जगातील पहिली CNG Motorcycle ग्राहकांसाठी लॉन्च झाली आहे. डुअल फ्यूलवर पळणाऱ्या या बाइकबद्दल ग्राहकांमध्ये एक वेगळी क्रेज दिसून येतेय. ही बाइक लॉन्च होऊन फक्त काही दिवस झालेत. इतक्या कमी दिवसात या बाइकचा वेटिंग पीरियड (Bajaj Freedom 125 CNG Waiting Period) तीन महिन्यांपर्यंत जाऊन पोहोचलाय. बाइक तुम्ही 1 हजार रुपये बुकिंग अमाऊंट देऊन आपल्या नावाने बुक करु शकता. बाइकची बुकिंग देशभरात सुरु आहे. सीएनजी सिलेंडर बद्दल बोलायच झाल्यास कंपनीने बाइक सीटच्या खाली हा सिलेंडर प्लेस केलाय.
रिपोर्ट्सनुसार, काही शहरात वेटिंग पीरियड एक महीन्यापेक्षा पण कमी आहे. मुंबईत वेटिंग पीरियड 20 ते 30 दिवसांचा आहे. पुण्यात बाइकचा वेटिंग पीरियड 30 ते 45 दिवसांचा गुजरातमध्ये वेटिंग पीरियड 45 दिवस ते तीन महिन्याचा आहे. बजाज सीएनजी बाइकची पहिली डिलीवरी पुण्यात श्री प्रवीण थोरात यांना करण्यात आली आहे.
Bajaj Freedom 125 CNG Price
बजाजच्या या सीएनजी बाइकचे एकूण तीन वेरिएंट्स आहेत. बेस ड्रम वेरिएंटची किंमत 95,000 रुपये, ड्रम एलईडी वेरिएंटची किंमत 1.05 लाख रुपये (एक्स-शोरूम) आणि टॉप डिस्क वेरिएंटची किंमत 1.10 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.
Bajaj Freedom 125 CNG Mileage आणि इंजिन डिटेल्स
या बाइकमध्ये 124.5 सीसीच इंजिन देण्यात आलं आहे. त्यातून 9.3bhp पावर आणि 9.7Nm टॉर्क जेनरेट होतो. 5 स्पीड गियरबॉक्स असलेल्या या बाइकमध्ये 2 लीटरचा पेट्रोल टँक आणि 2 किलोग्रॅम सीएनजी सिलेंडर मिळतो. बाइक एक किलोग्राममध्ये 102 किलोमीटर पर्यंत (2 किलोग्राम में 200 किलोमीटर पर्यंत) आणि 2 लीटर पेट्रोलमध्ये 130 किलोमीटर पर्यंत पळू शकते, असा कंपनीचा दावा आहे.
Bajaj CNG Bike Features
सीएनजी बाइकमध्ये एलसीडी इंस्ट्रूमेंट कंसोल आहे. स्मार्टफोन कनेक्टिविटीसोबत येतो. डिस्प्लेला बॅटरी स्टेटस कॉल आणि मिस्ड कॉल अलर्ट सारखी माहिती मिळेल. बाइकमध्ये ग्राहकांच्या सुविधेसाठी यूएसबी पोर्ट देण्यात आलाय.