नुकताच बजाजने नवीन Bajaj Pulsar RS200 चा टीझर रिलीज केला आहे. या टीझरनुसार, Bajaj Pulsar RS200 ही लवकरच लाँच होऊ शकते. खरं तर, Bajaj Pulsar RS200 टीझरमध्ये 0X-01-2025 ची तारीख दर्शविली आहे. या बाईकमध्ये अनेक मोठे बदल पाहायला मिळू शकतात, ज्यात डिझाइन आणि फीचर्सचा समावेश असेल.
Bajaj Pulsar RS200 चे अपडेटेड व्हर्जन लवकरच भारतात लाँच होणार आहे. नुकताच कंपनीने त्याचा टीझरही रिलीज केला आहे. दिलेल्या तारखेचा तपशील पाहिला तर कधीही बाईक लाँच केली जाऊ शकते. बाईकच्या डिझाइनमध्ये काही बदलांसोबतच अनेक नवे फीचर्सही पाहायला मिळतात. इतकंच नाही तर तुम्हाला नवे रंग आणि ग्राफिक्सही पाहायला मिळतील. जाणून घेऊयात Bajaj Pulsar RS200 कोणत्या नवीन फीचर्ससह लाँच होऊ शकते.
Bajaj Pulsar RS200 मध्ये सर्वात मोठे अपडेट आपल्याला पाहायला मिळणार आहे. याचा टेल सेक्शन अतिशय कॉम्पॅक्ट असणार आहे, ज्यामध्ये ट्विन टेल लाइट्स मिळणार आहेत. यासोबतच टर्न इंडिकेटर असतील, जे रॉयल एनफिल्ड हिमालयन 450 मध्ये सापडलेल्या इंडिकेटरसारखे दिसतील.
फीचर्स कोणते?
नवीन Bajaj Pulsar RS200 मध्ये एक नवीन इंस्ट्रूमेंट कंसोल पाहायला मिळेल, जो निगेटिव्ह लाइट एलसीडी असेल. ही कार Bajaj Pulsar RS200 सारखीच असू शकते. कंसोल स्पीड, टॅकोमीटर, ओडोमीटर आणि ट्रिप मीटर रीडआऊट अशी माहिती त्याच्या इंस्ट्रूमेंट कन्सोलमध्ये मिळू शकते. यासोबतच कंसोलमध्ये इन्स्टंट मायलेजची माहितीही मिळणार आहे.
नवीन इंस्ट्रूमेंट कंसोलमध्ये स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी आणि रीडआऊटसह टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन सारखे फीचर्स देखील मिळतील. बाईकमध्ये हे सर्व फीचर्स आल्यानंतर ती आपल्या सेगमेंटमधील इतर बाइक्सच्या तुलनेत अधिक कॉम्पिटिटिव्ह होईल.
इंजिन
नवीन Bajaj Pulsar RS200 मध्ये 199.5 सीसी, लिक्विड कूल्ड सिंगल सिलिंडर इंजिन असेल जे 24.5 पीएस पॉवर आणि 18.7 एनएम टॉर्क जनरेट करेल. हे इंजिन सहा स्पीड गियर बॉक्ससोबत जोडले जाऊ शकते.
Bajaj Pulsar RS200 येत्या काही दिवसात लाँच होण्याची शक्यता आहे किंवा ती याच आठवड्यात लाँच केली जाऊ शकते. कंपनीने एक टीझर जारी केला आहे, ज्यात ही बाईक कधी लाँच होणार याची माहिती देण्यात आली आहे. टीझरमध्ये 0X-01-2025 ची तारीख दाखवण्यात आली आहे. Bajaj Pulsar RS200 ची एक्स शोरूम किंमत 1,74,419 रुपयांपर्यंत असू शकते