बजाज कंपनी पल्सर 220F चं उत्पादन बंद करण्याची शक्यता, जाणून घ्या सर्व डिटेल्स

| Updated on: Nov 14, 2021 | 7:41 AM

काही अलीकडील अहवालांनी सुचवले आहे की, बजाज पल्सर 220F बाईक बंद केली जाईल. बजाजने अलीकडेच त्यांचे नवीन पल्सर 250 मॉडेल - Pulsar N250 आणि बजाज Pulsar F250 सादर केल्यामुळे जुने मॉडेल बंद होण्याची अपेक्षा होती.

बजाज कंपनी पल्सर 220F चं उत्पादन बंद करण्याची शक्यता, जाणून घ्या सर्व डिटेल्स
Bajaj Pulsar 220F
Follow us on

मुंबई : काही अलीकडील अहवालांनी सुचवले आहे की, बजाज पल्सर 220F बाईक बंद केली जाईल कारण मोटारसायकलच्या शेवटच्या बॅचचं उत्पादन बंद केलं आहे. बजाजने अलीकडेच त्यांचे नवीन पल्सर 250 मॉडेल – Pulsar N250 आणि बजाज Pulsar F250 सादर केल्यामुळे जुने मॉडेल बंद होण्याची अपेक्षा होती. (Bajaj Pulsar 220cc Discontinued, automaker Ends Production At Plant)

Bajaj Pulsar 220F 2007 मध्ये लाँच करण्यात आले होते, बजाज पल्सर 220F कडे देशांतर्गत बाजारात कोणतेही प्रतिस्पर्धी नव्हते, या बाईकच्या सेमी-फेअर लूक, उंच विंडस्क्रीन आणि युनिपॉड हँडलबार सेटअपने युजरला एक्सपांडेड टूरिंग कपॅसिटी ऑफर केली. युनिपॉड अॅडव्हान्स लूक आणि पॉवरफुल इंजिनसह सादर करण्यात आलेल्या या मोटरसायकलला तरुण बाईकर्सचा आवडता पर्याय बनवले आहे. बजाजचे नवीन पल्सर F250 जे 220F अपग्रेड म्हणून ओळखले जात आहे ते सर्वात मोठे पल्सर मॉडेल असल्याचा दावा केला जात आहे.

बजाज पल्सर 220F मध्ये दमदार इंजिन

पल्सर 220F ही बाईक 220 सीसी, सिंगल-सिलेंडर ऑइल-कूल्ड इंजिनसह सुसज्ज आहे. हे इंजिन 8500 rpm वर 20.4 bhp चे मॅक्सिमम पॉवर आउटपुट आणि 7000 rpm वर 18.55 Nm पीक टॉर्क जनरेट करते, तर नवीनच लाँच केलेली F 250 मोटारसायकल 250 cc इंजिनसह सादर करण्यात आली आहे. सिंगल-सिलेंडर ऑइल-कूल्ड इंजिन जे 8750 rpm वर 24.5 PS पॉवर आणि 6500 rpm वर 21.5 Nm टॉर्क जनरेट करू शकते.

बजाज पल्सर 220F ची किंमत

दोन्ही मोटारसायकलींना पाच-स्पीड ट्रान्समिशन सिस्टम आणि सेम व्हीलबेस आहे. नवीन पल्सर युजर्सना स्टँडर्ड स्लिपर क्लच, इन्फिनिटी डिस्प्ले, एलईडी प्रोजेक्टर युनिपॉड हेडलॅम्प आणि यूएसबी मोबाइल चार्जिंग यांसारख्या नवीन फीचर्सची रेंज मिळते. Pulsar 220F युनिट्सची शेवटची बॅच संपली असल्याने, डीलरशिपमधील स्टॉक संपेपर्यंत कंपनी या उत्पादनावर आपले लक्ष ठेवेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. आत्तापर्यंत, मागील मॉडेलची किंमत 1,33,907 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे, तर नवीन पल्सर F250 ची किंमत 140,000 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे.

कशी आहे नवीन बजाज पल्सर 250

बजाज ऑटोने गेल्या महिन्यात नवीन पल्सर 250 (2021 Bajaj Pulsar 250) स्ट्रीट बाईक भारतीय बाजारपेठेत 1.38 लाख रुपये या एक्स-शोरूम किंमतीसह लाँच केली आहे. F250 ची किंमत 1.40 लाख रुपये (एक्स-शोरूम) पर्यंत जाते. कंपनीच्या पल्सर रेंजमधील बाइक्समध्ये हे एक विशेष उत्पादन आहे. नवीन पल्सर 250 ही बाइक्सच्या सध्याच्या पल्सर फॅमिली प्रमाणेच डिझाइनच्या धर्तीवर विकसित करण्यात आली आहे आणि त्यामध्ये फुल एलईडी हेडलॅम्प आणि डीआरएल, प्रोजेक्टर हेडलॅम्प, एलईडी इंडिकेटर आणि बायफरकेटेड टेललाइट्स, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, मस्क्यूलर फ्युएल टँक, स्प्लिट सीट सेटअप आणि मोनोशॉक सारख्या बिट्सचा समावेश आहे.

रियर सस्पेन्शनमुळे नवीन मोटरसायकल अधिक आकर्षक बनली आहे. मोटारसायकल सिग्नेचर पल्सर स्टाइलसह सादर करण्यात आली आहे, सोबत यात विविध अॅडव्हान्स एलिमेंट्स मिळतील. नवीन बजाज पल्सर 250 दोन व्हेरिएंट्समध्ये येते. यात पल्सर एन 250 आणि पल्सर एफ 250 चा समावेश आहे. Pulsar N250 एक स्टँडर्ड मॉडेल म्हणून सादर करण्यात आलं आहे आणि Pulsar F250 क्वार्टर-लीटर मोटरसायकलचं सेमी-फेयर्ड व्हर्जन आहे. नवीन पल्सर 250 बाइक्सच्या लोकप्रिय पल्सर फॅमिलीमधील एक विशेष मॉडेल म्हणून येते. बजाज ऑटोने भारतात किंवा जगात कुठेही लॉन्च केलेली ही सर्वात शक्तिशाली पल्सर आहे.

इतर बातम्या

Yezdi Adventure मोटारसायकल लवकरच भारतात लाँच होणार, रॉयल एनफील्डला टक्कर

2022 Hyundai Creta फेसलिफ्टचा ग्लोबल डेब्यू, जाणून घ्या भारतात कधी लाँच होणार?

Mahindra लवकरच देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार लाँच करणार, जाणून घ्या कारमध्ये काय असेल खास

(Bajaj Pulsar 220cc Discontinued, automaker Ends Production At Plant)