Best Hatchback Cars : भारतीयांच्या खिशाला परडवणाऱ्या हॅचबॅक कार, पाहा टॉप 5 गाड्या
भारतात हॅचबॅक कार्सना मोठी मागणी आहे. कमी किंमत, पार्क करायला कमी जागा, छोट्या रस्त्यांवरुन सहज प्रवास आणि चांगलं मायलेज यामुळे हॅचबॅक कार्स मध्यमवर्गीय भारतीयांची पहिली पसंती आहेत.
1 / 5
भारतात हॅचबॅक कार्सना मोठी मागणी आहे. कमी किंमत, पार्क करायला कमी जागा, छोट्या रस्त्यांवरुन सहज प्रवास आणि चांगलं मायलेज यामुळे हॅचबॅक कार्स मध्यमवर्गीय भारतीयांची पहिली पसंती आहेत. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला काही हॅचबॅक कार्सबद्दल सांगणार आहोत. (फोटो: कारवाले)
2 / 5
Renault Kwid ही हॅचबॅक कार आहे आणि ती खूपच आकर्षक दिसते. या कारचं बेसिक व्हेरिएंट RXE 0.8 हे आहे, ज्याची ऑन-रोड किंमत 4.73 लाख रुपये आहे. या कारमध्ये 4 प्रवासी बसू शकतात. ही पेट्रोल इंजिनवाली कार आहे आणि यामध्ये 799 सीसी ते 999 सीसी इंजिनचा पर्याय देण्यात आला आहे. (फोटो: कारवाले)
3 / 5
मारुती सुझुकी स्विफ्ट (Maruti Suzuki Swift) भारतीय लोकांची आवडती कार आहे. या कारच्या बेसिक व्हेरिएंटची किंमत 6.71 लाख रुपये आहे. या कारमध्ये 1197 cc चे इंजिन देण्यात आले आहे. ही 5 सीटर कार आहे. ही कार एका लीटर पेट्रोलमध्ये 23 kmpl पर्यंत मायलेज देऊ शकते. (फोटो: कारवाले)
4 / 5
मारुती सुझुकी बलेनो (Maruti Suzuki Baleno) ही कार तिच्या सेगमेंटमधील लोकप्रिय कार आहे, जी चांगल्या हाईटसह अनेक खास फीचर्ससह येते. या कारच्या सिग्मा व्हेरिएंटची किंमत 6.65 लाख रुपये आहे. यात पाच लोक बसू शकतात आणि यामध्ये 1197 सीसीचे इंजिन देण्यात आले आहे. (फोटो: कारवाले)
5 / 5
Hyundai Grand i10 Nios चे सुरुवातीचे व्हेरिएंट 6 लाखांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येईल. यामध्ये 1197 सीसी पर्यंतचे इंजिन उपलब्ध आहे, ही कार पेट्रोल, सीएनजी आणि डिझेलच्या पर्यायामध्ये उपलब्ध आहे. ही 5 सीटर कार आहे. (फोटो: कारवाले || या बातमीमधील सर्व माहिती आणि किंमती ऑनलाईन वेबसाईटवरुन घेतल्या आहेत.)