सीसी इंजिन आहे जे 8500rpm वर 20.1bhp ची पॉवर आणि 7000rpm वर 18.55Nm पीक टॉर्क जनरेट करते.
इतर बातम्या
Royal Enfield च्या चाहत्यांना धक्का, Bullet 350 सह लोकप्रिय बाईक्स महागल्या
Petrol Diesel Price: इंधन दरवाढीचा चढता आलेख कायम; पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये पुन्हा वाढ
(Bajaj Auto increases price of Pulsar and Avenger with dagger edge edition, check new prices)